मासे २८) करंदी
उन्हाळ्यात करंदी भरपुर आणि चांगली येते. त्यामुळे करंदी आणि आंब्याची कढी हे कोम्बीनेशन चांगले जमते. करंदी म्हणजे छोटि कोलंबीच. पहिला कोलिम मग जवळा मग करंदी असा ह्यांचा क्रम
करंदीचे कालवणही करतात. त्यातही कांदा घालतात.
आळुवडीतही करंदी घालतात.
करंदी पुलावही चांगला होतो.
ही आहे करंदी. खर तर कोळणीकडून साफ केलेले वाटेच घेतले पण करंदीचा पुर्ण फोटो हवा म्हणुन तिच्याकडून थोडी न सोललेली करंदी घेतली.
करंदी साफ करुन म्हणजे तिला पुर्ण सोलुन घ्या.
१ ते २ कांदे चिरुन
लसुण पाकळ्या ७-८ ठेचुन
हिंग
हळद, मसाला
मिठ,
थोडी कोथिंबिर बारीक चिरुन
टोमॅटो किंवा कोकम किंवा कैरी
तेल
क्रमवार पाककृती:
भांड्यात तेल गरम करा मग ठेचलेल्या लसुणपाकळ्यांची मस्त फोडणी द्या. आता त्यावर चिरलेला कांदा घालुन बदामी रंग येईपर्यंत तळा. मग त्यावर हिंग, हळद, मसाला आणि घालुन ठवळून त्यावर करंदी घाला व वाफेवर ती शिजवा. शिजताना ती थोडी अळते. म्हणुन शिजल्यावर मिठ घाला म्हणजे मिठाचा अंदाज चुकत नाही. मिठाबरोबर कोकम किंवा कैरी आणि कोथिंबीरही घाला. परत एक वाफ आणुन गॅस बंद करा.
ही बघा तयार झालेली सुकी करंदी.

याद्या
7411
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
आहा..तोंपासु.
इरसाल धन्यवाद. गगनविहारी
जागु , धन्यवाद... must do
In reply to इरसाल धन्यवाद. गगनविहारी by जागु
माझी आजी कोकणात असताना
In reply to इरसाल धन्यवाद. गगनविहारी by जागु
मी आमच्या इथल्या अक्वेरियम
मस्त ...
मासे काय नाय जमत आपल्याला पण
छान
प्राजु धन्स ग. सानिका खरच ग
शाकाहारी असुनही केवळ जागुतै