✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तो आणि ती

स
सोत्रि यांनी
Sun, 07/10/2011 - 11:32  ·  लेख
लेख
तो काहीसा अबोल विषेशतः हळव्या विषयांवर ती बडबड करणारी विषेशतः हळव्या विषयांवर तो 'दील और दिमाग़ से' आयुष्याबद्दल व्यवहारी आणि प्रॅक्टिकल असणारा ती फक्त 'दील से' आयुष्याकडे बघत जगण्यात दंग असणारी तो कलासक्त, आस्वादी, बंधने झुगारुन काहीसा बेधुंद, आसक्तीने आयुष्य जगणारा ती नातेवाइक, मुले, समाज... काय म्हणेल ह्या विचाराने हैराण होत आयुष्य जगणारी तो काहीसा हळवा, बराचसा माघार घेणारा पण कधी कधी आक्रमक होणारा ती हळवेपणाचा आव आणून टोचून बोलून घायाळ करणारी तो नाजूक आठवणींच्या वलयात गुरफटून, गालातल्या गालात हसून आनंद मिळवणारा ती कसला विचार करतोय कोण जाणॆ?’ असे म्हणून आपल्याच विश्वात आनंदणारी तो एकांतात, नाजूक क्षणी, नाजूक क्षण वेचून आठवणींच्या कप्प्यात साठवण्याचा कसोशिने प्रयत्न करणारा ती एकांतात, नाजूक क्षणी 'तुझे माझ्यावर खरेच प्रेम आहे ना रे'? असे विचारून धुंदी उतरवणारी तो अचानक उत्कटतेने तीला कवेत घेउन, चुंबनांची बरसात करून घुसमटून टाकावे असा विचार करणारा ती वेळे काळाचे भानच नाही, जनाची नाही तर मनाची तरी असे म्हणून रंगाचा बेरंग करणारी तो त्याच्यातल्या उणिवा तीने भरून काढून त्याला साथ द्यावी असे वाटणारा, पण हे तीला कसे समजवून सांगावे ह्या विचारांनी घुसमटणारा ती सगळे मलाच बघावे लागते, तो कधीतरी मला समजून घेइल, ह्या एकांगी विचारांनी घुसमटून जाणारी तो कधी-कधी हे सगळे असह्य होउन भांड-भांड भांडणारा ती तेवढ्याच आक्रमकतेने भांड-भांड भांडणारी तो नंतर माघार घेउन तीला रंगात आणून खुलवणारा ती समजूतदारपणे, खुषीने रंगात येउन खुलणारी तो तीच्यावाचून आयुष्य अपूर्ण आहे हे जाणून तीच्यावर मनापासून प्रेम करणारा ती त्याच्यावाचून आयुष्य अपूर्ण आहे हे जाणून त्याच्यावर तीतकेच मनापासून प्रेम करणारी
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
5673 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

येऊ दे अजून.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 07/10/2011 - 17:04 नवीन
तो तिच्यापेक्षा बरा आहे एवढं मात्र कळतं. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सुंदर्,,मस्त...

निवेदिता-ताई
Mon, 07/11/2011 - 09:42 नवीन
:)
  • Log in or register to post comments

ह्याला विजोड म्हणावे का पूरक

परिकथेतील राजकुमार
Mon, 07/11/2011 - 12:31 नवीन
ह्याला विजोड म्हणावे का पूरक ?
  • Log in or register to post comments

पूरक

सोत्रि
Mon, 07/11/2011 - 13:29 नवीन
परा, विजोड जरी असले तरीही घट्ट प्रेमाची जाणिव एकमेकांना पूरक बनवते. अर्थात हे माझे वैयक्तिक मत :) - (पूरक) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

+१

परिकथेतील राजकुमार
Mon, 07/11/2011 - 14:23 नवीन
अगदी. शब्दांमधून त्यांच्यातले प्रेम जाणवत आहेच. फक्त ह्या जोडीकडे कुठल्या नजरेने बघावे असा प्रश्न पडला होता. अवांतर :- हे वाचून काहीही संबंध नसलेल्या संदीप खरेंच्या 'परस्परांना त्रास , तरीही परस्परांविण ना गत्यंतर' ह्या ओळी उगाच आठवुन गेल्या. सध्या विविध लेखन प्रकारात तुम्ही उतरताना बघून आम्हाला असुरक्षिततेची भावना येऊ लागली आहे ;) (इथे हलकटपणे विविध लेखन प्रकारत यशस्वीपणे उतरत आहात हे वाक्य टाळलेले आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

:)

सोत्रि
Tue, 07/12/2011 - 14:09 नवीन
ह्या वेळी हा हलकट्पणा खपवून घेतला गेल्या आहे, पुढ्च्या वेळी खपवून घेतला जाणार नाही अशी ताकीद आत्ताच देउन ठेवतो आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

सक्त?

