Skip to main content

मला पिझ्झा बनवायचि क्रुति हवि आहे

मला पिझ्झा बनवायचि क्रुति हवि आहे

लेखक मनिमौ
Published on गुरुवार, 09/06/2011 प्रकाशित मुखपृष्ठ

याद्या 18641
प्रतिक्रिया 55

प्रतिक्रिया

झटपट पिझा बनविण्याची कृती - साहित्य - १) डोमिनोज, पिझा हट किंवा तत्सम कंपनीचे जाहिरात पत्रक २) फोन कृती - १) जाहिरात पत्रिकेत दिलेल्या क्रमांकावर फोन करून हव्या तश्या पिझाची ऑर्डर देणे २) पिझा येईपर्यंत काहीतरी जहाल आणि मादक पेयपान प्राशन करणे

हि घ्या पाकृ... http://fooddreamers.blogspot.com/2011/02/my-style-stuffed-crust-chicken-pizza.html

In reply to by परिकथेतील राजकुमार

परा नवीन सदस्यांच्या अंगावर जाउन प्रतिक्रिया देउ नकोस उगाच. तिला पिझ्झा बनवण्याची पाकृ हवी असेल तर दे ना तिला. घ्या हो तई. सोप्पी पाकृ: १. पिझ्झ बेस घ्यावा २. त्यावर भाज्या टाकाव्यात ३. त्यावर चीज टाकवे आणि ४. स्वतःच खावा. उगा दुसर्‍यावर अत्य्याचार नको बाकी कित्ती छान लिहितो हो तुम्ही. पुलेशु

In reply to by पैसा

खरेच की. तर मनिमौ असे करा की तो जो काही प्रकार तयार होइल तो तव्यावर ठेवुन चांगला भाजुन काढा आणि मग खावा. आवडत असल्यास तुम्ही तो बेसनाच्या पिठात घोळवुन तळु पण शकता. त्याला तुम्ही मिपा पिझ्झा असे नाव देउन सर्व करा वाटल्यास (आधी सांगितल्याप्रमाणे स्वतःलाच सर्व करा फक्त)

In reply to by मृत्युन्जय

परा नवीन सदस्यांच्या अंगावर जाउन प्रतिक्रिया देउ नकोस उगाच. तिला पिझ्झा बनवण्याची पाकृ हवी असेल तर दे ना तिला.
ऑ ? अन्नाचे नुकसान व्हायला नको ह्या हेतुने तो प्रश्न विचारला होता. म्हणजे व्हेज करायचा असेल तर चिकन वैग्रे शब्द टंकुन माझी उर्जा देखील कमी व्हायला नको आणि चिकन देखील वाया जायला नको. आणि उंदरांसाठीच बनवायचा असेल तर लहान आकारात बनवुन श्रम / पैसा / अन्न सर्वच वाचवता येईल ना ? परानाना फडणविस खरेतर अनेक देशवासीय आज जाहिर उपोषण करत असताना पिझ्झाची पाकृ मागणे हा एकप्रकारे देशाचा, महात्मा गांधीचा, अहिंसक मार्गाचा, अण्णा हजारेंचा, बाबा रामदेवांचा, किरण बेदींचा आणि कोणा कोणाचा अपमान आहे असे वाटते. मॅंगेनिज पितळे

अनामिक यांनी पिझ्झाची दिलीच आहे. ही माझी झटपट पाकृ. पिझ्झा बेसची गरज नाही. ब्रेड्च्या स्लाईसेस पण चालतील. कांदा, टोमॅटो, ढब्बू मिरची सगळे बारीक चिरुन घ्या. फोडणी करुन त्यात हे सर्व क्रमाने घाला. तिखट, मीठ, हळद घालून भाजी बनवून घ्या. ब्रेडच्या स्लाईस वर हवी तेवढी भाजी पसरा. त्यावर चीज किसून घाला. पॅनला बटर लावून त्यावर स्लाईसेस ठेवा. हवे तेवढे भाजून टोमॅटो केचअप बरोबर खा.

