✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चित्र समिक्षा

स
सहज यांनी
Mon, 07/25/2011 - 10:24  ·  लेख
लेख
मिपाकरांना नमस्कार, नुकतेच आपले मिपाकर श्री चित्रगुप्त यांच्या समर्थ कुंचल्यातुन उतरलेले एक चित्र पहायचा योग आला. अतिशय सुरेख चित्र! दुवा येथे चित्र सुंदर आहे यात प्रश्नच नाही. परंतु चित्राबद्दल तिथे काही माहीती नाही. शिवाय आपले विलासराव म्हणतात त्याप्रमाणे चित्रकाराच्या मनात नेमके काय आहे, चित्राचा अर्थ काय हे कळत नाही. की चित्रकाराला विचारायला हिंमत होत नाही. मग शेवटी जनता जनार्दनालाच विचारायचे ठरवून हा धागा काढला. माझे परिक्षण - ह्या चित्राचे नाव नक्कीच 'पाशवी' असावे. चार स्त्रियांच्या ह्या चित्राला कदाचित युयुत्स्यु 'एक भयस्वप्न (नाईटमेयर)' असेही नाव देतील. मला वाटते की सर्वात पुढे दिसणारी ही एक आजची स्त्री आहे. तिच्या मागे तीन माना टाकलेल्या स्त्रीया आहेत. कदाचित हा सांख्यीकी विदा असेल की दर ताठ मानेच्या स्त्री मागे किमान तीन मानमोडक्या स्त्रीया असतात. किंवा आजच्या मुक्त स्त्रीच्या मागे तिच्या आई, आज्जी, पणजी यांचे मान मोडेस्तोवर घेतलेले परिश्रम संघर्ष कारणीभूत आहे. भले सर्व स्त्रीयात दिसणारा वर वरचा फरक असेलही (जो वेगवेगळ्या केसांच्या रंगावरुन आला आहे) सौंदर्यप्रेमी चित्रकाराने वेगवेगळ्या कालखंडातील स्त्रीयांच्या'फॅशन'ला योग्य मान दिला आहे असे मला त्या वेगळ्या रंगावरुन वाटते . किंवा भारताच्या इतिहासात आर्य स्त्री ते मधे मुघल पारतंत्र्यातील ते आजची लोकशाही भारतातील असा रंगछटांवरुन प्रवास दाखवला असेल. मोर हा प्रत्येक स्त्रीच्या मनातील स्वातंत्र्याचे प्रतिक म्हणुन दाखवला आहे व तो आजच्या स्त्रिच्या हातून दाणे खाताना म्हणजे ते स्वप्न आजच्या स्त्रीने खरे केले आहे हे दाखवायला काढला असावा. असो तरी तुम्हाला काय वाटते? काय अर्थ असावा? प्लीज समजवून सांगा. डिस्क्लेमरः माननीय श्री चित्रगुप्त यांच्या पूर्वपरवानगीने काढलेला धागा. चित्रकला या विषयावर गमतीदार अंगाने का होईना साधकबाधक चर्चा व्हावी हा उद्देश. श्री. चित्रगुप्त यांनी जरुर विवेचन करावे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
28121 वाचन

💬 प्रतिसाद (61)

प्रतिक्रिया

प्रगल्भ, विचारपूर्ण चर्चा... खूपच छान.

चित्रगुप्त
Wed, 07/27/2011 - 01:37 नवीन
माझ्या चित्रावर घडत असलेली चर्चा अतिशय प्रगल्भ, विचारपूर्ण अशी आहे. मनोरंजक तर आहेच. एवढ्या वेगवेगळ्या भूमिकातून एका चित्राकडे बघितले जाऊ शकते, हे मला अद्भुत वाटते. मी हे चित्र किंबहुना एकंदरित चित्रे काढतानाची भूमिका, तंत्र वगैरेवर लेख लिहिण्याच्या काहीसा तयारीत आहे, म्हणजे हा विषय मनात घोळत आहे. लवकरच प्रत्यक्ष लेखन करेन.
  • Log in or register to post comments

स्वतः चित्रगुप्त तसेच

शुचि
Wed, 07/27/2011 - 03:25 नवीन
स्वतः चित्रगुप्त तसेच चिंतातुर जंतू यांचे विवेचन वाचण्यास आवडेल.
  • Log in or register to post comments

