✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

खिद्रापूर चा कोपेश्वर मंदिर ( माहिति सोबत )

श
शाहिर यांनी
Mon, 06/27/2011 - 17:01  ·  लेख
लेख
खिद्रापूर : कृष्णा नदी तीरावर वसलेले सुंदर पण भग्न मंदीर .. या मे महिन्या मध्ये भेटीचा योग आला ..११ व्या शतकाच्या सुरुवातीला हे मंदीर शिलाहार राजा ( गन्दारादित्या , विजयादित्य आणि भोज २ रा ) कडून बांधण्यात आले .. पौराणिक कथा : देवी सती हि भगवान शिवाची पत्नी होती ..तिचे वडील राजा दक्ष यास भगवान शिव जावई म्हणून पसंत नव्हते .. दक्ष राजाने एकदा मोठा यज्ञ केला आणि शिव -सती ला बोलावले नाही ..सती ने याबद्दल राजा ला जाब विचारला असता त्याने शिवा चा अपमान केला ..ते सहन ना होऊन सती ने यज्ञा मध्ये उडी घेतली .. हे कळताच भगवान शिव क्रोधीत झाले ..आणि दक्ष राजा चा वध केला .. आणि कृष्णा तीरावर येऊन बसले ..तिथे भगवान विष्णू नी येऊन त्यांचा राग शांत केला .. म्हणून या मंदिरा ला "कोप + ईश्वर " कोपेश्वर म्हणतात .. विशेष म्हणजे या मंदिरा मध्ये नंदी नाही .. स्थापत्य : पूर्ण मंदिर ९६ हत्ती च्या पाठीवर कोरले आहे ..१०८ खांब आहेत तसेच कळसावर शिवलीलामृत कोरले आहे .. संपूर्ण मंदिर भर महाभारत आणि रामायणा मधले प्रसंग कोरले आहेत ..तसेच स्वर्ग मंडप ,यज्ञ मंडप (होमा चा धूर जाण्या साठी छत मध्ये उघडा गोल ठेवला आहे ) ..आणि गर्भ गृह आहे .. औरंगजेबा चा सरदार खैदर खान याने या मंदिरा ची तोड फोड केल्याचा ऐकण्यात आले .. आज हि हे मंदिर आपल्या प्राचीन वैभवाच्या खुणा जपत उभे आहे
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
छायाचित्रण
स्थिरचित्र

प्रतिक्रिया द्या
15005 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

अप्रतिम शिल्पकला आहे हि

गणेशा
Mon, 06/27/2011 - 17:22 नवीन
अप्रतिम शिल्पकला आहे हि .. मस्तच
  • Log in or register to post comments

खिद्रापूर

प्रचेतस
Mon, 06/27/2011 - 17:43 नवीन
खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर अतिशय सुंदर आहे. आता जरा मूर्ती भग्नावस्थेत असल्या तरी पुर्वीच्या वैभवाची स्पष्ट कल्पना येते. पुण्याजवळील भुलेश्वरच्या शिल्पकलेशी येथील काम बरेच साध्यर्म्य साधते.
  • Log in or register to post comments

अंमळ असहमत रे.

धमाल मुलगा
Mon, 06/27/2011 - 18:39 नवीन
नीट पाहिलं तर खिद्रापूरच्या शिल्पकलेवर बौध्द-जैन शैलीची ठळक छाप जाणवते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

असेलही

प्रचेतस
Mon, 06/27/2011 - 21:51 नवीन
हे माझे भुलेश्वरचे फोटो. शिल्पकला तर बर्‍यापैकी सारखीच वाटतीय. जैन, बौद्ध कलेची छाप तर असणारच रे, शेवटी हिंदू मंदिरांची शैली बौद्ध/जैन कलेतूनच उत्क्रांत झाली असावी आणि शेवटी त्यापेक्षाही जास्त उत्कर्षास पोहोचली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

शैलीचे माहित नाही पण

हरिप्रिया_
Tue, 06/28/2011 - 14:45 नवीन
शैलीचे माहित नाही पण खिद्रापुराला कोपेश्वर मंदिरा सोबतच एक महावीरांच पण मंदिर आहे.. त्याच शैलीतले,त्याच काळातले.. एक मात्र नक्की दोन्ही मंदिर अप्रतिम आहेत...एकदा नक्की पाहून येण्यासारखी.. मस्त आहेत फोटो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

