Skip to main content

आडनावाचे फायदे किती व तोटे किती

लेखक रणजित चितळे यांनी गुरुवार, 16/06/2011 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
जगभर सगळीकडे आपण पहातो की नावा बरोबर आडनावे असतात. युरोपात सुमारे ५००० हजार वर्षापुर्वी आडनावे उपयोगात हळू हळू यायला लागली. भारतात कधी व का उपयोगात आली ते कळायला मार्ग नाही. वेदकाळानंतर गोत्र उत्पन्न झाली. पुढे वंशज व कुळ हे आडनावा सारखे उपयोगात आले. रामाला बहूतेक आडनाव नव्हते. कृष्णाला यादव कुळातला म्हणून संबोधले जाते. वर्णाश्रम व जातीवार रचने मुळे आपल्या कडे आडनावांना महत्व आले. 'अरे पण आडनाव काय त्याचे' मुलाने वर्गातल्या मुलाचे नाव आपल्याला सांगितले की सहजच हा प्रश्न विचारला जातो. ह्या संबंधात काथ्याकूट करण्यासाठी खालील मुद्दे देत आहे. त्या बरोबर माझी मते ही देत आहे. १. आडनावांमुळे जातीवार रचनेची गाठ सुटू शकत नाही. माझे मत - आडनावांमुळे जातीवार रचना अजूनच जोपासली जात आहे. २. आडनाव हवेच का. काही लोकांचे म्हणणे हे पडते की तिच तिच नावे खुप असतात, जर नाव व त्या बरोबर आडनाव जोडले तर हा गोंधळ दुर होतो. माझे मत - असे असेल तर आडनावे लावायच्या ऎवजी नावा मागे आई वडलांचे नाव जोडले तर हा प्रश्न राहणार नाही. ३. समाजात जागरुकता आली व सरकारी पाठींबा असला तर (म्हणजे विविध सरकारी फॉर्मस् मध्ये आडनावाचा रकाना काढून टाकला तर) काही वर्षानी भारतीय समाजात 'आडनाव' उपयोगात येणार नाही, त्याचा काही सामाजीक समरसतेत फरक व्हायला मदत होईल का. ४. अर्थातच बाकीच्या धर्मीयांनी पण हे अमलात आणले पाहिज (मुस्लिम पर्सनल लॉ...समान नागरी कायदा वगैरे वगैरेची गुंतागुंत नको). ५. आडनाव न वापरण्याचे फायदे, ते न वापरण्याच्या तोट्यांपेक्षा जास्त आहेत का. (माझ्या डोक्यात बरेच दिवस हा विचार चालू आहे. माझ्या एका परिचीत कुटूंबाने (ते तमिळ आहेत) आडनाव म्हणून त्यांचे गोत्र लावले आहे त्यांच्या मुलांच्या नावा पुढे.)

वाचने 24330
प्रतिक्रिया 83

प्रतिक्रिया

In reply to by रणजित चितळे

मिप वरील सर्वा॑चा तुमच्यावर विश्वास आहे. पण समाजात ओळख पटवीण्यासाठी आडणावाचा उपयोग होतो हे ही खरे. विनित

In reply to by नितिन थत्ते

>>चितळेसाहेब, ताकाला जायचं तर भांडं कशाला लपवायचं? अरे कर्मा .. काँग्रेसवाल्यांची इथे पण अडचण का ? ;-) गंमतीचा भाग सोडला तर, जातीपातीवरच्या चर्चा वाचून आता वीट आलाय, आपण किती दिवस अश्या नळावरच्या भांडणात कालापव्यय करणार आहोत ते रामालाच ठावूक. (मुद्दाम जातनिरपेक्ष देव निवडला)

In reply to by आनंदयात्री

>>अरे कर्मा .. काँग्रेसवाल्यांची इथे पण अडचण का ? खुसपटे काढण्याचे स्वातंत्र्य आहे पण प्रतिवाद केल्यास अडचण आहे का?

In reply to by रणजित चितळे

राजीव गान्धिची हत्या झाल्यानन्तर राहुल गान्धि कॉलेज बदलला...तेव्हा ओळख लपवायसाठी त्यान्चे नाव बदलले . कारण लिट्टे कडुन धोका होता ...असा सन्दर्भ जाला वर सापडला

In reply to by शाहिर

लिट्टेवाल्यांना कॉलेज शोधून काढता येत नसेल काय?

पुण्याबाहेर सर्वत्र जातिभेद नष्ट होऊन फक्त पुण्यातच कसे जतीयवादी ब्राह्मण राहतात ही नवीन माहिती मिळाली.

उत्तर हिंदुस्थानात बॉस राग कसा व्यक्त करतो. चितळे साहेबांनी म्हटल्याप्रमाणे.............. १. चांगला मूड असेल तेव्हा " अरे राम क्या चल रहा है ? क्या हाल है ? २. थोडे तापमान वाढले कि " यादव ये क्या हो रहा है ? ३. व्यवस्थितरीत्या तापल्यावर " अरे सर मै क्या कह रहा हु आपसे ? 'सर' म्हटले कि समजून जायचे कि आज कोणाचा तरी किंवा आपला तरी पराठा शेकला जाणार.

मराठी आडनावांची महाराष्ट्राबाहेर काय वाट लागते हे पाहील्यावर तरी आडनावाचे तोटेच जाणवतात.. माझ्या "गोतमारे" ह्या आडनावाचे गोटमारे, गूटमारे, घोटमारे, गुटमारी असे अनेक बारसे झालेयत.. कुणाकुणाला सांगत बसणार? बाकीच्या बर्‍याच आडनावांची अशीच लावली जाते.. वाट ;-)

In reply to by चिगो

आमच्या आडनावाची महाराष्ट्रातच मराठी लोकांकडून इतकी रूपांतरे झाली आहेत. थिटे, थेटे, थंटे, सत्ते, सप्ते.

In reply to by नितिन थत्ते

उत्तर भारतीय ळ म्हणू शकत नाहीत त्यामुळे चितले, चिताले, चिटाले व अगदीच जमले नाही तर चिट्स.

In reply to by रणजित चितळे

उत्तर भारतीय ळ म्हणू शकत नाहीत त्यामुळे चितले, चिताले, चिटाले व अगदीच जमले नाही तर चिट्स.
च्यायला म्हणजे शितोळे आडनावाच्या लोकांची पंचाईतच की.