In reply to by आत्मशून्य

मी तरी यात ग्रील वापरत नाही, आणि भाजी एकाच स्लाईसवर लावते (दोनच्या मध्ये नाही) त्यामुळे सँडवीच ही नाही. आणि आकार गोल असो नाहीतर चौकोण, खायला पिझ्झासारखा नाही लागला तर नाव बदलीन (माझं नाही --- पाकृचं)

In reply to by रुपी

कांदा, टोमॅटो, ढब्बू मिरची सगळे बारीक चिरुन घ्या. फोडणी करुन त्यात हे सर्व क्रमाने घाला. तिखट, मीठ, हळद घालून भाजी बनवून घ्या. ब्रेडच्या स्लाईस वर हवी तेवढी भाजी पसरा. त्यावर चीज किसून घाला. पॅनला बटर लावून त्यावर स्लाईसेस ठेवा. हवे तेवढे भाजून टोमॅटो केचअप बरोबर खा. पदार्थ कदाचित रुचकर असेल, पण तो पिझ्झा नव्हे..... हे तर पिझ्झ्याला देहान्त शासन दिल्यागत आहे!!!!! :) अस्सल इटालियन पिझ्झ्याचा आस्वाद घेतलेला, पिवळा डांबिस "मरावे तरी पिझ्झा खाऊनी मरावे" :)

In reply to by पिवळा डांबिस

तुम्ही इटालियन जेवणाबद्दल फारच रूढीप्रिय दिसता. मागे पास्त्यावर पण आक्षेप घेतला होतात. अमेरिकेत नाही पण भारतात पिझ्झा टोमॅटो केचअप बरोबर सर्रास खाल्ला जातो. पुढील भारत भेटीत एखाद्या छोट्या हाटेलात नक्की खाऊन बघा. (छोट्या म्हणजे पिझ्झाची चेन नसलेल्या. उदा रुईया समोरचे DPs). पिझ्झ्याची ऑर्डर दिली की न मागता केचप ची बाटली येतेच. तसेही बघता अमेरिकन पिझ्झा पण मूळ इटालियन पिझ्झ्याचे बदललेले रूप आहे ना ? उदा, शिकागो ला मिळतो तसा डीप-डिश पिझ्झा इटलीत मिळतो?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

अर्रे पण म्हणुन काय ब्रेडवर फोडणी दिलेल्या भाज्या घालुन खाणार का? उद्या हमुस म्हणुन पिठलं खायला घालाल रे लोकांना.

In reply to by मृत्युन्जय

नाही नाही. त्याला पिझ्झा म्हणा असा आग्रह नाही. त्यांनी केचप ला आक्षेप घेतला त्याला उत्तर म्हणून दिले. मज्जा म्हणजे काकांनी ब्रेड ला आक्षेप नाहीच घेतला. (घेतील असे वाटले होते). अमेरिकेत काही काही ठिकाणी देशी पिझ्झा मिळतो. त्यात अगदी पिझ्झा बेस वर पावभाजी (किंवा बटर चिकन) पण टाकलेली पहिली आहे. आणि खरोखरच चांगला लागत होता तो प्रकार. मज्जा म्हणून प्रश्न.... पिझ्झा म्हणून क्वालिफाय होण्यासाठी नक्की काय काय निकष असावेत बरे? १) पिझ्झा बेस २) चीज.....पुढे??

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

>>>अमेरिकेत काही काही ठिकाणी देशी पिझ्झा मिळतो. त्यात अगदी पिझ्झा बेस वर पावभाजी (किंवा बटर चिकन) पण टाकलेली पहिली आहे. आणि खरोखरच चांगला लागत होता तो प्रकार. अगदी अगदी! बे एरियामध्ये एके ठिकाणी देशी पिझ्झा मिळतो. तिथे पनीर, छोले असे बरेच टॉपिंग्स असतात. आणि 'सरसो का साग' वाला पिझ्झा म्हणजे तर 'हाय .. मैं मर जावा'! अवांतरः बाकी मिपावर फेमश कसं व्हायचं ते शिकतेय हळू हळू. पहिल्यांदाच माझ्या प्रतिक्रियेची इतक्या लोकांनी दखल घेतली आहे :)