धमाल मुलगा
Tue, 07/12/2011 - 14:40 नवीन
सक्त हा शब्द राहिलाय की हलकटपणानं गाळलाय? ;) शिवाय ह्यानंतर कडक निषेध, सक्त इशारा वगैरे सरकारी प्रवासही असेलच ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

छान आहे

michmadhura
Mon, 07/11/2011 - 13:03 नवीन
अव्यक्त भावना असतात ह्या. दोघांचा मूळ स्वभाव वेगळा असला की असतं असं नातं दोघांमधे, पण त्यात प्रेमही असतंच ना ! ते प्रेमच दोघांना घट्ट बांधून ठेवतं, एकमेकांसोबत आयुष्यभर. प्रकटन खूप आवडलं.
  • Log in or register to post comments

धन्यु

सोत्रि
Mon, 07/11/2011 - 13:23 नवीन
मधुरा, प्रकटनामागच्या माझी मनोभुमिका अचुक पकडल्याबद्दल मनापासून धन्यावाद! प्रतिसादातील तुमच्या शब्दा-शब्दाशी सहमत. - (अव्यक्त ) सोकजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: michmadhura

मुक्तक मनापासुन आवडले .. असेच

गणेशा
Mon, 07/11/2011 - 14:02 नवीन
मुक्तक मनापासुन आवडले .. असेच लिहित रहा... वाचत आहे...
  • Log in or register to post comments

मुक्तक मनापासुन आवडले .. असेच

गणेशा
Mon, 07/11/2011 - 14:03 नवीन
मुक्तक मनापासुन आवडले .. असेच लिहित रहा... वाचत आहे...
  • Log in or register to post comments

आयला...

धमाल मुलगा
Mon, 07/11/2011 - 15:33 नवीन
काय रियलिस्टिक ष्टोरी आहे राव. ;)
  • Log in or register to post comments

आयला...

धमाल मुलगा
Mon, 07/11/2011 - 15:34 नवीन
काय रियलिस्टिक ष्टोरी आहे राव. ;)
  • Log in or register to post comments

(No subject)

मितभाषी
Mon, 07/11/2011 - 15:53 नवीन
:)
  • Log in or register to post comments

सुंदर !

प्राजक्ता पवार
Tue, 07/12/2011 - 09:42 नवीन
प्रकटन आवडले :)
  • Log in or register to post comments

पूरक हे बरेचदा विजोड असू

विजुभाऊ
Tue, 07/12/2011 - 10:05 नवीन
पूरक हे बरेचदा विजोड असू शकते. सुंदर वाइनच्या बाटलीला कॉर्कचे बूच लावलेले असते. मला माझ्याच एका लेखाची आठवण झाली "चांगल्या झाडावर माकड बसते"
  • Log in or register to post comments

वॉव ...... फक्त इतकेच अप्रतिम

जेनी...
Tue, 04/10/2012 - 21:30 नवीन
वॉव ...... फक्त इतकेच अप्रतिम ... फक्त इतकेच सुंदर ... फक्त इतकेच अफलातुन .... फक्त इतकेच अस काहि वाचायला जि मजा आहे ना ती ती मजाच न्यारि ,,,,सोकाजि तुमि लिहिता राव लयच भारि ;)
  • Log in or register to post comments

मस्तच! बाकी, तुम्ही चेन्नैला

रेवती
Tue, 04/10/2012 - 21:44 नवीन
मस्तच! बाकी, तुम्ही चेन्नैला एकटेच मूव्ह झालेले दिसताय.;)
  • Log in or register to post comments

वा !

चाफा
Tue, 04/10/2012 - 22:20 नवीन
सोकाजीराव, मस्तच, विजोडपणात जास्त प्रेम असतं असं माझं वैयक्तीक मत :)
  • Log in or register to post comments

+१ स आणि ह आणि म आणि त

यकु
Tue, 04/10/2012 - 22:23 नवीन
+१ स आणि ह आणि म आणि त म्हणजेच सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाफा

वा!

पैसा
Tue, 04/10/2012 - 23:46 नवीन
सोत्रि, आणखी काय काय लिहितो रे? सध्या तुला हे विषय जास्त सुचतील आणखी. मग परिणामी दारवांवरचे लेखही! ;)
  • Log in or register to post comments

=))

सोत्रि
Wed, 04/11/2012 - 00:30 नवीन
सध्या तुला हे विषय जास्त सुचतील आणखी
बराच जुना धागा आहे हा. चाफा यांच्या धाग्याच्या शिर्षकाशी आणी गाभ्याशी जुळणारा होता म्हणून सहजच आठवण झाली. असो, धन्यवाद! दारवा वरचा एक लेख तयार आहे, शुक्रवारची वाट बघतोय ;) - (दारवांखेरीज बरेच काही सुचणारा) सोकाजी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

जमलय!

बदक
Wed, 04/11/2012 - 00:17 नवीन
पण क्षणो-क्षणी 'तो आणि ती' च जुळतच राहतय काहीबाहीस (का असं मलाच वाटतय?) :) पुलेशु.
  • Log in or register to post comments

असं काही वाचलं की मला

सूड
Wed, 04/11/2012 - 00:22 नवीन
असं काही वाचलं की मला मुंबै-पुणे-मुंबै मधलं मुक्ता बर्वेचा डायलॉग आठवतो. 'ढेकरेपासून जांभईपर्यंतच्या एकमेकांच्या सवयी समजून घ्यायला काय करायचं, तर लग्न? '
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा