Skip to main content

गाडी वापरताना तुम्ही पेट्रोल वाचवण्यासाठी काय काय करता?

लेखक सही रे सई यांनी शुक्रवार, 15/07/2011 18:04 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 2260
प्रतिक्रिया 44

प्रतिक्रिया

मी म्हणतो, गाडी चालवायची ती पेट्रोल संपवण्याकरता ना?

In reply to by विनायक प्रभू

पेट्रोल चे पैसे कोण देतं ह्यावर डिपेंड आहे. स्वतःचे पैसे असल्याने वरील सर्व करतो. पुढे मागे कंपनी द्यायला लागली पैसे कि एकटाच फिरणार गाडीतुन. बाकीच्यांना भिजुनदे पावसात.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कश्यावरून सविताबाई हेयरकट घेत असतील?;) मी तर म्हणते आता सगळ्या बायांनी (अगदी माझ्यासारख्या मुलींनीही) जुन्या पद्धतीचे अंबाडे घालावेत. घरपोच येणार्‍या फुलपुडीतून शेवंतीच्या फुलांची वेणी करावी व घालावी. घरपोच येणार्‍या किराणा सामानातून स्वयंपाक करावा. यामुळे आपल्याला घराबाहेर पडण्याची सोय उरणार नाही. मग स्त्रीमुक्तीवाले त्यांचे कार्य करतीलच!. (सर्वांनी हलके घेणे).;)

In reply to by रेवती

त्यापेक्षा आजकालच्या मॉडर्न बायांनी आपली संस्कृती जपली आणी एकमेकीच्या झिंज्या ओढून मारामार्‍या केल्या तर हे प्रश्नच सुटतील. संस्कृतीप्रेमी निळोबा टकLe हा प्रतिसाद वरील शृंखलेला असून कोणाही प्रतिसाद लेखक/लेखिकेला नाही.

In reply to by Nile

त्यापेक्षा आजकालच्या मॉडर्न बायांनी आपली संस्कृती जपली आणी एकमेकीच्या झिंज्या ओढून मारामार्‍या केल्या तर हे प्रश्नच सुटतील.
अशी निंदा आपण नसती बॉ सहन केली. ;)

In reply to by माझीही शॅम्पेन

ते नेमकी कोणती पाशवी देवता हेअर कट साठी येते आहे त्यावर अवलंबुन आहे..! - इंट्या द चीफ नाव्ही, पाशवी हेअर कटिंग सलुन.

In reply to by श्रावण मोडक

प्रति रा.रा. श्रावण मोडक, तुम्ही निंदेचं काय बोलताय! अर्ध्या दुनियेला काय काय सहन करावं लागतं हे तुम्हाला काय हो कळणार?

In reply to by रेवती

आणि अ‍ॅल्युमिनीयम फॉईलचे कलाबतू बनवून ते शेवंतीच्या वेणीत अडकवावे. स्वाती ताई, कुठे गं गेलीस?

In reply to by रेवती

या एका प्रतिक्रियेमुळे सर्व वाचकांचे लक्ष मूळ विषयापासून भरकटल्याचे या खालच्या प्रतिक्रिया वाचल्यावर सहज लक्षात येते. अशा प्रकारे जर वाहन ही आपल्या मूळ रस्त्यापासून भरकटले तर किती इंधन वाया जाईल? सबब इंधन वाचविण्यासाठी - वाहन आपल्या प्रस्तावित मार्गापासून भरकटू देऊ नका हा अजून एक उपाय सूचवावासा वाटतो.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

पेट्रोल ला पर्याय खूप आहेत पण हे राजकारणी आणि पेट्रोल कंपन्या याना ते पर्याय बाजारात यायला नको आहेत उदा: बटरी वर चालणारी कार , कोम्प्रेस्सेड ऐर वर चालणारी कार,अल्कोहोल वर चालणारी कार शिवाय हे पेट्रोल / डीझेल सरकार ने कार वाढवून महाग केलेले आहे .मध्यंतरी वाचले होते कि भर समुद्रात स्मगलिंग चे डीझेल १२ ते १५ रुपयाने मिळत आहे -मासेमारी करणारे ते घेत आहेत --कुठे ५० ने मिळणारे सरकारी डीझेल व कुठे हे स्मगलिंग चे १२/१५ ने मिळणारे डीझेल

