Skip to main content

देल्ही बेलीज फार बीभत्स आहे काय??

लेखक ईश आपटे यांनी रविवार, 17/07/2011 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
आजच एका वृत्तपत्रात वाचल, रमेश देव ह्यांनी आपल्या मुलाच्या देल्ही बेलीज ह्या महान कलाकृती बद्द्ल नाराजगी व्यक्त केली. व हा घाणेरडा प्रकार काय आहे असा त्याला जाब विचारला. भारतीय सेन्सॉरचा मी ही काही फॅन नाही. दिग्दर्शकाला पूर्ण स्वातंत्र्य असल पाहिजे ह्या मताचा मी आहे. व प्रौढ विनोद व बोल्ड प्रणय दृष्ये हिन्दी व मराठी चित्रपटात दाखवली गेली पाहिजेत ह्या मताचा मी आहे. पण देल्ही बेलीज हा कलात्मकते मध्येच कमी पडतो , व त्यामुळे निव्वळ शिवीगाळ व संडास दाखवण्याकरता चित्रपट काढलाय असा समज होतो. थेटर मध्ये खीखी करणार्‍यांच्या विनोद बुध्दीची अक्षरश: कीव येते. आमीर खानची तो एक पर्फेक्टनिस्ट व इन्टेलेक्च्युअल आहे ही प्रतिमा ह्या वेळेस प्रथमच खंडीत होते. व संडासजोक्स लोकांना दाखवणे म्हणजे काही नवीन क्रांती करणे हा त्याचा दावा फोल ठरतो... हा चित्रपट आपल्याला कलाकृती म्हणून कसा वाटतो ?? व ह्यातील विनोद आपण सहन करु शकला का ??? अवांतर- बर्‍याच मराठी कलात्मक चित्रपट पाहाणार्‍यां रसिकांना हा चित्रपट कसा वाटला ह्याची ही उत्सुकता आहे

वाचने 20650
प्रतिक्रिया 84

प्रतिक्रिया

In reply to by नितिन थत्ते

जाउ द्या हो थत्ते. :-( भोगवादी इंडीयानिवासींना खर्‍या भारताशी व भारतीयांच्या सुख दु:खाशी काहीही घेणे देणे नाही हेच पुन्हा पुन्हा सिद्ध होते आहे. कशाला तुम्ही आरसा दाखवता? तुम्हालाच संस्थळाची बदनामी करतो म्हणतील लोक.

In reply to by सहज

तुम्हालाच संस्थळाची बदनामी करतो म्हणतील लोक.
सहमत आहे. आधीच त्यांना संघाची बदनामी करणारे म्हणतातच. *हाणतायत आता थत्ते चाचा*

In reply to by सहज

भोगवादी इंडीयानिवासींना खर्‍या भारताशी व भारतीयांच्या सुख दु:खाशी
हा इंडीया काय प्रकार आहे ? हिंदी ज्याचा अपभ्रंश गोर्‍यांनी इंडी असा केला, व मागे त्यांच्या सवयीनूसार ए लावला... जस चीन ला मागे ए लावला म्हणून चायना झाला अथवा राम च्या मागे विंग्रजीत ए लावून रामा केलं जातं ... तसचं इंडीच्या मागे ए लागून इंडीया झाला.. मग त्या लोकांना जो उच्चार करायचा असेल तो करू देत आपण त्यांचा उच्चार हिंदी व हिंदू वा हिंदूस्थान कधी करणार.. तसही विग्रजीत स्पेलींग फाट्यावर मारल्याने आपल्याला काय फरक पडतो ? विंग्रजीतही इंडीया म्हणने हाच मूळात एक जोक आहे. किंव्हा सरळ भारत म्हणूया, कीती सूदर नाव आहे ते वापरायला. बाकी चालूदे... सर्वप्रतिक्रीया रोचक.

In reply to by आत्मशून्य

हा इंडीया काय प्रकार आहे ?
काय हे आत्मशून्य हा प्रश्न तुम्हाला पडावा ? गेले कित्येक महिने / वर्षे भारतात आता भारताला मानणारे आणि इंडीयाला मानणारे असे दोन गट पडू लागले आहेत असे मिपाचे विचारवंत गळे फाडून सांगत आहेत. तुमचे लक्ष कुठे आहे ? हे वाचा बरे जरा.

In reply to by परिकथेतील राजकुमार

वाचून डोले पाणावले, तिथलं पूढील वाक्य तर लय भारीच.
One Chinees or Russian or Japnees leaders never speaks in English. But Indian leaders feels proud to speak in English in any International forum.

