इगतपुरीचा पाऊस
इगतपुरीचा पाउस म्हणजे धोधो कोसळणारा.
पंधरा पंधरा दिवस सूर्याचे दर्शन घडू न देणारा.
सर्वांगात मुरणारा पाउस.
घाट चढून येणाऱ्या ढगांनी वेढलेल्या इगतपुरीत इतका मिट्ट काळोख
कि कुणी डोळ्यात बोट घातले तरी कळणार नाही.
वार्यावर स्वार होऊन येणाऱ्या ढगांशी लपंडाव खेळण्यातली गम्मत काही न्यारीच आणि तासान तास न संपणारी.
त्या इगतपुरीच्या पावसाचा आवेग , ती अंग भिजवणारी ओल, भिजलेलं रान
आणि काळ्या कुट्ट ढगांच्या मध्येच डोकावणारे करड्या रंगाचे प्रकाश झोत
पकडण्याचा एक प्रयत्न " इगतपुरी रेन्स" या पेंटिंग मध्ये केला आहे.
बऱ्याच वर्षापूर्वी काढलेलं हे पेंटिंग आर्टीस्ट सेंटर इथे भरवलेल्या प्रदर्शनात
लोकांपुढे आले आणि खूप जणांना ते आवडले .
साईट वर टाकल्यावर बर्याच चांगल्या प्रतिक्रिया सुद्धा आल्या आणि हे पेंटिंग
Contemporary Masters' 2009 या कलाविष यातील पुस्तकात जाऊन पोहोचले.
लेखनविषय:
याद्या
5407
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
काय बोलू ? रंगाच्या
आवडले
मस्तय.
अप्रतिम!
छानच आहे पेंटींग!
मस्तच आहे
मस्तच आहे, भावना शब्दात
झकास
क्लास आहे पेंटिग.. पावसाचा
झिम्माड !
केवळ अप्रतिम
मस्त
ह्म्म्म... खरं सांगायच झाल तर
छान.
भरगच्च
चित्रात काही ठिकाणी सरींच्या
येथे मला पेंटींग दिसले नाही