माझा प्रयत्न

धनंजय
गुरुवार, 07/28/2011 - 02:44 नवीन
चित्र अतिशय सुंदर आहे. श्री. राजेश घासकडवी म्हणतात, थोडाफार त्याच्यासारखाच माझा विचार आहे. चित्रावर केलेली पुढील रेखांकने बघा (चित्राच्या समीक्षेकरिता श्री. चित्रगुप्त यांची अनुमती आहे, असे त्यांच्या प्रतिसादावरून गृहीत धरलेले आहे) : Image removed. नैरृत्येकडील स्त्री ही काही (आदमासे) समकेंद्री वर्तुळांचे केंद्र आहे. एक स्पष्ट वर्तुळ हातांनी बनलेले आहे (काळे वर्तुळ), चेहर्‍या-नयनांनी एक वर्तुळ बनलेले आहे, तर बाह्य वर्तुळ प्रत्येक स्त्रीचे डावीकडचे केस वा ओढण्यांनी बनलेले आहे (सफेत वर्तुळ). या बाजूला जे हात आहेत, त्यांची दिशादेखील या वर्तुळावरच आहे. केंद्राकडून बाहेर पडणार्‍या अनेक किरणवजा आकृती आहेत : हातांची मनगटे-बोटे, प्रत्येक स्त्रीचे उजवीकडचे केस किंवा ओढण्या. तसेच मोर आणि त्याचा पिसारा. यातील मोठे पट्टे एचएसव्ही चक्रातील परस्परपूरक रंगांनी आलटूनपालटून रंगवलेले आहेत : गुलाबी (फ्यूशिया/फूक्शिया) आणि हिरवा (लाइम ग्रीन) Image removed. (रंगचक्र विकिपेडियावरून - क्रिएटिव्ह कॉमन्स प्रत-अधिकार) (दुसरी एक बाब : या चित्रात निळा आणि शेंदरी हे दोन परस्परपूरक रंगसुद्धा वापरलेले आहेत.) सर्व स्त्रिया मिळून एक मयुराकृती तयार करतात. चेहरे आणि डोळे म्हणजे या पिसार्‍यावरचे "डोळे"च होत. केंद्रापासून बाहेर पडणार्‍या किरणाकृती आकृती म्हणजे लांबलांब पिसे होत. या मयुराकृतीला शिर-तुरा आणि वळणदार मान देखील आहे : ही आकृती केंद्रवर्ती स्त्रीच्या हातांनी तयार होते. अतिशय बारीक सफेत लेखणीने मी ही आकृती ढोबळपणे रेखाटलेली आहे. केंद्रवर्ती स्त्रीचा केशसंभार हा समकेंद्री वर्तुळांचा पिसारा मयुराकृतीच्या देहाला जोडतो. - - - मयुराकृतीचा हट्ट सोडून सुद्धा या चित्राच्या मांडणीमध्ये काही वैशिष्ट्ये आहेत : प्रत्येक स्त्री ही बर्‍याच बाबतीत अन्य स्त्रियांसारखी आहे, पण कुठल्यातरी एका बाबतीत विलक्षण आहे. उदाहरणार्थ उत्तरेकडची (=वायव्येकडची) स्त्री ही एकटी तिच्या उजवीकडे कटाक्ष टाकत आहे. त्यामुळे तिच्या कटाक्षात काही कथा सांगितली जाते आहे. - - - एचएसव्ही रंगसंगती ही अलीकडच्या-अलीकडच्या दशकांत प्रचलित झालेली आहे. यातील "सब्ट्रॅटिव्ह" रंग पूर्वीच्या काळी फक्त रंगीत काचांनी बनवलेल्या चित्रांत दिसत असत. चित्रातील स्त्रिया मात्र कुंकू-दागिने आणि चारपैकी दोघांच्या डोक्यावर पदर असल्यामुळे पारंपरिक आहे. हा नव्याजुन्याचा मिलाफ आवडण्यासारखा आहे. पारंपरिक असून सुद्धा स्त्रियांच्या डोळ्यांत शांत का होईना कामुकता आहे. नैरृत्येकडल्या स्त्रीचा पदर ढळला असूनही ती कामिनीच वाटते, वखवखलेली वाटत नाही. - - - सर्व रेषांना अलगद बाकदारपणा आहे. त्यामुळे चित्राला एक मृदुता येते. दोन "कोनदार" पुरुष तत्त्वे चित्रात आहेत : नैरृत्येच्या कापडावरील सरळ रेषा/कोनांचे डिझाईन, आणि आग्नेयेकडचा मोर डौलदार, पण "नर"पक्षी. - - - हिरवा रंग आधी थोडा आवडला नव्हता. पण निरखून बघता आवडू लागला आहे.
  • Log in or register to post comments

भारी

सोत्रि
गुरुवार, 07/28/2011 - 09:34 नवीन
मला तर एकदम डॅन ब्राउनच्या 'द दा विंची कोड' च्या धर्तीवर 'द दा चिगु कोड' वाचतो आहे अस्सा भास झाला क्षणभर. - (दा विंची भक्त) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

आवडले!

