राजस्थानी मिक्स दाल
हि डाळ बनवायला अगदी सोप्पी अन टेस्टला एकदम झक्कास असते .
साहित्य : १ कप तुरीची डाळ ,१/ २ कप चना डाळ ,१/२ कप मुग डाळ (तुमच्या आवडीनुसार प्रमाण ठेवा )
२ बारीक चिरलेले कांदे ,२ बारीक चिरलेले टोमॅटो ,अमूल बटर ३चमचे (देसी घी पण चालेल),कढीपत्ता ,जीर -मोहरी ,हिंग ,१ तेजपत्ता ,एक दालचिनी तुकडा ,ठेचलेला लसून १ चमचा मिरची पावडर १ चमचा ,गरम मसाला १ चमचा ,धना पावडर १ चमचा , १/२ चमचा आमचूर पावडर (ऑप्शनल),मीठ ,चिरलेली कोथिंबीर
कृती : तुरीची डाळ आणि हरबर्याची डाळ १ तास आधी स्वछ धुवून पाण्यात भिजवून ठेवावी ,(मुगाची डाळ भिजवण्याची गरज नाही)
नंतर कुकर मध्ये ह्या तीनही डाळी घालून एक चमचा हळद आणि पाणी घालून शिजवून घ्याव्यात .
शिजवलेली डाळ छान फेटून घ्यावी
तडक्या साठी : एका पॅन मध्ये ३ चमचे बटर घाला .तेजपत्ता अन दालचिनी तुकडा घाला ,जीर- मोहरी ,कढीपत्ता अन हिंग घालून खमंग फोडणी द्या ,ठेचलेला लसून घाला. आता चिरलेला कांदा घालून परतून घ्या ,कांदा सोनेरी होऊ लागला कि टोमॅटो घाला , छान परतून झाल कि मिरची पावडर गरम मसाला ,धने पावडर आमचूर पावडर घालून घ्या ,परतल्याचा खमंग वास सुटू लागला कि फेटलेली डाळ घाला .चवीनुसार मीठ आणि हळद घाला
क्रीम अन कोथिंबीर ने सजवा हि डाळ जीरा राइस बरोबर एकदम मस्त लागते ,गरम गरम तुप लावलेल्या चपातिबरोबर तर विचारुच नका अप्रतिम !
:)
वाचने
7637
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटो मस्त..
जाड गरम पोळ्या आणि अशी दाल !!
मस्त
+ १ सहमत ! मला पण लाल मिरचीचा
आज करुनच बघते..
व्वाह !!!!!!!!
छान... मला जमेल असं
मराठीत त्याला तमालपत्र
In reply to छान... मला जमेल असं by स्वानन्द
धन्यवाद!
In reply to मराठीत त्याला तमालपत्र by विश्वनाथ मेहेंदळे
छान..
हो, लाल मिरची आणि लसुण... खुप
In reply to छान.. by स्वाती दिनेश
मस्त
मस्त !!
दाल बाटी
In reply to मस्त !! by शाहिर
पाकृ आवडली.
झक्कास
पाककृती आवडली. - गिळुषा.
छान मस्त झालीय दाळ, या आधी