In reply to by सविता

तेव्हाच..... तुम्ही फक्त तुमच्या खिश्याची पर्वा करता. पण तो दुकानदार फ्री होम डिलीव्हरीच्या नावाखाली वस्तुंचे/पदार्थींचे भाव वाढवतो आणि त्याचा भुर्दंड बिचार्‍या बाकिच्यांनाही सहन करावा लागतो. होय का नाय? :)

In reply to by विनायक प्रभू

मर्सिडिझ चालवताना कोणी मायलेजचा विचार करतं का ?

ड्रायव्हींग ची भीती बसल्यामुळे गाडी चालवतच नाही. बसनेच सर्वत्र संचार असतो. पण पुढील उपाय लोकांनी करावे असे वाटते - (१) कार-पूल ( गाडी शेअर करणे) (२) जास्तीत जास्त चालणे (३) मॉलमध्ये गेल्यावर जवळात जवळ जागा मिळावी म्हणून पंधराशेसाठ घिरट्या घालून पेट्रोल जाळण्यापेक्षा , दूर गाडी लावणे ज्यायोगे शरीराचेदेखील चलनवलन होईल. (४) नेहेमी बाहेर जाताना यादी करणे ज्यायोगे परत परतच्या खेपा वाचतील. यादी करण्याची सवय खूप चांगली. (५) हातासरशी, भरपूर सामान आणून टाकणे ज्यायोगे परत परतच्या खेपा वाचतील. (६) कामात , काम उरकून घेणे वगैरे!!!!!!!!!

पहिला पर्याय नेहमी आवर्जून करतो, पण त्याचबरोबर गाडी शेअर करण्याच्या भानगडीत कधीच पडत नाही कारण दया येवून ज्याला आपण गाडीवर बसवु तोच आपल्या पाठीला सुरा लावणार नाही हे कशावरुन..

In reply to by किसन शिंदे

किसना... त्यांचे म्हणने आहे की ओळखीच्या मानसाबरोबर गाडी शेअर करता का? लिफ्ट देण्याचा प्रश्न निराळा आहे.....

कारला धक्का मारुन चालवतो. व्यायमही होतो आणि पेट्रोल सुद्धा वाचतं! - इंट्या फ्युअल (वोडका!).

मी मॉर्निंग वॉकला पायी जातो. ;) शिवाय पेट्रोल वाचवण्यासाठी फेरारी न वापरता इंडिका वापरतो. सचिनलाही मी हाच सल्ला दिला म्हणून त्यानेपण फेरारी विकून टाकली आहे.

शक्यतो लोकाची गाडीच वापरतो. जाताना धम्या बरोबर जातो आणि येताना श्रामोंबरोबर येतो. काटकसरी परा

In reply to by परिकथेतील राजकुमार

हा उपाय नंबरी आहे. लगेच अंमलात (म्हणजे हल्लीच्या मराठीमधे सांगायचं तर 'कार्यवाहीत', भलता अर्थ लावू नये) आणतो आहे. आम्ही जाताना श्रामोंबरोबर जाऊ नि येताना धम्याबरोबर येऊ. (मॅक्सिमम युटिलायजेशन ऑफ अवलेबल रिसोर्सेस - कणेकर)

आपण सूचविलेले सर्वच पर्याय योग्य आहेत पण तरीही आपल्या दोन चाकी अथवा चार चाकी गाडी मधे जागा असेल तर दुसर्‍याबरोबर शेअर करणे या पर्यायास कुणीच मत दिले नाही हे पाहून आश्चर्य वाटले. असो या शिवाय अनेक उपाय वाहनाच्या ओनर्स मॅन्युअल मध्ये दिलेले असतात जसे की, १. अनावश्यक ब्रेकिंग टाळा २. वाहनाचा वेग ताशी ४० ते ६० किमी ठेवा (नॅनो अपवाद - त्यांची रेंज यापेक्षा जास्त आहे) ३. टायर्स मध्ये हवेचा दाब योग्य ठेवा ४. अगदी सकाळी / पहाटे (सूर्योदया पूर्वी / सूर्य फारसा वर आला नसेल तेव्हा) किंवा सायंकाळी (सूर्य मावळल्यावर) इंधन भरा आणि शक्यतो टाकी पूर्ण भरून घ्या. ५. दिवसा वाहन सावलीत उभे करा.

