Skip to main content

माझ्या घरासमोरील झाडावरचं घरटं आणि पक्षी

लेखक फुलपाखरु यांनी सोमवार, 30/06/2008 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या घरासमोरच्या झाडावरती अमेरिचन रॉबिन पक्ष्यानी घरटं बांधलं होते. घरटं बांधण्यापासून ते पिल्लांच्या जन्मापर्यंतचा प्रवास छायाचित्रांच्या रुपात आहे माझ्याकडे. आपणा सर्वांना आवडतील अशी आशा आहे. घर बांधकाम चालू असताना सौ. रॉबिन घरट्यामधील अंडी उबवत आहेत आणि रॉबिनकाका सौं.ना काय "हवे नको" पहाताना :) चि. रॉबिन यांचा जन्म झाल्यावर रॉबिनकाकांबरोबर पावसापासून पिल्लाचं संरक्षण करत आहेत आई बाबा

वाचने 8098
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

आवडली प्रकाश चित्रं.

In reply to by यशोधरा

धन्यवाद! झाड कोणते आहे ते नाही माहिती मला :/

वा! काय सुरेख फोटू आहेत! :)

फॅमिली आल्बम छान झाला आहे. (पक्षी फ्लॅश्ला घाबरत असत का?)

In reply to by धनंजय

पक्षी फ्लॅश्ला नाही घाबरले. पण, जेव्हा पिल्लू जन्माला आले त्या नंतर मात्र मला घराचे पुढचे दार सुद्धा उघडू देत नव्हते...एकदम डोक्यावर जोरात झेप घ्यायचे :S पिल्लाच्या काळजीमुळे. दाराला कुलूप सुद्धा लावू द्यायचे नाहीत! त्यामुळे नंतरचे फोटो घरातून खिडकीमधून काढावे लागले आणि मग मागच्या दाराने office ला जायला पळ काढावा लागायचा. :D धन्यवाद! आणि हो..कुठ्ल्यातरी प्रकारच्या बेरींचेच झाड आहे हा ते...छोट्या छोट्या बेरी लागल्या होत्या खरे त्याला.

हे ब्लूबेरी/क्रॅनबेरी असे कोणते तरी बेरीवर्गीय झाड असावे असे वाटते. हिरवागार रंग मस्तच आलाय. पक्षीही न भिता पोझ देतायत. मस्तच. चतुरंग

मजा आली पहायला.

येथे फोरक्लोजर नाही येथे इंन्स्टॉलमेंट नाही येथे इंटरेस्ट नाही येथे फक्त आहे सुखी संसार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by श्रीकृष्ण सामंत

अहो पण प्रायव्हसीचे काय? पापाराझीने काढुन इंटरनेटवर टाकलेच ना? कृ. ह. घ्या. ;-) फुलपाखरु फोटो बघायला आवडले.

फोटो छान आले आहेत. आवडले. - सूर्य.

आलेत फोटो.

अरे व्वा.. फुलपाखरा मस्त फोटो आहेत. चि. रॉबिन यांचा जन्म झाल्यावर रॉबिनकाकांबरोबर हा फोटो फार आवडला.. मदनबाण.....

अमेरिकेतील पक्षी पण इकडच्या पक्ष्यासारखे घरटं बांधतात, एकसारखा विकास आहे दोन्ही कडे.भेदभाव नाही. वेताळ.

फोटो छानच. शेवटचा तर फारच आवडला. -- लिखाळ.

रॊबीन फॅमीलीचे फोटो मस्त आले आहेत, आवडले.