In reply to by रुपी

बाकी मिपावर फेमश कसं व्हायचं ते शिकतेय हळू हळू. तुम्ही मिपावर जरूर फेमस व्हा. तुमचं स्वागत आहे. पण सो कॉल्ड मिरवणुकीमध्ये सामील झालात तर ते जमणं कठीण आहे.... :) तुम्ही अनेकानेक चांगल्या पाककृती देऊन फेमस व्हा. त्यासाठी वाटल्यास मिपावरच्या प्रभाकर पेठकर, स्वाती राजेश, स्वाती दिनेश या पाककृती-दिग्ग्जांचं लिखाण वाचून काढा... तुम्हाला मी हार्दिक सुयश चिंतितो!!

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

त्याला पिझ्झा म्हणा असा आग्रह नाही. नाही ना, मग तेच म्हणतोय मी. की पदार्थ म्हणून हे प्रकार रुचकर असतीलही पण तो पिझ्झा नव्हे!! एकमत आहे की आपलं!!! त्यांनी केचप ला आक्षेप घेतला त्याला उत्तर म्हणून दिले. भारतातल्या हाटेलांत केचप घालून खाल्ला जातो म्हणून पिझ्झा तसाच असतो/ असावा हे तुमचं लॉजिक विचित्र आहे. भारतातल्या सो कॉल्ड पिझ्झ्यावर मी कोथिंबीर घातलेलीही पाहिली आहे एकदा! म्हणून काय लगेच तो पिझ्झ्याचा इनग्रेडियंट होतो का? मज्जा म्हणजे काकांनी ब्रेड ला आक्षेप नाहीच घेतला. (घेतील असे वाटले होते). ब्रेडला आक्षेप घेतला नाही कारण त्याबाबतीत आम्ही मिपावर हात टेकले आहेत. पिझ्झा या विषयावरचे मिपावरचे पूर्वीचे धागे वाचून बघा. त्यात पोळी, नान, टॉर्टीयाज, रोगनी नान असे काहीही बेस (खरतंर बेसलेसच ते!!;)) वापरले आहेत, आणि जरा कुरकुर केली तर आम्हाला खाऊन बघा असा दम देऊन इथल्या त्या तथाकथित सुगरिणींनी गप्प केलं आहे!!!! :) तुम्ही अमेरिकेतल्या पिझ्झ्यावरून मला टोकता आहांत. कारण माझं वास्तव्य तिथे आहे हे तुम्हाला माहिती असल्याने मी अमेरिकन पिझ्झ्याची तरफदारी करतो आहे असा सोईस्कर गैरसमज तुम्ही करून घेतला असावा. अमेरिकेत सहजासहजी मिळतो (चेन मधला, पिझ्झा हट, डॉमिनो, पापा जॉन, शिकागोचा डीप डिश) तो अस्सल पिझ्झा नव्हे. हां, अमेरिकेतही कधीकधी अस्सल पिझ्झा मिळतो, पण तो छोट्या माँमॅन्डपॉप रेस्तॉरंटमध्ये, विशेषतः न्यूयॉर्क आणि बॉस्टनमध्ये काही ठिकाणं मला माहिती आहेत! मी अस्सल पिझ्झा म्हणजे खुद्द इटालियन पिझ्झ्याची गोष्ट करतो आहे जो मी स्वतः इटलीत जाऊन खाल्लेला आहे. त्यातही चवीला आणि टेक्श्चरला रोमचा, सिसिलियन, नापोली (नेपल्सचा), मोन्झाचा आणि मिलानचा असे वेगवेगळे पाठभेद आहेत. हे मी स्वतः अनुभवलेले आहेत!!!! (और ये विश्वनाथराव मेरेको पिझ्झा सिखाता है!!! ह. घ्या!!:)) तुम्ही ईटालियन जेवणाच्या बाबतीत रूढिप्रिय दिसता.. मी रूढिप्रिय असण्याचा इथे संबंध नाहीये. पोटभरीला एखादा पदार्थ कुणी केला, योगायोगाने तो रुचकर असला तर त्याला माझी काहीही हरकत नाही. पण त्याचा संबंध जर एखाद्या आधीच एस्टॅब्लिश असलेल्या पदार्थाशी जोडायचा असेल तर तो बादरायण संबंध असलेला मला खटकतो. तिथे मग त्या मूळ डिशचं कुळशील जपलं गेलें असलं पाहिजे हा माझा आग्रह असतो इतकंच. भोपळ्या मिरचीची भाजी ब्रेडाच्या स्लाईसवर पसरून वरून चीझ घातलं तर चांगलं लागेल का? तर हो, लागेल! (तसं चीझ किंवा फरसाण वरून घातलं तर काहीही चांगलं लागतं, ते सोडा!!;)) पण त्याला पिझ्झा म्हणायला माझी हरकत असेल. पिझ्झा म्हणून क्वालिफाय होण्यासाठी नक्की काय काय निकष असावेत बरे? १) पिझ्झा बेस २) चीज.....पुढे?? माझ्या मते, पिझ्झा बेस, मारिनारा किंवा अल्फ्रेडो सॉस, मसाल्यासाठी म्हणून ओरॅगनो/ बेसिल/ थाईम, मॉझ्झरेला चीझ! मग वर तुम्ही टॉपिंग्ज तुमच्या आवडीने टाका. अस्सल इटालियन पिझ्झ्यावर प्रश्युतो हमखास आढळतं... अथः तो पिडांकाकाकृत पिझ्झापुराणं संपूर्णंम्|| ओम शान्ती शान्ती शान्ती|| :)

