Skip to main content

पडक्या घरास माझ्या

लेखक suralesandip यांनी सोमवार, 30/06/2008 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
या आसवांस माझ्या... तू साहतेस का गं? अन आठवांत माझ्या... तू राहतेस का गं? हरवले सूर माझे... सांजवेळी तरीही या मैफ़लीत माझ्या... तू नाहतेस का गं? होतेस का पुजारी... अन फूल ही कधी तू तुज मंदिरात माझ्या... तू वाहतेस का गं? आता उरात झरती... या वेदना सदाच्या या वेदनेस माझ्या... तू चाहतेस का गं? तू दूर दूर जाता... बघ निखळले सहारे पडक्या घरास माझ्या... तू पाहतेस का गं? --शब्द्सखा!
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1911
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

तू दूर दूर जाता... बघ निखळले सहारे पडक्या घरास माझ्या... तू पाहतेस का गं? वा!

तू दूर दूर जाता... बघ निखळले सहारे पडक्या घरास माझ्या... तू पाहतेस का गं?
असे सुंदर काव्यमय विचार असणाऱ्याची हवेली सोडून, त्या हवेलीचे पडके घर करून ती का गेली? अऩ स्वतः दुरून (मजा) पहात आहे! How cruel! अऩ इकडे त्याला बिचाऱ्याला प्रश्न पडलाय!
अन आठवांत माझ्या... तू राहतेस का गं?
कविता खूप छान आहे. suralesandip जी दुसरी एखादी कलासक्त मैत्रीण शोधा! (ह.घ्या.)