शनिवार रविवार जोडून सुट्टी आली की.. कपाटातल्या 'ब्यागा' उड्या मारायला लागतात...उगाचच कॅमेरा फ्लॅश मारतो आहे असे वाटायला लागते... पोटापाण्यासाठी मायदेश तात्पुरता सोडावा लागला तरी भटकण्याची खुमखुमी स्वस्थ घरी बसून देत नाही. अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन ४ जुलै आणि तोही सोमवार म्हटल्यावर दोन आठवडे आधीच सहचारीणीशी मसलत करून गूगल नकाशावर स्थळ दर्शन सुरु झाले.... आम्ही राहतो रिचमंड, व्हर्जिनिया येथे गेली ३.५ वर्षे... त्यामुळे एक मोठ्ठ्या परिघातली सगळी शहरे, गावे, डोगंररांगा, समुद्रकिनारे पाहून झाले आहेत... म्हणून परिघाबाहेर जाणे क्रमप्राप्त होते... तेही विमान खर्चाची चाट खिशाला बसून न देता... परीघा बाहेरची दोन ठिकाणे ठरली ती म्हणजे बोस्ट्न आणि शिकागो ... बर्याच काथ्याकूटानंतर शिकागो ठरले...
शिकागो म्हणजे ८०० मैल लांब (~१३०० कि.मी.).... म्हणून अजून आधी नंतर एकेक दिवस रजा टाकली.
जाताना वाटेतले पिट्सबर्ग करायचे म्हणजे एक रात्रीचा थांबा आणि देवदर्शन (तिथली हिंदू देवळे प्रसिध्द आहेत) दोन्ही करता येईल असे ठरले.
हे पहिले मंदिर --> हिंदू-जैन मंदिर, पिट्सबर्ग - एकवीस वर्षे जुने असे हे मंदिर 'नाग्रदी' स्थापत्यशास्त्रानुसार बांधले आहे (संदर्भः मंदिराचे संकेतस्थळ)
श्री वेंकटेश्वर मंदिर - हे पस्तीस वर्षे जुने असून वेंकटेश्वराची मुर्ती मंदिराच्या मध्यभागी गर्भगृहात आहे. इथे मंदिरात पुजारीकाकांनी जातीने प्रत्येक परिवाराकडून गोत्रादी चौकशी करून पुष्पांजली मुर्तीला वाहिली, हा अनुभव खरच सुखद होता.
मंदिराचे दर्शन आटोपून शिकागोच्या दिशेने प्रवास सुरू केला... अजून ८ तासांचा पल्ला गाठायचा होता...
रात्री ११-१२ च्या सुमारास शिकागोच्या मुक्कामी पोहोचलो.
दुसर्या दिवशी सकाळी युनियन स्थानकात गाडी दिवसभरासाठी उभी करून (रास्त भाव आणि सुरक्षित म्हणून) शहरात फिरायला 'उडी आत/उडी बाहेर' बस पकडली.. ती अशा शहरात फिरायला बरी पडते म्हणुन आधीच तिकिटे काढुन ठेवली होती.... आणि केली शिकागोच्या भटकंतीला सुरुवात...
वाटेत भेटली 'म्हस'... म्हशीला शिंक आणायच्या प्रयत्नात आमची कार्टी...
लेकीला कबूल केल्याप्रमाणे पहिला थांबा 'मिलेनिअम पार्क' मधील क्राऊन कारंजी होता...
तिने मस्तपैकी चिंब भिजून घेतले...
इथे तर भिजायला आबालवॄध्द् जमलेले... जत्रेचे स्वरूप आले होते...
भिजून-सुकून, पोटपुजा आटोपून जॉन हॅनकॉक ह्या १०० मजली इमारतीच्या दिशेने आम्ही निघालो...
संध्याकाळी जॉन हॅनकॉक इमारतीवरून संध्याप्रकाशात हळूहळू प्रकाशमान होणारे शिकागो....
थोडा अजुन वेळ थांबून टिपलेले रात्रीचे शिकागो....
हा तर थोडाफार मुंबई-मरिन लाईन्स चा राणीच्या चमचमत्या कंठ्हारासारखा वाटला...
दुसर्यादिवशी शिकागो मधील सर्वात उंच इमारतीवर (विलीस टॉवर्स्/सीअर्स टॉवर्स्) स्वारी केली... एकशे तिसर्या मजल्यावरून काढलेली ही काही छायाचित्रे ..
आणि हे त्या इमारतीचे खालून घेतलेले छायाचित्र... ह्या इमारतीचे स्थापत्यकार फाजलर खान नावाचे गृहस्थ आहेत हे समजून थोडे आश्चर्य वाटले... ह्या इमारतीची रचना सिगारेटसच्या बंडलावरुन योजलेली आहे... खालील छायाचित्रावरून ते स्पष्ट होतेय. मधल्या दोन सिगारेटस सर्वात उंच आहेत...
नंतर 'उडी आत/उडी बाहेर' बसमधून शहर पाहीले... मुख्य आकर्षण होत्या स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असलेल्या विविध इमारती...
ही एका महिला स्थापत्यकाराने (जीन गँग) आकारलेली सर्वात उंच इमारत (अॅक्वा) ...
शहरात फिरताना जाणवले की इथे ही पुतळ्यांची कमतरता नाही...