In reply to by पिवळा डांबिस

सहमत इटालियन उपहारगृहात काही काळ नोकरी केली आहे .त्यामुळे अस्सल इटालियन खाद्य पदार्थ व ते बनवण्यामागे त्यांची तळमळ सुद्धा पहिली आहे . बाकी अमेरिकन व जर्मन पिझ्झा सुद्धा वाईट नसतात पण ते अस्सल पिझ्झा नसतात तर पिझ्झाचे अमेरिकन अथवा जर्मन प्रकार असतात . हापूस आणी पायरी मध्ये जो फरक असतो तोच इटालियन व इतर पिझ्झा मध्ये असतो . अवांतर ( आमचा सेलिब्रेटी शेफ जेव्हा( tiramasu डेझर्ट )बनवायचा तेव्हा ते पाहणे व नंतर चाखणे ही एक दिव्या अनुभूती असायची .

In reply to by निनाद मुक्काम …

अस्सल इटालियन खाद्य पदार्थ व ते बनवण्यामागे त्यांची तळमळ सुद्धा पहिली आहे .
वा वा वा मग पूटेनास्का म्हाइतच असल की अनं ते बनवण्यामागची तळमळ सूध्दा..... ;)

In reply to by शिल्पा ब

मंग ? इटालीयन माणसाच तळमळीने बनवलेला पदार्थ म्हटल व त्यावरून पूटेनास्का आठवला तर त्यात चूक काय ? रसीक लोकांना हे माहीत पायजेल/असतच, ताइ....

In reply to by मृत्युन्जय

नेमक बोललात... कारण अगदी याच भावनेने तो इटालीयन पदार्थ इटालीयन व्यक्तीनी बनवलेला असतो. :)

