मटा चे महान मद्यप्रेम!
सरकारने मद्यपानचे वय किमान २५ केल्यामुळे समाजावर ओढवलेल्या भयानक संकटाच्या आणि झालेल्या घोर अन्यायाच्या निवारणार्थ मटाने मोहिम उघडली आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणुन आजच्या मटामध्ये पृष्ठ क्रमांक ११ वर १/३ पान भरेल अशी भव्य व काळी चौकट - लाल अंग - पांढरी मोठी अक्षरे असलेली एक जाहिरात मटा ने दिली आहे. ही जाहिरात म्हणते
" देशाचे सीमारक्षण करण्यासाठी आपल्यावर वयाच्या १८ व्या वर्षी विश्वास ठेवला जातो. पण २५ वयापर्यंत जबाबदारीने मद्यपान करु शकत नाकी."
खालोखाल लहान अक्षरात लिहिले आहे
" आपल्या देशाचे कायदे सैन्यात भरती होण्यासाठी आणि सीमारेषेवर लढण्यासाठी १८ व्या वर्षी आपल्याला पात्र समजतात. पण आपण काय प्यावे याची निवड करण्याची परिपक्वता येण्यासाठी अजुन ७ वर्षे थांबायला सांगतात. मद्यपानचे वय अतार्किकदृष्ट्या २५ ठरविल्यामुळे, असे वाटते की आपल्या क्षमतांचे मूल्यमापन करण्याचे निकष समान नाहीत. त्यामुळे कोणतीही शंका राहणार नाही अशा निकषांची मागणी करण्याची आता वेळ आली आहे. आपले म्हणणे स्पष्ट आणि मोठ्या आवाजात ऐकावे यासाठी"
माझ्या लहानपणी '१९७१ चे अभिमन्यू' हे पुस्तक वाचनात आले होते. त्यामध्ये ७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात हौतात्म्य लाभलेल्या कॅप्टन प्रकाश पेठे, मेजर रमेश दडकर, फ्लाईत लेफ्टनंट किशोर भडभडे इत्यादींच्या शौर्यकथा होत्या. पैकी एका सुपुत्राची अशी हकिकत सांगितली होती, की जेव्हा त्याच्यावर अपेंडीक्सची शस्त्रक्रिया करायचा प्रसंग आला तेव्हा त्याने डॉक्टरना सांगितले की जर जखम दिड इंचाहुन मोठी असेल तर सैन्यात प्रवेश मिळत नाही, त्यामुळे अधिक त्रास झाला तरी लहान छेद घेउनच शस्त्रक्रिया केली जावी. देशासाठी बलिदान करायचे ध्येय बालपणापासूनच उराशी बाळगणार्या अनेक हुतात्म्यांविषयी ऐकले, वाचले होते. मात्र मद्यपानाचे ध्येय तरुणांमध्ये असते व अशा गळाचेपी करणार्या कायद्यांमुळे तरुणांवर स्वप्नभंगाला सामोरे जाण्याचा दारुण प्रसंग येउ शकतो व त्यामुळे तरुणांचे जीवन उध्वस्त होउ शकते हे केवळ मटानेच जाणले.
देशासाठी लढण्याच्या ध्येयासाठी सैन्यात प्रवेश करणारे युवक आणि मद्यपनाचा हक्क १८ व्या वर्षीच मिळावा यासाठी लढणारे युवक यांना एकाच पंगतीस बसविणार्या महान मटाला त्रिवार वंदन.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
चौथा स्तंभ?
बिजान
तुलना चूक आहे हे मान्य.
मटाचे अभिनंदन
मटा चे महान मद्यप्रेम! अंमळ
+१
यात प्रामुख्याने २
तारतम्य
भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या
जुने अंक
रोज वाचतो ! तुम्ही पण टाइम्स
सज्ञान ?
आचार्य अत्रे आज हयात असते तर
अरेरे ...
गुजरातचा आदर्श
जरतर
टिळकांना पण सुपारीच व्यसन
हो आणि टिळक रोज दुपारी सुपारी
सगळी बामण व्यसनी. च्यायला
?
पिईनात का..
या संदर्भात हीही बातमी आठवली...
यावरून...
वयाचे बंधन - थोडा वेगळा किस्सा
आवाज उठणे योग्यच! मात्र.....
?
मटासारख्या मराठी पत्राच्या
स्मार्ट मित्र
या चळवळीसाठी टाईम्सला पैसा
पैसा कोण देत
अहो साधं आहे गणित!
मूळ मुद्दा, श्री. चतुरंग यांच्याशी सहमत
"मायबाप" सरकारचा निषेध.
+१
मजेशीर..!
सु ग शेवडे
वांदे होणार्रर्र्र्रर्र्र्र
गटारीची महिन्यात तरी असे विषय