संध्याकाळी ५.३० ची शिकागो स्थापत्यशास्त्र संस्थेच्या नौकेने सैर केली.. ही नौकानयन व्यवस्था ह्या संस्थेने शिकागोमधील विविध इमारती आणि त्यांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व पर्यटकांना दाखवण्यासाठी कार्यरत ठेवली आहे.
नौकाविहार आटोपून आम्ही मोर्चा वळवला 'ढग द्वार' (क्लाउड गेट) कडे...
हा स्थापत्याचा अविष्कार जन्माने भारतीय असलेल्या ब्रिटनस्थित स्थापत्यकार अनीश कपूर ह्यांनी केलेला आहे...
वजनाने ११० टनी असा हा स्टेनलेस स्टीलचा 'दाणा' शिकागोच्या मध्यवर्ती भागातील मिलेनिअम बागेत आहे.
ही मिलेनिअम बागेतली अजुन काही स्थापत्ये ...
'जे प्रित्झेकर सभागृह'...
'क्राऊन कारंजे'...
शेवटच्या दिवसाची सकाळ... पुन्हा एकदा 'स्टीलचा दाणा' पाहायचा मोह आवरला नाही...
आता फिरायचे राहिले होते ते 'झगमगत्या मैलभर रस्त्या'वर (magnificient mile)
मायलेकी हर्शेस आणि चिराडेली मधे बर्याच वेळ रमल्या...
हर्शेस मधे लेकीची चंगळ झाली ... चॉकोलेट्स (चकट्फू) आणि 'गांधी' टोपी मिळाली ... मग काय लगेच पोज द्यायला तयार..
आणि चिराडेली मधले आईस्क्रिम ...
शेवटच्या दिवसाचे शेवटचे आकर्षण होते ते ... अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाचे आणि आतिषबाजीचे ... मग आमचा कबिला पोहोचला .. 'नेव्ही धक्क्या'वर.... इथे अलोट गर्दी झाली होती फटाक्यांची आतिषबाजी पाहायला....
थोडा वेळ असल्याकारणाने लेकीची आवडती रिंगणझुल्यावरची स्वारी झाली....
गर्दीचा अंदाज गेल्या वर्षीपर्यंत आलेल्या लोकांनी लिहीलेल्या प्रवासवर्णनावरून आला असल्याने आम्ही आधीच 'फटाका विशेष' नौकेचे (fireworks cruise) आरक्षण केले होते...
रात्रीचे ९ वाजले होते, सुंदर संधीप्रकाशात दूरवर शिकागो चमचमत होते...
आमच्या नौकेच्या कप्तानाने आमची नौका अगदी मोक्याच्या जागी आणून स्थिर केली.. बोटीवर छान संगीत चालू होते ... काही वेळातच तो प्रकाशसोहळा सूरू झाला ...
शेवटची निरोपाची आतिषबाजी तर डोळ्यांचे पारणे फिटवणारी होती...
शिकागो नजरेत साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो... ह्यावेळेस मधे थांबा घेणार नसल्यामूळे सकाळी लवकर निघालो... आणि मजल दरमजल करत (४ राज्ये) पार करत रात्री रिचमंडला सुखरुप पोहोचलो.
आमच्या गाडीने ५०००० मैलांचा दगड पार केला ह्या सफरी दरम्यान... आणि ह्या रिचमंड-शिकागो-रिचमंड प्रवासाचे असे १७४३ मैल (२८०५ कि.मी.) कापले होते.
'ब्यागा' पुन्हा आत गेल्यात... पुढच्या 'लांब सप्ताहांता'ची वाट पाहात....

| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
8119
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
घर बसल्या शिकागोची उत्तम
सुंदर सफर
प्रकाटाआ
शिकागो दर्शन आवडले. आपल्या
+१ सुंदर शिकागो दर्शन!
In reply to शिकागो दर्शन आवडले. आपल्या by परिकथेतील राजकुमार
मस्त
मस्त्,अमेझिन्ग फोटो आहेत
छान सफर
भारी!!
मस्त सफर! मस्त वर्णन.
सफर आवडली.. - (कधीतरी
जुन्या आठवणी जाग्या झाल्या...
+१
In reply to जुन्या आठवणी जाग्या झाल्या... by राजेश घासकडवी
जायलाच हवे
मस्तच आलेत फोटो! सगळ्यात
मस्त फोटो आणि माहिती, सगळ्यात
लांब लांब गाडी चालवण्याची आवड
In reply to मस्त फोटो आणि माहिती, सगळ्यात by ५० फक्त
प्रवासवर्णन , फोटो सर्वच मस्त
धन्यवाद.. प्रवासाची आखणी
In reply to प्रवासवर्णन , फोटो सर्वच मस्त by मस्तानी
छान फोटोज... स्पेशली शेवटचा,
तुमचीही सफर आवडली
In reply to छान फोटोज... स्पेशली शेवटचा, by अंतु बर्वा
नक्कीचं... मित्रमंडळी म्हणजे
In reply to तुमचीही सफर आवडली by मर्द मराठा
छान ती शिकागो सहल.
मराठीतून शाळा शिकलोय ..
In reply to छान ती शिकागो सहल. by दीप्स
hop on-hop off = तळ्यात
In reply to मराठीतून शाळा शिकलोय .. by मर्द मराठा
छान
घरबसल्या शिकागो दर्शन झाले
छान..
मस्त..