In reply to by पिवळा डांबिस

>>भारतातल्या हाटेलांत केचप घालून खाल्ला जातो म्हणून पिझ्झा तसाच असतो/ असावा हे तुमचं लॉजिक विचित्र आहे. असे मी कुठेच म्हटले नाही. मी स्वतः अनेकदा केचप शिवाय खाल्ला आहे पिझ्झा. आणि याच न्यायाने, इटलीत / अमेरिकेत केचप घातला जात नाही म्हणून कुणी केचप घातला तर तो पिझ्झा नाही हे तुमचे लॉजिक विचित्र ठरते (उड्या मारून नाच केल्याची स्मायली) >>तुम्ही अमेरिकेतल्या पिझ्झ्यावरून मला टोकता आहांत. कारण माझं वास्तव्य तिथे आहे हे तुम्हाला माहिती असल्याने मी अमेरिकन पिझ्झ्याची तरफदारी करतो आहे असा सोईस्कर गैरसमज तुम्ही करून घेतला असावा नाही. तुम्ही पहिल्याच प्रतिसादात ओरिजिनल इटालियन पिझ्झा खाल्ल्याचा उल्लेख केला होतात. पण तुम्ही अमेरिकेतला पिझ्झा नक्की खाल्ला असणार म्हणून आणि मी तिथला पिझ्झा खाल्ला आहे म्हणून त्याचा उल्लेख केला. >> अमेरिकेत सहजासहजी मिळतो (चेन मधला, पिझ्झा हट, डॉमिनो, पापा जॉन, शिकागोचा डीप डिश) तो अस्सल पिझ्झा नव्हे. पण त्याला तुम्ही तरीही पिझ्झाच म्हणत असाल ना? आज आपण पिझ्झा सदृश पदार्थ खायला डॉमिनो मध्ये जाऊ असे नक्की म्हणत नसाल ;-) >>और ये विश्वनाथराव मेरेको पिझ्झा सिखाता है!!! ह. घ्या!! छे हो, मी कुठे काय शिकवणार? मलाच स्वतःला ओरिजिनल इटालियन पिझ्झा खायचा आहे. मुंबई-पुणे पट्ट्यात कुठे मिळतो माहित असेल तर कळवा हो कुणीतरी. >>पण त्याचा संबंध जर एखाद्या आधीच एस्टॅब्लिश असलेल्या पदार्थाशी जोडायचा असेल तर तो बादरायण संबंध असलेला मला खटकतो. तिथे मग त्या मूळ डिशचं कुळशील जपलं गेलें असलं पाहिजे हा माझा आग्रह असतो इतकंच. मुद्दा थोडासा मान्य. पण हे कुळशील जपणे तसे बरेचसे सापेक्ष असते. भारतात चायनीज म्हणून जे जेवण मिळते ते चायनीज माणसाला अजिबात चायनीज वाटणार नाही. अमेरिकेतील चायनीज हॉटेलात पण जे मिळते ते अमेरिकन संस्करण झालेले असते. अमेरिकेतील देशी हॉटेलात अनेकदा भारतीय पदार्थांचा अपमान बघायला मिळतो. देशी हॉटेलात गोऱ्या (किंवा कुठलेही अभारतीय) माणसांची गर्दी दिसली की समजावे, इथे खूपच सपक जेवण मिळणार. पण भारतात कधीही पाय न टाकलेला माणूस त्यालाच भारतीय समजून खाणार. एका ठिकाणाचा पदार्थ दुसरीकडे जाताना त्यात काही ना काही बदल होणारच की. स्थळाप्रमाणे होणारे हे बदल काळाप्रमाणे पण होत राहणार. >>माझ्या मते, पिझ्झा बेस, .... मग वर तुम्ही टॉपिंग्ज तुमच्या आवडीने टाका. अस्सल इटालियन पिझ्झ्यावर प्रश्युतो हमखास आढळतं... फोडणी दिलेली भोपळी मिरचीची भाजी ही एखाद्याची आवड असेल तर ??? :-) असो, हा वाद चालू राहणार. मुंबईत याल तेव्हा कळवा, देशी पिझ्झा विथ केचप खायला जाऊ :-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मुंबईत याल तेव्हा कळवा, देशी पिझ्झा विथ केचप खायला जाऊ तुम्ही हे सस्नेह आमंत्रण केल्यामुळे मी माझ्याकडून हा वादच संपवत आहे!!! (उड्या मारून नाच केल्याची स्मायली!!!!)

मी तरी यात ग्रील वापरत नाही, आणि भाजी एकाच स्लाईसवर लावते (दोनच्या मध्ये नाही) त्यामुळे सँडवीच ही नाही. आणि आकार गोल असो नाहीतर चौकोण, खायला पिझ्झासारखा नाही लागला तर नाव बदलीन (माझं नाही --- पाकृचं)

कोनितरी फटु टाका यार ! तोंडाला पानी सुटले आहे, दुपारी पिझ्झा हट गाठले पायजे.

