डाळीचे तोय व कारल्याच्या काचर्या.
आज शनिवार घरात दोघांचेही उपास. घरात भाजीही नव्हती.पाऊसामुळे बाजारात जायचा कंटाळा आला
होता.मग भाजीला फाटा देऊन घरात एक कारलं होतं त्याच्या काचर्या(कचर्या काय हवं ते म्हणा) करायच्या
ठरवल्या.
१)डाळीचे तोय.
साहित्यः-एक वाटी तुरीची डाळ.
४-५ हिरव्या मिरच्या.
अर्धा इंच आले(आवडत असल्यास थोडं जास्त घातलं तरी चालेल).
मिठ.
एक टेबलस्पून तूप.
मोहरी,हिंग व १०-१२ कडिपत्त्याची पाने फोडणीसाठी.
२-३ सुक्या लाल मिरच्या तुकडे केलेल्या.
अर्धा चमचा हळद.
कृती :-तुरीच्या डाळी थोडे जास्त पाणी घालून त्यात हिरवी मिरची.बारीक चिरलेले आले(तोंडात आलेले आवडत
नसल्यास ठेचून घातले तरी चालेल) कुकरला लावावे.डाळ शिजली की भांड्यात काढून त्यात मिठ घालावे.
पाच मिनिटांनी उकळी आली की खाली काढावी.पळीत किंवा छोट्या कढईत तूप घालून तापले की त्यात
मोहरी,हिंग,कडिपत्ताची पने,सुक्या लाल मिरच्याची फोडणी करावी व ती शिजलेल्या डाळीत घालावी व
झाकून ठेवावे्ए तोय जरा पातळसरच असते.गरम तूप-भाताबरोबर लिंबू पिळून तोय वाढावे.
2)कारल्याच्या काचर्या.
साहित्यः- कारली.
हळद
लाल तिखट
मिठ
रवा व कणिक (ओपास नसल्यास तांदळाची पिठी घेतली तरी चालेल)
तेल
कृती :-कारली उभी चिरून आतील बिया काढून टाकव्या.चिरलेल्या कारल्याला धुवून मिठ लावून अर्धा तास ठेवावे.
कारल्याला सुटलेले पाणी काढून टाकावे.यामुळे कारल्याचा कडवटपणा निघून जाईल. नंतर त्याला हळद व
तिखट लावावे.रव्यात एक चमचा कणिक घालावी व त्यात घोळवून तेलात चुरचुरीत तळावे.

वाचने
5057
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
मस्त ग ...दुसरे काय सोलकढी
In reply to मस्त ग ...दुसरे काय सोलकढी by निवेदिता-ताई
सोलकढीची कृती मुडदुश्याची
मस्त
झक्कास्स दिसतायत
In reply to झक्कास्स दिसतायत by यकु
थोडं अस्सच म्हणतो.
मस्तच
कारल आहे हे सांगीतल म्हणुन..
''मग भाजीला फाटा देऊन घरात एक
In reply to ''मग भाजीला फाटा देऊन घरात एक by ५० फक्त
+१
कारल्याच्या काचर्याची कृती