आज सकाळी घरून ऑफिसला येताना एफएम वर गाणे ऐकत होतो.
च्यानेल होते ९१.१.तसाही ह्या च्यानेल वर सकाळी सकाळी वायफळ बडबड करणारी सिमरन नावाची निवेदिका आहे. (हिला शोधण्याची मोहीम २ वर्षापूर्वी ९१.१ वाल्यांनी राबवली होती........बलबीर पाषा कोण ह्या स्टाइलने, तो भाग म्हणजे पण एक अतिरंजित मनोरंजक प्रकार होता).
सध्या एफेम वर कोणाला तरी बकरा बनवणे, टोपी घालणे हे प्रकार सुरु आहेत. म्हणजे आपल्या ओळखीच्या कोणाचा तरी नंबर आपण त्यांना द्यायचा; मग हे त्याला/तिला फोन करून पीडून जबरदस्तीने बकरा बनवणार किंवा टोपी घालणार.
तर झाले असे कि ह्या बयेने आज टोपी घालण्याच्या उद्देशाने ज्याला फोन लावला तो होता दिल्ली क्राईम सेल मधला मध्यम दर्जाचा अधिकारी.वय वर्ष ४० च्या आसपास आणि अविवाहित.
हिने थोडा आवाज बदलून संभाषण सुरु केले कि सर मी एका डेटिंग साईट कडून बोलतेय तुम्ही डेटिंग मध्ये इंटरेस्टेड असाल तर आम्ही तुमची ब्लाइंड डेटिंग करून देवू शकतो.
तुम्ही अजून अविवाहित आहात मी समजू शकते.
समोरचा पोहोचलेला होता पहिल्यांदाच तो म्हटला कि मादाम तुम्ही एकतर विवाहसंबंधी साईट वरून बोलताय किंवा एकतर एफेम कडून तरी.
हिचा आपल पाल्हाळ सुरूच तुम्ही दिल्ली पोलिसात आहात आम्ही एक सर्वे केलाय कि दिल्लीतल्या मुली म्हणतात कि दिल्ली पोलीस सौजण्यतेने वागत नाहीत इति इति, म्हणून अश्या डेटिंग ने आपणाला मुलीशी कसे प्रेमाने वागावे ह्याचे शिक्षण दिले जाईल वगैरे वगैरे.
तो परत म्हटला कि मी अश्या डेटिंग वगैरे मध्ये इंटरेस्टेड नाही मला दुसरी खूप कामं आहेत तुमच्याजवळ वेळ असेल पण माझ्याजवळ नाही.
तिने परत त्याच्या अविवाहितपणाचा मुद्दा उचलला म्हणे मी इतक्या प्रेमाने बोलतेय आणि तुम्ही मला वेळ नाहीये सांगताय म्हणूनच तुमचे अजून लग्न झाले नाही.
वर आणखी म्हणे जर मी तुमच्या समोर शार्ट स्कर्ट मध्ये आले तर तुम्ही माझी तारीफ नाही का करणार ?
त्याचे उत्तर होते मी कोण तुझी तारीफ करणार कृपया मला माझे काम करू दे आणि तू तुझे कर असाही तुला जास्तीचा वेळ आहेच फालतूपणा करायला. हिचं परत येरे माझ्या मागल्या.....दिल्ली पोलीस, सौजन्य नाही.....
शेवटचे त्याने जे सुनावले ते खरे गंभीर होवून विचार करण्याजोगे आहे. ते म्हणजे
I am busy with some serious law & order business & dont have time for these nasty things & dont forget that as I am busy with some serious law & order business So you are getting time for these things.
इतकं ऐकवून त्याने फोन आपट्लाच.
असे हि एफेम वाले स्वतःला सव्वा रुपया समजतात आणि बाकीचे पावली कम.
पण कधी कधी त्यांनाही सव्वाशेर भेटतोच.
पण स्वतःच्या विरंगुळ्यासाठी किंवा पब्लिक डिमांड च्या नावर जे काही प्रकार एफेम वर चालतात ते कितपत योग्य आहे.
वाचने
3360
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
१००.७
+१
In reply to १००.७ by मराठी_माणूस
मला विविधभारती आवडते
अवांतार चौकशी
In reply to मला विविधभारती आवडते by रणजित चितळे
चालते पण........
In reply to अवांतार चौकशी by पंगा
उत्तम!
In reply to चालते पण........ by रणजित चितळे
एफेमवर नाही याची कल्पना होती,
In reply to उत्तम! by पंगा
सोपे आहे (प्राथमिक थियरी आणि वरवरची माहिती)
In reply to एफेमवर नाही याची कल्पना होती, by शाहरुख
+१
In reply to सोपे आहे (प्राथमिक थियरी आणि वरवरची माहिती) by पंगा
आयला हे विसरलोच होतो. लहानपणी
In reply to अवांतार चौकशी by पंगा
अगदी बरोबर. सहमत.
In reply to मला विविधभारती आवडते by रणजित चितळे
शेतकरी आणि एफ एम..
त्याचा पिकांवर काही विपरीत
In reply to शेतकरी आणि एफ एम.. by शाहिर
माणसांवर होतो
In reply to त्याचा पिकांवर काही विपरीत by अन्या दातार
डीस्को करणार्या/ डीस्कोत
In reply to माणसांवर होतो by शाहिर
नवे उत्पादन ..नवी जाहीरात !!
In reply to डीस्को करणार्या/ डीस्कोत by अन्या दातार
वैताग येतो खरा या लोकांच्या