In reply to by नितिन थत्ते

+१ हेच म्हणायला आलो होतो, हल्ली मिपाकर सुमार दर्जाच्या फडतूस चित्रपटांचे समिक्षण झेलत असतात, असे चित्रपट त्या पुर्वी पत्र्याच्या तबकडीत काचेच्या भिंगातून पहायचो तसे दोन हात लावून पहाणयाच्या लाकयीचे नाहित, चित्रपट आवडला नाहितर लोक बघणार नाहीत, जाईल डब्यात, उगा असं आहे तसं आहे, म्हणून चित्रपटांचे मार्केटिंग चालू आहे . { बोलपटातील बोलबच्चन कुमार }

ह्या धाग्याचा उद्देश नव्या प्रौढ विनोदावर साधक बाधक चर्चा व्हावी, असे विनोद असलेले व प्रौढ दृष्ये असलेले चित्रपट हिन्दी किंवा मराठीत यावेत का ?ई. विषयांवर देवाणघेवाण व्हावी हा होता. पाहतो तर बरीच वयस्कर मंडळी प्रौढ पांचट चित्रपट आहे म्हंटल्यावर मुद्दामुन वेळ काढून बघून आलेली दिसतात. आणि आपण पुन्हा गलिच्छ शिव्या देण्यात डेरिंग दाखवतो हे सिध्द करण्याचा बालिश प्रयत्न करत आहेत(जसा बालिश प्रकार दिग्दर्शकाने केला आहे) काय हा अभिरुचीचा अधःपात :) अवांतर- वरती एक चित्रपटसृष्टीविषयी अज्ञ माणसाने रमेश देवचा काय संबंध असा प्रश्न विचारला आहे. तर अभिनय देव हे रमेश देव ह्यांचे सुपुत्र आहेत.

भुवयांइतकाच जाड आवाज असलेला आणि त्याहून शतपट बकवास काम करणारा ’इम्रान खान’ नावाचा उच्छाद सहन करण्याची ताकद नसल्यामुळे त्याचे वाईट, बरे किंवा चांगले (अतिशयोक्ती!) चित्रपट पाहतच नाही आपण. त्यादिवशी ’मुंबई-पुणे-मुंबई’ पाहिला. शिव्यांशिवाय आजचं युथ चित्रीत करणं हे वास्तवतेपासून किती कोसो दूर आहे याची जाण राजवाडेसारख्या माणसाला नसल्याची खंत वाटली. असो... भारी समर्थ

In reply to by भारी समर्थ

इम्रान खान ह अ‍ॅक्टर नाहीच्चे! त्याच्या आईनं आमिरला रक्षाबंधनाच्या दिवशी (?) गळ घातली असेल या बाळाला शिनेमात वेंट्री करायला. मग भैय्याने राखी का बंधन निभवायला याला शिनेमा दिला असं मला वाट्टय.;) दिल्ली बेलीनंतरच मला हा मनुष्य अस्तित्वात असल्याचा साक्षातकार झाला. आधी तो इम्रान हाश्मी म्हणजे इम्रान खान वाटत होता. बाकी बॉम्बे-पूना-बॉम्बेबद्दल सहमत.

कॉपी करणे या शब्दाचा अत्यंत चुकीचा अर्थ वरील काही प्रतिसादांमधे लावला गेला आहे असे वाटते आहे. या हिशोबाने 'द फिशरमन' वरुन प्रेरित होऊन 'एका कोळियाने' लिहिणारे पु.ल. देशपांडे; मार्क ट्वेन, बर्नार्ड शॉ, मोलियर आणि नोएल कॉवर्ड ( ज्याच्या निव्वळ संवादाच्या सामर्थ्यावर नाटके लिहिण्याच्या पद्धतीची 'साष्टांग नमस्कार' मधे सही सही नक्कल केलेली आहे असे आचार्य अत्रे यांनी स्वतः 'कर्‍हेचे पाणी' मध्ये लिहिलेले आहे.) आणि राम गणेश गडकरी याम्च्या लिखाणावरुन प्रेरणा घेऊन लिहिणारे आचार्य अत्रे किंवा लोकमान्य टिळक आणि आचार्य अत्रे यांच्या शैलीमध्ये शिवराळपणा मिसळून लिखाण करणारे बाळ ठाकरे हे सगळेच साहित्यचोर ठरतील. मला स्वतःला तरी तसे अजिबात वाटत नाही. मागे एक्दा कोणीतरी 'मुंबई-पुणे-मुंबई' आणि 'अगबाई अरेच्चा' हे चित्रपटदेखील कोणत्यातरी चित्रपटाची कॉपी आहे असे लिहिलेले होते हे वाचून अत्यंत आश्चर्य वाटले होते. 'मुंबई-पुणे-मुंबई' हा चित्रपट तर निव्वळ संवादांवर आधारलेला आहे तर मग एक भारतीय तरुण-तरुणी आणि परदेशी तरुण-तरुणी यांच्यातील संवादांचे संदर्भ दूर्दूरपर्यंत तरी मॅच होऊ शकतील काय ? मला वाटतं की असे क्रायटेरिया लावायचे ठरवले तर जगातील ऐंशी टक्के कलाकॄती कॉप्याच ठरतील.