... सिग्नल वर असताना नेहमी गाडी बंद करणे >> हा पर्याय उचित आहे का? मला वाटते, गाडीचे इंजिन चालू होताना ती थोडे इंधन जास्त घेते आणि इंजिन तसेच सुरु ठेवल्यास तितका फरक पडत नाही. कोणी ह्या शास्त्रातले असल्यास ह्या पर्यायाबद्दल आपले मत द्यावे... आणि भारताबाहेर सिग्नलला गाडी बंद करायला परवानगी नसते.. त्यामुळे तो पर्याय लागू पडणार नाही. अजून एक पर्याय म्हणजे .. लाल सिग्नल लांबून दिसल्यास acclerator वरील पाय काढणे.. म्हणजे hard brake मारावा लागणार नाही... कमीत कमी hard brake म्हणजे इंधनाची बचत.. तेवढ्यात सिग्नल हिरवा झाला तर brake मारायची गरज पडत नाही... तसेच .. अवास्तव वेग अचानक वाढवणे इंधन जास्त घेते त्यामुळे वेग gradually वाढवावा.. acclerator वरील पाय मधे मधे काढल्यास गाडी तिच्या गतीवर काही काळ चालते... इंजिन 'ऐकणे' ह्यासाठी फायद्याचे ठरते. माझे मतदान .. जवळच्या ठिकाणी जायला पायी जाणे.>>

In reply to by मर्द मराठा

अजून एक पर्याय म्हणजे .. लाल सिग्नल लांबून दिसल्यास acclerator वरील पाय काढणे.. म्हणजे hard brake मारावा लागणार नाही... कमीत कमी hard brake म्हणजे इंधनाची बचत.. तेवढ्यात सिग्नल हिरवा झाला तर brake मारायची गरज पडत नाही... तसेच .. अवास्तव वेग अचानक वाढवणे इंधन जास्त घेते त्यामुळे वेग gradually वाढवावा.. acclerator वरील पाय मधे मधे काढल्यास गाडी तिच्या गतीवर काही काळ चालते... इंजिन 'ऐकणे' ह्यासाठी फायद्याचे ठरते.
अश्या वेळेस आपण जेव्हा एक्सीलेटरला परत टच करतो त्या वेळेस जास्त पेट्रोल जाते. न पेक्षा पाय एक्सीलेटवर कॉन्स्टंट ठेवणे महत्त्वाचे, अर्थात हे ही एक स्कील आहेच म्हणा.. पण मग सगळ्यात चांगला उपाय म्हणजे क्रुझ कंट्रोल असलेली कार वापरणे. अधिक माहिती http://en.wikipedia.org/wiki/Cruise_control इथे पाहता येईल.

In reply to by इंटरनेटस्नेही

थोडासा असहमत आहे. ज्या रस्त्यावर सिग्नल आहे अश्या रस्त्यावर क्रुझ कंट्रोल ने गाडी चालवू नये असे माझे मत आहे. क्रुझ कंट्रोल बंद करायला ब्रेक किंवा क्लच दाबावा लगतोच. :) क्रुझ कंट्रोल मोठ्या अंतरासाठी बरे आहे. पण स्वानुभवाने (व काही मित्रांचेही) सांगतो की, क्रुझ कंट्रोल मधे गाडी कमी मायलेज देते(साधारण ०.५ किमी/लिटर).