सहज
गुरुवार, 07/28/2011 - 10:52 नवीन
आधी भडक वाटणार्‍या रंगाचा खुलासा मस्तच केला आहे. धन्यवाद धनंजय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

अनेकभार्या शैली

सोत्रि
गुरुवार, 07/28/2011 - 10:00 नवीन
अरे ही तर मुघलकालीन, ऐतीहासिक अशी 'अनेकभार्या शैली' आहे. एखाद्या मुघल सुल्तानाच्या अनेक बेगमांचे हे चित्र आहे. सुल्तान लढाइ जिंकौन परत येता झाला आहे अशे खबर नुकतीच आली आहे. आणि त्यामुळे आता 'मेरा नंबर कब आयेगा' ह्या विवंचनेत असलेल्या त्याच्या ह्या बेगमा आहेत. जी भार्या मोराला दाणे टाकत आहे ती आवडती, 'पट्टराणी' आहे. बघा तिच्या चेहेर्‍यावरचा चिंताविरहीत तजेला (माझाच नंबर पहिला हा आत्मविश्वास) , डोक़्यावर मुकुट, तिचा एकंदर डौल. निळ्या केसांची भार्या बिचारी 'अडचण' नेमकी आत्ताच यावी ह्या विचाराने डोक्याला हात लावून बसली आहे. तीच्या चेहेर्‍यावरचा 'रक्तिमा' हा गुप्तपणे ही 'अडचण' दर्शवत आहे. (रंगांच्या अधिक माहितीसाठी, बघा धनंजय ह्यांचा प्रतिसादातील रंगचक्र) सर्वात मागची ह्यावेळी फारच आशावादी आहे, तीच्या पाठी असलेला एक हात "भीउ नको मी तुझ्या पाठीशी आहे" असे म्हणून तीचा आत्मविश्वास वाढवत आहे, तीच्या चेहेर्‍यावरचा हा आत्मविश्वास आवडतीच्या सडेतोड आहे हिरव्या केसांची भार्या एकदम शांत आहे. 'पदरी पडले आणि पवित्र झाले' असा धीर्गंभीर विचार करणारी काहिशी विरक्त अशी भार्या आहे. हिरवा रंग तीची ही धीर्गंभीरता दर्शवतो आहे. - (अनेकभार्या शैलीचा पुरस्कर्ता) सोकाजी
  • Log in or register to post comments

:-)

सहज
गुरुवार, 07/28/2011 - 10:55 नवीन
हा हा हा. बाकी भगवान देता है तो छप्पर फाडके प्रमाणे अडचण आली तर ती फार मोठ्याप्रमाणावर देखील येउ शकेल बर का! मग नाही आवडायची बहुभार्या शैली. बघा आपले पूर्वज हुशार चा पुन्हा एकदा पडताळा आला. आपल्याकडे बहुभार्या शैलीपेक्षा, अन्यत्र अंगवस्त्र पद्धत जास्त प्रचलित!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

इंटरेस्टिंग

स्वाती दिनेश
गुरुवार, 07/28/2011 - 10:09 नवीन
प्रतिक्रियांमधील वेगवेगळे अर्थ वाचते आहे, चर्चा आवडते आहे. स्वाती
  • Log in or register to post comments

स्मिता पाटील - शबाना आझमी

विसुनाना
गुरुवार, 07/28/2011 - 10:57 नवीन
पुन्हा एक समिक्षण. यावेळी थोडे ह. घ्या. स्वरूपातले. हे अ‍ॅब्स्ट्रॅक्ट शैलीतले स्मिता पाटील - शबाना आझमी यांचे पोर्ट्रेट आहे. मागच्या दोन स्मिता पाटील - सर्वात मागची निशांतमधली, पुढची अर्थ मधली. पुढच्या दोन शबाना आझमी - मागची निशांतमधली, पुढची अर्थ मधली. मोर म्हणजे पुरुष. ;)
  • Log in or register to post comments

चित्रकाराच्या नजरेतूनः जाणिजे चित्रकर्म

चित्रगुप्त
Mon, 08/08/2011 - 00:12 नवीन
सर्वांनी अतिशय आत्मियतेने प्रतिसाद दिले, अत्यंत उद्बोधक, मनोरंजक विचार मांडले, याबद्दल सर्वांचे आभार. चित्रकाराच्या नजरेतूनः जाणिजे चित्रकर्म असा लेख लवकरच येतो आहे.
  • Log in or register to post comments

आणि हो

सहज
Mon, 08/08/2011 - 07:32 नवीन
धाग्यात सहभागी झालेल्या सर्वांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा