हाइड अँड सिक चॉकलेट केक
एकाच इमारतीत राहत असूनही गेला जवळजवळ महिनाभर केसु आणि आमची भेट फेसबुकावर होत होती. त्यांच्या ह्यापी बड्डेच्या निमित्ताने मग शेवटी हाइड अँड सिक चॉकलेट केक करायचे ठरवले.
आता गेला महिनाभरच्या आमच्या आणि केसुंच्या लपाछपीमुळे ह्या केकचे 'हाइड अँड सिक चॉकलेट केक' असे बारसे मीच केले आहे. केकमध्ये लपलेल्या चॉकलेटची चव मध्येच जिभेवर रेंगाळते, हे कारण तर आहेच.
साहित्य-
२५० ग्राम साखर, ३०० ग्राम मैदा, २५० ग्राम लोणी/तूप, ५ अंडी
२ चहाचे चमचे बेकिंग पावडर,१ चिमूट मीठ, २ चहाचे चमचे वॅनिला अर्क, १ वाटी चॉकलेट किसून किवा बारीक तुकडे करुन
कृती-
लोणी/तूप भरपूर फेटणे,नंतर साखर घालून फेटणे,मीठ घालून फेटणे,अंडी घालून फेटणे. वॅनिला इसेन्स घालून फेटणे.
मैदा+बेकिंग पावडर+मीठ एकत्र करणे व ते घालून फेटणे.
किसलेले चॉकलेट घालून नीटपणे मिक्स करणे.
केक च्या साच्याला बटर लावून घेणे व त्यात ते मिश्रण ओतणे.
अवन प्रिहिट करणे, १८० अंश सेल्सिअस वर ३५ ते ४० मिनिटे बेक करणे.
केक तयार झाला की मोल्डमधून बाहेर काढणे व जाळीवर ठेवणे म्हणजे वाफ धरणार नाही.
ह्यापी बड्डे केसु! असं म्हणत (रंगाशेठच्या भाषेत) केक चापणे.. :)


वाचने
7263
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
वा वा! केक तर झक्कास दिस्तोय!
मस्त ग केकतै. २५० ग्राम
In reply to मस्त ग केकतै. २५० ग्राम by परिकथेतील राजकुमार
हे हे हे..
In reply to मस्त ग केकतै. २५० ग्राम by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to +१ by छोटा डॉन
घ्घ्या!
In reply to +१ by छोटा डॉन
?
व्वा !!!
सह्हीच.
मस्त
मनस्ताप
केक छानच . एक इचारू का ?
धन्यवाद!!
स्वातीताइ तुम्च्या इमारतीत
In reply to स्वातीताइ तुम्च्या इमारतीत by मी ऋचा
+१
छान
केसूंना वाढदिवसाच्या खर्या
झक्कास!
In reply to झक्कास! by धमाल मुलगा
केसूअंकल एकदम अंमळ इटालियन
In reply to केसूअंकल एकदम अंमळ इटालियन by रेवती
खीक्क्!
मस्तं !
प्रुफ ऑफ केक इज इन ईटिंग!!!
केसु
स्वातीतैचा नेहमीप्रमाणे
केक भारी गं ताई!!! केसुसरांना
धन्यवाद
स्वातीताई, कुठे वाढदिवसाची
वाह...