Skip to main content

किसान अधिकार दिवसाची सुट्टी द्या.

लेखक कापूसकोन्ड्या यांनी शुक्रवार, 17/06/2011 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.rediff.com/news/report/growing-voices-in-cong-to-make-rahul-… माननीय दिग्विजय सिन्ग यांनी मनापासून केलेले गौरवोद्गार पहा. सध्या राहूलजीना वेळ नाही. ते स्विसमध्ये सुट्टी घेत आहे. मध्यंतरी उत्तर प्रदेश मध्ये शेतकरी यांची काळजी वाहताना खूप दमछाक झाली. सर्वात महत्वाचे म्हनजे त्यांनी बाबा आणि अण्णासारखी नौटकी केली नाही. येणारा १९ जून हा राहूलजींचा वाढ्दिवस आहे. तो आपण सर्वांनी मनापासून साजरा करूया. त्यांनी शेतकर्यासाठी घेतलेल्या कष्टापासून प्रेरणा घेउन तो किसान अधिकार दिवस म्हणून साजरा करू या. अगोदरच जातीयवादी शक्ती एकत्र येउन निवडून आलेल्या सरकारला त्रास देत आहेत. त्यांची तर थेट पंतप्रधनाना सुद्धा कायद्याच्या कक्षेत आणा अशी मागणी आहे. हे कसे चालेल? उद्याचया पंतप्रधानांविषयी असे बोलणे बरे आहे का? १९ तारखेला सोमवार येतो आहे. शेतकरी अधिकार दिवस म्हणून त्यादिवशी सरकारने सुट्टी द्यावी .नाहीतर तो शेतकर्यांचा अपमान ठरेल. ( आम्हालाही जोडून सुट्टी अल्यमुळे सलग तीन दिवस मिळतील बघु महाबळेश्वरला जात येते का?) लिन्क पहा

वाचने 3220
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

फार्मर्स डे म्हणाकी. किसान दिन काय म्हणताय? ऑनलाईन ग्रीटिंग कार्ड्स आहेत का? "Send greeting card to your nearest farmer' वाक्ये असलेली?

अजुन काही मागण्या, राहुलबाबांचा वाढदिवस हा राष्ट्रीय सण म्हणुन घोषीत करावा. या सणाच्या ३ दिवस आधी आणि ३ दिवस नंतर ड्राय डे असावेत. अजुन काही आठवलं तर बघतो

झकास आयडीया आहे. फार्मर्स डे ची सुट्टी सर्वांना द्या ज्यांची स्वतःची शेती आहे पण कुळे करत आहेत तिथे-तिथे त्या लोकांनी जाऊन ती ती जमिन कसावी. ज्यांच्या कडे शेती नाही त्यानी महाबळेश्वर इ. ठीकाणी जाऊन घरची सुपिक, उपजावू शेती कसावी. ;)

In reply to by विवेक मोडक

घरची शेती घरीच कसण्यात मग त्या डेचं सेलिब्रेशन कसं होईल? जसे व्हॅलेंटाईन डे वगैरेला प्रेम नव्या रूपात अभिव्यक्त करतात (म्हणजे असे जाणते लोक सांगतात म्हणून तरी) तसे सेलिब्रेशनची अभिव्यक्ती महाबळेश्वर वगैरे कुठेतरी जाऊन. ;)

फिरोज दारूवाला/गांधी जन्मदिन = आजोबादिन /ग्रांड फादर डे इंदिरा गांधी जन्मदिन = आजीदिन / ग्रांड मदर डे राजीव गांधी जन्मदिन = बापदिन / फादर डे सोनिया गांधी जन्मदिन = मातृ दिन /मदर डे प्रियांका वढेरा जन्मदिन = भागिनीदिन / सिस्टर डे रोबेर्ट वढेरा जन्मदिन = जावईदिन, भावोजीदिन / सन इन लॉं डे, ब्रदर इन लॉं दिग्विजय जन्मदिन = चमचादिन/ स्पून डे अजून काही असल्यास सांगा.....

In reply to by रणजित चितळे

भारतीय जनतेची पिळवणूक करून किती जमवले हा आकडा समजला (त्यावेळेसचा). इकडचे पैसे तिकडे नेऊन ठेवतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. (थत्ते चीच्यांच्या मनाला यातना झाल्या याची नोंद घेतल्या गेली आहे.)

In reply to by नितिन थत्ते

दुवा रोचक आहे. .................She clarified that she did not hold any offshore accounts. सोनियाने तिच्या बद्दल खुलासा केला आहे. तिच्या नावाने नसले व राजीव गांधीच्या नावाने असले (होते..) ब-याच गोष्टी होऊ शकतात.

In reply to by नितिन थत्ते

आडवाणींना कोणी पत्र कारांनी ह्या माफी मागण्या बद्दल विचारले होते. त्यांनी राजकारण्यांसारखे त्याला काहीतरी उत्तर पण देऊ केले होते. असो आपला मुद्दा पटला - हे राजकारणी इथून तेथून सारखेच. उन्नीस बिसचा का फरक.

In reply to by रणजित चितळे

तेव्हा असेलही पण आता आजकाल स्वतःच्या नावाने ठेवण्याएवढे कोणी दुधखुळे नसावेत असे वाटते आणि शिवाय तांत्रिकदृष्ट्या हे सिद्ध करणे खूपच अवघड असते. आजकाल संपूर्ण जगात निस्वार्थी भावनेने कोणी देशाची सेवा म्हणून राजकारणात असेल असे एखाद्याला वाटत असेल तर तो मूर्खांच्या नंदनवनात राहात आहे असे समजायला हरकत नाही.

In reply to by नगरीनिरंजन

आजकाल संपूर्ण जगात निस्वार्थी भावनेने कोणी देशाची सेवा म्हणून राजकारणात असेल असे एखाद्याला वाटत असेल तर तो मूर्खांच्या नंदनवनात राहात आहे असे समजायला हरकत नाही
भारतापुरते म्हणाल तर सहमत. जगातल्या प्रत्येक राष्ट्रातले राजकारणी तिकडची व्यवस्था पोखरून स्थानिक नागरिकांची एवढी ** *** असतील असे वाटत नाही. अनेक युरोपियन देशातले राजकारणी प्रामाणिक आहेत.देशाबाहेर ते अर्थिक लफडी करत असतील पण स्वतःच्या नागरिकांशी ते प्रामाणिक आहेत.