In reply to by Mrunalini

इकडे म्हणजे कुठे? पराबरोबर मीही येतो. साला असला कातिल फोटो तर पिझ्झा हटच्या अ‍ॅड मध्ये पण नसतो.

In reply to by Mrunalini

व्हिसा चार्जेस, विमानाचे तिकीटभाडे आणि रजेच्या दिवसांचा बुडलेला पगार लक्षात घेता लिटल इटली मध्ये जाउन पिझ्झा खाउन यावा म्हणतो ;)

In reply to by मृत्युन्जय

कुठे आहे लिटल इटली मी पण येतो चल, कधी जायचं सांग. पुन्हा मनानं जड मनानं डायट बद्दल विचार करायला सुरु करायच्या आधी अशा सगळया ठिकाणी गेलं पाहिजे बाबा, उगा उद्या उपोषणाला बसायची पाळी आली तर ..... नको नको त्या आधी जाउनच येउ.

In reply to by ५० फक्त

एबीसी फार्म्स (कोरेगाव पार्क) मधेही इटालियन उत्तम मिळत असावे. चीज फाँड्यू (उच्चाराबद्दल क्षमस्व) वाईनसोबत दोनतीनदा खाल्ला आहे तिथे. तेही इटालियन असावे. मधे उकळते चीज आणि भाज्यांचे प्रिपरेशन आणि पावाचे तुकडे त्यात बुडवून खायचे म्हणे.

In reply to by गवि

चीज फाँड्यू ती कॉण्टिनेण्टल डिश असतीया. आपल्यासारख्या वजनदार लोकांनी नाव काढले तरी १०० दोरीच्या उड्या माराव्यात.

In reply to by गवि

चीज फाँड्यू (उच्चाराबद्दल क्षमस्व) वाईनसोबत दोनतीनदा खाल्ला आहे तिथे. तेही इटालियन असावे. फाँड्यू हा स्विस पदार्थ आहे. स्वित्झर्लँड आणि त्या पाठोपाठ फ्रांसमध्ये लोकप्रिय आहे. स्वातीताईंनी ओळख करून दिलेल्या राकलेटचं चुलत भावडं. चीज असलेला कोणताही पदार्थ मला बाय डिफॉल्ट आवडतो :)

In reply to by स्मिता.

फाँड्यू हा स्विस पदार्थ आहे, हेच लिहायला आले होते, वर कोणी तरी विचारले आहे की अमेरिकेसारखा पिझ्झा इटालीत मिळतो का? मूळात अमेरिकेत मिळतो किवा युरोपेतर कोठेही मिळणारा पिझ्झा थोडा वेगळा, कस्टमाइझ्ड असतो. युरोपात असलेल्या इटालियन पिझ्झेरियात मिळणारा पिझ्झा आणि पिझ्झा हट मधील पिझ्झा यामध्येही खूप फरक असतो. स्वाती

१. पाव मधोमध कापुन घ्या. २. एका वाटीत पेरी-पेरी (हॉट सॉस) आणी टोमाटो केचप मीक्स करून घ्या. ३. आता हे मिशरण कापलेल्या पावाला लावून घ्या. ४. कापलेल्या भाज्यांना हलकेच मीठ घालून, ढवळावे (लाल-पिवळी-हिरवी ढोबळी मिरची, कांदा-जरा मोठा कापून, टोमाटो, स्वीट कॉर्न-नसतील तरी चालेल) ५. या भाज्या पावावर पसरवा, त्यावर मिरपूड घाला, चीली फ्लेक्स घाला (तिखट चालणार असेल तर) ६. शेवटी यावर भरपूर चीज (किसलेले) घाला. ७. ओवन मध्ये साधारण १२० degree वर १०-१५ मिनीटे ठेवा. ८. साधारण चीज वितळून थोडे लालसर होत आले कि , त्यावर ताव मारू शकता..