निरोप नाही, फक्त आभार!
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
परवाच्या बाँबस्फोटासह नुकत्याच घडून गेलेल्या क्लेशदायक घटना ऐकल्या; अगतिक, हताश व्हावं अशा जळजळीत कविता वाचल्या, लेख आणि प्रतिसाद वाचले, आणि परदेशात नेहेमीच वाटणारी असहाय्यता उफाळून आली. पण वाईटातून चांगलंही काही घडतं आहे हे दर्शवणार्या काही गोष्टी नजरेला पडल्या. व्यवस्थेतली केवळ छिद्रंच शोधण्यापेक्षा काही आशादायक कणही गोळा करावे, आणि त्या कणांचं जाणीवपूर्वक हव्या त्या ठेव्यात रुपांतर करावं अशी शिकवण देणारे माझे आजोबा आठवले.
आजोबा व्यवसायाने सर्जन होते, ब्रिटिशांच्या काळात शिकलेले आणि नंतर स्वतंत्र भारतात त्यांच्या हॉस्पिटलमधले पहिले 'नेटिव्ह' मेडिकल ऑफिसर. अकरा भाषा जाणणारे, त्यांपैकी सहा भारतीय भाषा अस्खलित बोलू शकणारे आणि तीन भाषांमध्ये दीर्घकाव्ये लिहिणारे आजोबा. मला आठवतात ते क्वचित लाड करणारे पण बरेचदा शिस्तीचे धडे देणारे, त्यांच्याकडे संस्कृत आणि तत्वज्ञान शिकायला येणार्या लोकांना घनगंभीर आवाजात मुद्दे पटवून देणारे. Sitting idle is not rest, change of work is rest असं शिकवणारे.
आजोबा वयाच्या ८२व्या वर्षी गेले, अखेरीला alzheimer's disease मुळे थोडीशी विस्मृतीची बाधा झाली असली तरी बरेचदा विचार अतिशय तर्कसंगत आणि बुद्धी तल्लख होती. त्याच सुमारास मी नुकताच नोकरीला लागलो होतो, आणि कार्यालयात काही मनाविरूद्ध घडलेल्या गोष्टींविषयी एकदा तणतणत घरी बोलत होतो. माझा संताप थोडा निवळल्यावर आजोबांनी मला त्यांच्या बरोबर बाहेर फिरायला बोलावलं. आम्ही बाहेर पडलो. नावालाच काठी टेकत, पण ताठ कण्याचे आजोबा मला सांगत होते: "अरे बाबा, आयुष्यात सगळंच आपल्याला हवं तसं, हवं तेंव्हा मिळालं असतं, तर काही मजा नाही रे! आता माझ्याकडेच बघ..आयुष्य संपेल अशा भोज्याला पोहोचलो आहे, पण...." मग बराच वेळ आजोबा आधी थोडंसं आपल्याविषयी, पण बरंचसं आयुष्याविषयी बोलले, आणि मग त्यांनी जे काही सांगितलं त्यातला मला कळलेला (निदान कळलं असं वाटलेला!) एक मुद्दा (जो मला आजच्या परिस्थितीत relevant वाटतो, तो) मी आठवून आठवून इथे माझ्या तोकड्या शब्दांत मांडतोय (काव्य गुण शोधण्याच्या फंदात पडू नका, तो प्रयत्नही या मुक्तकात नाही!):
काही अनोळखी, काही परिचितांना पाहिले
सुखात आनंदताना, दु:खात आक्रंदताना
आणि माझे मला उमजले
आयुष्याचे अर्थ नाना
इथल्या प्रत्येक क्षणाने
मी आहे तसा केलंय मला
हरएक आधीचा क्षण
घडवतो पुढच्या क्षणाला
आपण आज करू
ते आकार देतं भविष्याला
आयुष्य अनंत प्रवाह आहे
भलं-बुरं दोन्हीचा
दुरान्वयाने प्रत्येक आनंद
आहे पुत्र दु:खाचा
काही क्षण उणावू, तर मी नसेन 'मी'
'संपूर्णं स्वत:' साठी सारेच क्षण वेचा
देश माझा, माझी माती
माझी माणसं, सखे-सोबती
हात देऊन आधाराला
वेळोवेळी सारी नाती
आकाराला आणलं मला
मनासारखा प्रवास झाला
दिसू लागे आता पार
निरोप नाही, फक्त आभार!
दु:ख होतं जुनं जेंव्हा सुख येतं नवं
आयुष्याला दोन्ही एकसारखंच हवं
प्रतिक्रिया
वेगळ्या जातकुळीचं मुक्तक
+१
हेच म्हणते..
+१
मुक्तक
धन्यवाद
असेच
आवडले
खूप छान लिहिलंय. तुमचे अनुभव
सर, अतिशय उत्तम असं मुक्तक.
खुप छान ... एकदम मनातील लेखन
आवडले
काका मुक्तक फार फार
+१
+१
सर्वांचे आभार!
(इथेच केलं असतं क्रमशः
गणपाला अनुमोदन
+१
आजोबांचे लेखन इथेच टाका.
लिहा
द गुड शुड बी अॅग्रेसिव्ह!
छान मुक्तक!
हृदयात लक्कन काहीतरी हललं.
आजोबांची अतिशय हृद्य आठवण
मुक्तक खूपच आवडले. आणखी लिहा.
तुम्ही
कृपया
सुरेख विचार!
ठिक आहे, नका लिहू.. च्यायला
मुक्तक