खुपच

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 06/27/2011 - 17:59 नवीन
खुपच सुंदर शिल्पकला!! एकदा जायलाच हवे.... बाकी बर्‍याच मुर्ती जाणून बुजून विद्रुप केल्यासारख्या वाटतात. त्या मागे काही इतिहास आहे कां?
  • Log in or register to post comments

बाकी बर्‍याच मुर्ती जाणून

कवटी
Fri, 07/01/2011 - 18:04 नवीन
बाकी बर्‍याच मुर्ती जाणून बुजून विद्रुप केल्यासारख्या वाटतात. त्या मागे काही इतिहास आहे कां? तो औरंग्याचा खैदर्‍या का हैदर्‍या आलावता म्हणून लोवलय की वरती... तेज्यायला त्या खैदर्‍याच्या......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

वाहव्वा

अत्रुप्त आत्मा
Mon, 06/27/2011 - 18:01 नवीन
वाह व्वा शाहीर...लय भारी हो,काय अप्रतिम आहे मंदिर...नक्की जाऊन बघणार.फोटो भेट घडवल्याबद्दल धन्यवाद...
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

धमाल मुलगा
Mon, 06/27/2011 - 18:38 नवीन
छान आहे मंदीर. भग्न शिल्पे पाहून वाईट वाटलं. आपल्या लोकांना आपल्या सुंदर वास्तू सांभाळायची अक्कल नाही हेच खरे.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

प्रियाली
Mon, 06/27/2011 - 19:09 नवीन
शिल्पांसोबत थोडी माहितीही हवी होती. निदान चित्रांना कॅप्शन्स तरी हवी होती.
  • Log in or register to post comments

फार फार वर्षांपूर्वी इथे गेलो

मराठे
Mon, 06/27/2011 - 20:29 नवीन
फार फार वर्षांपूर्वी इथे गेलो होतो. आठवणी जागवल्याबद्धल धन्यवाद. जाणूनबूजून सुंदर मुर्ती विद्रूप करण्याची मानसिकता अजूनही गेलेली नाही (संदर्भः तालिबान्यांनी केलेले अफगाणीस्तानातील भव्य बुद्ध मूर्तींचे भंजन)
  • Log in or register to post comments

मस्तच!

विकास
Mon, 06/27/2011 - 20:54 नवीन
खूप छान आहे... देवळाला कळस देखील दिसला नाही. ते तसेच आहे का कळ्स देखील भग्न केला गेला होता?
  • Log in or register to post comments

खूप छान.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 06/27/2011 - 22:31 नवीन
माहितीपूर्ण लेखन. पण अजूनही भरपूर माहिती हवी होती असे वाटले. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

+१

पैसा
Mon, 06/27/2011 - 23:06 नवीन
फोटो खूपच छान. पण जरा जास्त माहिती हवी होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त फोटो आणि माहिती, जायचं

५० फक्त
Tue, 06/28/2011 - 06:17 नवीन
मस्त फोटो आणि माहिती, जायचं कसं ते सांगाल का जरा, या महिन्यात जाउन येईन. आणि हो वल्ली म्हणतो तसं, भुलेश्वरच्या शिल्पकामाबरोबर तुलना करता येउ शकते अशीच शिल्पकला आहे. विशेषतः मंदिराला वेगळी भिंत न बांधता मुर्तींच्याच वापराने भिंत करणे.
  • Log in or register to post comments

खिद्रापूर ला कसे जावे ?

शाहिर
Tue, 06/28/2011 - 11:13 नवीन
कोल्हापूरहुन कोल्हापूर - मिरज महामार्ग हुन जावे ...नरसोबा ची वाडि हे प्रसिद्ध ठिकाण आहे..तिथे जावे .. तिथून कुरुंदवाड ला जाणारा रस्ता विचारावा ..तिथून सैनिक टाकळी मार्गे खिद्रापूर ला पोचता येते ..नरसोबाची वाडी हे सुद्धा सुंदर ठिकाण आहे ..कोल्हापूर हून अंतर ६०-६५ किमी असेल .. स्थानिका ना विचारातच गेलो होतो ..त्यामुळे अचूक माहिती नाही ...क्षमस्व
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

हे घ्या

आनंदयात्री
Wed, 06/29/2011 - 02:36 नवीन
हे घ्या म्याप !!
View Larger Map
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

मस्त आहे हे शिवमंदिर.

