परवा मी एक खूप छान लेख वाचला. "व्यवस्थापन/नेतृत्व/ऑर्गनायझेशन कल्चर" आदि विषयांतर्गत येणारा असा हा लेख होता. त्याचा थोडक्यात गोषवारा पुढीलप्रमाणे -
प्रत्येकाकडे बोलण्यासारख्या काही गोष्टी असतात, प्रत्येकालाच मते असतात. ऑफीसमध्ये देखील "वर्क कल्चर" अगदी संपूर्ण आदर्श कोणालाच वाटत नसते. काही बदल सुचवावेसे वाटत असतातच. पण बहुसंख्य लोक हे आपले मत गुलदस्त्यात ठेवतात, बोलून दाखवत नाहीत. भीती, संकोच, भीड अनेक कारणे त्यापाठी असतात त्याचबरोबर "सवय" हेदेखील कारण असते. पण हेच लोक काही चूक झाली की मात्र लगेच पुढे सरसावतात आणि पुटपुटतात - "मला वाटलं होतच." ...... अरे मग तू आधी का नाही बोललास? पण नाही.
एका सर्व्हेमध्ये मोठ्या कंपनीच्या वरीष्ठ पदावरच्या अधिकार्यांची जेव्हा मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी हेच सांगीतलं की - आम्ही या "मला माहीत होतं / मला वाटलच होतं / मला शंका होतीच" सिंड्रोमला अगदी कंटाळून गेलो आहोत. तुमचे मत कामाच्या ठीकाणी नीर्भीडपणे मांडणे हे खूप महत्वाचे असते. मग ते बरोबर आहे की चूकीचे ते पुढची पायरी. पण शब्द गिळू नका ... स्पीक इट आऊट!! कारण तुमचे मत कदचित अतिशय मौल्यवान असूही शकेल. आणि जरी ते तसे नसले तरी कंपनी कल्चर, कंपनीची जडणघडण होण्यात त्याचा हातभार लागू शकेल.
अंतर्मुख लोकांकरता मिसळपाव आदि फोरम्सचा त्या दृष्टीने खूप फायदा होत असावा. मला तरी १००% झाला. आपले मत मांडायची, प्रतिक्रिया द्यायची सवय लागली.तत्पूर्वी मला प्रतिक्रिया देणे तितकेसे महत्वचे वाटत नसे किंबहुना इतर लोक "माईंड रीडर्स" आहेत अशा गैरसमजातच जणू मी वावरत असे. पण सतत प्रतिक्रिया देवाणघेवाणीमुळे सकारात्मक बदल घडला.
वाचने
4005
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
मनोगत आवडले.
+१
In reply to मनोगत आवडले. by नितिन थत्ते
>>बाकी 'बाँबस्फोट चालतील पण
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
विनोद समजला नाहीये का समजुन
In reply to >>बाकी 'बाँबस्फोट चालतील पण by विश्वनाथ मेहेंदळे
जर वादाचा मुद्दा कामाशी
प्रत्येक
मान्य! वरीष्ठ अधिकार्याने
In reply to प्रत्येक by चिरोटा
बन्द मुट्टी सव्वा लाख की
तत्पूर्वी मला प्रतिक्रिया
त्यात विनोद काय होता ते कळले
In reply to तत्पूर्वी मला प्रतिक्रिया by आत्मशून्य
+१
In reply to त्यात विनोद काय होता ते कळले by स्वानन्द
मी एक सुत्र बर्याचदा वापरतो
मी पण असाच आहे
एक तारा,
In reply to मी पण असाच आहे by एक तारा
>>तुमचे मत कामाच्या ठीकाणी
मत!