In reply to by प्रभो

पुरेपूर सहमत... क्रुझ कंट्रोल तितक्या फायद्याचा नाहीये... मला लांब रस्ता मोकळा मिळाला आणि गाड्या जास्त नसतील रस्त्यावर तर मी accelerate करायचा कंटाळा म्हणून क्रुझ वापरतो.. ;-) क्रुझ कंट्रोल बंद करायला ब्रेक किंवा क्लच दाबावा लगतोच>> माझ्या गाडीत नाही.. मी फक्त बटण दाबले की चालू/बंद होते... ब्रेक मारावा लागत नाही.

In reply to by मर्द मराठा

शक्यतो पावसाळ्यात क्रुझ कंट्रोल ऑन ठेवू नये..

In reply to by इंटरनेटस्नेही

मी क्रुझ कंट्रोल असलेली गाडी वापरतो शिवाय मायलेज चा दर्शक बार आहे... खाली दाखवल्याप्रमाणे 'mpg 0 -60' बार जेव्हा पुर्ण होतो तेव्हा मी गाडी उत्कृष्ट मायलेज नी चालवत असतो... खालील छायाचित्र मी गाडी accelerator वरील पाय काढून चालवत असतानाचे आहे... तुम्ही सांगीतल्याप्रमाणे accelerator वर constant पाय ठेवून चालवल्यास तो बार निम्मा किंवा कमी दर्शवतो... म्हणजे कमी मायलेज. ... accelerator वर पाय देणे म्हणजे पेट्रोल जाळणे.. तेव्हा जेव्हा गाडीचा वेग जरुरीपेक्षा कमी होतोय असे जाणवले की तरच मी accelerate करतो. वरील बार वरून मला कळते की बरोबर मायलेज राखतोय.. ह्याच इंडीकेटरवर मला कळते की पेट्रोल भरल्यावर त्या fill-upचा मायलेज काय आहे आणि अजुन किती मैल गाडी उरलेल्या इंधनात जाऊ शकेल.

कालच फेरारी विकून टाकली... झेंगाटच नको म्हणून. बाकी एखादे पर्यायी इंधन शोधाव जसंकी... खोबरेल तेल इत्यादी... ;) मूळातच पेट्रोल आहे म्हणूनच संपवल जातय. ते संपल की इतर पर्याय शोधले गेले असतीलच.. आता फक्त पैशाचा माज येऊ द्यायचा नाही, विषेशतः जेव्हा आपल्याच देशात जेव्हां दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणारी इतर लोकंही दिसतात तेव्हां, या एकमेव उद्देशानं पेट्रोल वाचवायला भार लावायचा, इतंकच.. वैयक्तीक मत विचाराल तर जाळा.. मनसोक्त पेट्रोल जाळा... आजचं मरण उद्यावर ढकलणे.. उद्याची चिंता करत जगणं हे काय जगणं आहे ?.. पेट्रोलवर उत्तम पर्याय नक्कीच निघाला असेल, तो आता निघत नाहीये कारण अर्थव्यवस्थेमधे विचीत्र उलाढाली होतीलं.. इतकचं.... पण जेव्हां हे घडणं अर्थव्यवस्थेची अटळ गरज बनेल तेंव्हा.......

In reply to by आत्मशून्य

खोबरेल तेल !!! ते स्वस्त आहे का? त्यापेक्षा सोलर एनर्जी वा वाफेच्या इंजीना बद्दल आपलं काय मत आहे?

In reply to by आत्मशून्य

मी बहुतेकवेळा सिग्नलवर गाडी बंद पाडतो. नाईलाजाने ती पोलीसाला ढकलावी लागते. साधारणपणे पोलीसाने एक सिग्नलवर ढकलेली गाडी दुसर्‍या सिग्नलपर्यन्त चालत. ती तशी चालली नाही तर मागील ट्रकवाला पुढच्या सिग्नलपर्यन्त ढकलतो. हायवेवर असताना देखील गाडी मध्येच बंद पाडतो. एखाद्या ट्रक ला रीक्वेस्ट करून टो करुन पुढे नेतो. अशा रितीने मे एपेट्रोल बचत करून इंधन वाचवतो आणि राष्ट्रीय सम्पत्तीचा अपव्यय टाळतो