मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उपवासाचा बटाटावडा.

ज्योति प्रकाश · · पाककृती
साहित्यः-एक वाटी शिंगाड्याचे पिठ. एक वाटी साबुदाण्याचे पिठ. तिन ते चार उकडलेले बटाटे. दोन मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट. आलं व हिरवी मिरची पेस्ट्(आपल्या तब्येतीप्रमाणे) अर्धा चमचा लिंबाचा रस. मिठ व साखर चवीप्रमाणे. तेल्,जिरे फोडणीसाठी. कोथिंबीर. कृती :-प्रथम बटाटे कुस्करून घ्यावे.त्यात मिठ व साखर घालावे.एका कढईत तेल घालावे.तेल तापले कि त्यात जिरे फोडणीला घालावे. नंतर त्यात हिरवे मिरची व आलं पेस्ट घालून ढवळावे.त्यात कुस्करलेला बटाटा, लिंबाचा रस्,शेंगदाण्याचा कूट घालून व्यवस्थित परतून घ्यावे..शेवटी त्यात कोथिंबीर घालावी व त्याचे गोळे करून घ्यावे. एका भांड्यात शिंगाड्याचे पिठ व साबुदाण्याचे पिठ घेऊन त्यात मिठ व पाणी घालून जाडसर पिठ तयार करावे.त्यात बटाट्याचे घोळवून तेलात लालसर तळून घ्यावे.चटणीबरोबर खायला द्यावे. टिपः- कढईत वडे तळायला सोडतांना दोन्-दोनच वडे घाला.तेल आधी चांगले तापवून घेऊन मग गॅस मंद करून वडे तळा म्हणजे वडे फूटणार नाहित.

वाचने 5978 वाचनखूण प्रतिक्रिया 5

प्रास 20/06/2011 - 19:30
अशाने एखाद्या (माझ्यासारख्या, जन्माच्या भुकेल्या) चा जीव घ्याल हो..... ;-) पाकृ आवडली हे वेसांन.... येत्या एकादशीला जरूर ट्राय करू...... केल्यास झकास फोटो वगैरे टाकून लोकांना इनो प्यायला लावू ;-)