हिरवा चाफा
हिरवी पालवी, हिरवी राई, हिरवागार परिसर, हिरवी पाने, गवत हेच ऐकायची आपल्याला सवय असते. पण हिरवे फुल म्हणजे जरा हटकेच. अगदी लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात. हिरवा चाफा ह्या नावकडे लक्ष केंद्रित केल की वेगळच फिल होत. लहानपणी मोठे झाड होते आमच्या घरी. फुल कधी दिसायचे नाही पण वास आला की समजायचे चाफा फुलला मग शोधायला जायचे. कुठल्यातरी पानाआई हे दिसायचे. मग काढून घरी आणुन त्याचा वास घेत बसायच. तसा त्याचा वास घेण्याची गरज लागत नाही. ज्या जागी ठेउ त्या परीसरावर हे फुल आपला सुगंध दरवळून आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन देतो. हिरव्या रंगामुळे झाडावर हे हिरव फुल लपाछुपीच खेळत असत. एका नजरेत सहसा फुल दिसत नाही. हिरव्या चाफ्याचे झाड नावाप्रमाणे हिरवे गडद असते. ह्या झाडाच्या फांद्याच्या शेवटी हुकाच्या आकारात शेवटचे देठ वळते.
माझ्या माहेरी हे झाड आहे. मी माहेरी गेले की पहीला पाठी जाते कॅमेरा घेउन आणि झाडावर फुल आहे का पाहते. मागे गेले तेंव्हा अगदीच जन्मलेल्या बाळाप्रमाणे कळी आली होती.
थोड्या दिवसांत ही अवस्था होती फुलाची.
अजुन ४-५ दिवसांनी गेल्यावर पाहील तर पुर्ण होत आलेल्या फुलाचे सौदर्य न्याहाळण्यासाठी एक पाखरू त्या फुलाला साथ देत होत. तेही सुंदर होत. मी फोटो साठी फांदीला सरकवुन पोझ देत होते तरी ते त्याची साथ सोडायला तयार नव्हते. उलट त्यानेच फोटोसाठी पोझ दिल्या.
ह्याची कळी आल्यापासुन साधारण १०-१२ दिवस लागतात हे पुर्ण फुल व्हायला. दुसर्या दिवशी सकाळी हे फुल पुर्ण झाल होत. फुल तयार झाले की त्याच्या पाकळ्या फाकतात. अगदी वाटी दिसायला लागते. ते पाखरू अजुन हलल नव्हत.
ज्या दिवशी फुल तयार होते त्यादिवशी ह्याचा सुगंध परिसरात दरवळायला लागतो. हिरव्या चाफ्याचा सुगंध मात्र पिवळा झाल्यावर जास्त दरवळतो. ह्याच्या सुगंधामुळे साप ह्या झाडाखाली येतात असेही म्हणतात.
आता दुसर्या दिवशी मला येता येणार नव्हत म्हणुन हे फुल मी काढुन घरी घेउन गेले. त्याच्या दुसर्या दिवशी हा हिरवा चाफा स्वत:वर पिवळा रंग रंगवु लागला. घरात सर्वत्र सुगंधही पसरला होता.
(फोटो क्लियर नसल्या बद्दल क्षमस्व).
हिरव्या चाफ्याच्या झाडाला फळेही हिरवीगार लागतात. लंबगोलाकार टोकाला निमुळती आणि घडात ही फळे लागतात. त्याच्या बी पासुन रोप तयार करता येते.
असा आहे महिमा हिरव्या चाफ्याचा
वाचने
11370
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
प्रतिक्रिया
अहा..
In reply to अहा.. by स्वाती दिनेश
+१
छान. कोकणातले दिवस आठवले.
छानच !!
छान
वा... परत एकदा नविन माहिती
सुरेख
धन्यवाद, फोटो एकदम मस्त आले
जागुतै रॉक्स ! तुझ्यामुळे
माझ्यासाठी हे नविन आहे फुल..
वा.... फुल बघुनच मला अगदी
यातल्या इमेजेस मिळतील असं