किसन शिंदे
Tue, 06/28/2011 - 12:19 नवीन
मस्त आहे हे शिवमंदिर.
  • Log in or register to post comments

खूप छान

सविता००१
Tue, 06/28/2011 - 13:31 नवीन
सुंदर मंदिर आणि तितकेच छान फोटो. आता लगेच जायलाच हवे.
  • Log in or register to post comments

कळसावर शिवलीलामृत

राही
Tue, 06/28/2011 - 16:00 नवीन
कोरलेले असेल तर ते शिवलीलामृताचा काळ ठरवण्यास उपयुक्त ठरू शकेल.
  • Log in or register to post comments

ऑसम!

इंटरनेटस्नेही
Tue, 06/28/2011 - 21:37 नवीन
ऑसम!
  • Log in or register to post comments

खिद्रापूर आमची सासुरवाडी....

JAGOMOHANPYARE
Wed, 06/29/2011 - 11:01 नवीन
खिद्रापूर आमची सासुरवाडी.... दक्षयज्ञ खिद्रापुरपासून काही अंतरावर झाला. पार्वतीने नंदी तिथे पार्क केला होता. आणि त्यानंतर ती यज्ञात गेली. तो नंदी तिची वाट पहात तिथेच आहे. जवळ शिरगुप्पी की कुठले तरी गाव आहे. तिथे तो आहे.
  • Log in or register to post comments

खी खी खी

चिंतामणी
Sat, 07/02/2011 - 10:15 नवीन
पार्वतीने नंदी तिथे पार्क केला होता. लै भारी बरका मोहन प्यारे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

अजुन एक

वेताळ
Wed, 06/29/2011 - 11:24 नवीन
मंदिरात गाभार्‍यात दोन शिवलिंग आहेत.
  • Log in or register to post comments

२ शिव लिंग नव्हे ..

शाहिर
Wed, 06/29/2011 - 11:58 नवीन
त्या मधील एक लिंग धोपेश्वर म्हनुन ओलखले जाते ..ते विष्णु चे आहे असे सांगतात ,,,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

खिद्रपुर

अनुरोध
Wed, 06/29/2011 - 14:06 नवीन
आता मागच्याच आटवड्यात जौन आलो. फारच झकास (सुन्दर) अहे हे मन्दिर....(अनुस्वार देत येत नहिये क्रूपया कोणि सान्गावे...) अनुरोध
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर मंदीर आहे हे...

मदनबाण
Fri, 07/01/2011 - 09:21 नवीन
अतिशय सुंदर मंदीर आहे हे... अनेकवेळा इथे जाणे झाले आहे माझे. :) एका खांबावर पार्वतीची एक मूर्ती असुन ती अंबाडा घालनताची मुद्रा आहे.
  • Log in or register to post comments

आणखी काही छायाचित्रे

मालोजीराव
Fri, 07/01/2011 - 13:28 नवीन
कुठेच बांधकाम न करता एकावर एक कोरीव दगड रचून हे अद्भुत शिल्प उभारलंय,एकदा गेलेलो बघायला,छतावरील नक्षीकाम तर अप्रतिमच ! या भागात ठिकठिकाणी प्राचीन मूर्तींचे अवशेष सुद्धा वि‍खरू‍न प‍डलेले बघितले होते.या मंदिराला हेरीटेज दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. छायाचित्रे - भवानीसिंह घोरपडे - मालोजीराव
  • Log in or register to post comments

उत्तम!

धमाल मुलगा
Fri, 07/01/2011 - 20:48 नवीन
या मंदिराला हेरीटेज दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.
तसे झाले तर फारच बरे होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

मस्त!

रुमानी
Sat, 07/02/2011 - 17:21 नवीन
मंदिर व महिति खूप छान.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा