Skip to main content

चित्रकार एम एफ हुसेन गेले..

लेखक योगी९०० यांनी गुरुवार, 09/06/2011 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसिद्ध चित्रकार एम एफ (माधुरी फिदा) हुसेन यांचे लंडन येथे निधन.. आपल्या चित्राने दुसर्‍या धर्माच्या देवतांची विटंबना करणारा माणूस चचला याचा आनंद मानावा की माणुसकी म्हणूने शोक करावा ह्या संभ्रमात...!!

वाचने 12525
प्रतिक्रिया 75

प्रतिक्रिया

In reply to by सामान्य वाचक

एकदाचे लिहावे असे वाटते हो....पण लगेच त्यावर लोकांच्या काय माणूसकी आहे की नाही अश्या प्रतिक्रिया येतील... सामान्य वाचक : तुम्हाला काय माणूसकी आहे की नाही ...?

In reply to by योगी९००

आपल्या चित्राने दुसर्‍या धर्माच्या देवतांची विटंबना करणारा माणूस चचला -- यापलिकडे काहीच माहीत नाही म्हणा की

In reply to by मी-सौरभ

पुरे. मर्यादा ओलांडली जाऊ नये याकरिता आधीच सावधानीचा इशारा देत आहे.

In reply to by मालोजीराव

मेणबत्या लावायचे सोडून अशा काळिमा फासणार्‍या प्रतिक्रीया लोक कसे देऊ शकतात ? असो... आज पिल्यास त्याला शेलिब्रेट समजले जाईल काय ?

कलाकार गेला की त्यांच्या कलाकृतीला भाव येतो म्हणतात. त्यांच्या मागे न विकलेली किती चित्रे राहीली आहेत म्हणे?

व्यक्तीस्वातंत्र्याचा उदो उदो करणार्‍या उच्चभ्रु वर्गातल्या काहीना खुप वाईट वाटेल

उलथलं का एकदाचं ते विकृत म्हातारं? चला, आज दगडुशेठपुढं किलोभर पेढे आणि श्रीफळ-माळ ठेवून यावं झालं. >>लगेच त्यावर लोकांच्या काय माणूसकी आहे की नाही अश्या प्रतिक्रिया येतील.. क्यॅय्य रॅव योगी... इतके दिवस आहात मिपावर. तुम्हाला फाटा म्हैत नै? :D

In reply to by धमाल मुलगा

क्यॅय्य रॅव योगी... इतके दिवस आहात मिपावर. तुम्हाला फाटा म्हैत नै? फाटा ची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद... चचलं एकदाचं थेरडं..

एक कुशल आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचा चित्रकार गेला म्हणून वाईट वाटले. त्यातून तो जन्माने मराठी होता. मूळ गाव पंढरपूर. विक्षिप्त वागण्याने बदनाम झाला असला आणि विशेषतः हिंदुत्ववाद्यांच्या तिरस्काराला कारणीभूत झाला असला तरी कलेच्या प्रांतात त्याच्याबद्दल असलेले आदराचे वलय पुसले जाणार नाही. हुसेन याने केवळ देवतांची नग्न चित्रेच रेखाटली आहेत, असे नाही. अमूर्त चित्रकला (अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटींग) प्रकारात हुसेन यांचे नाव जगभर आदराने घेतले जाते. 'घोडा' या विषयावरील त्यांचा चित्रसंग्रह हा केवळ बघण्यासारखा आहे. घोड्याच्या असंख्य ऐटबाज लकबी आणि बारकावे त्यातून दिसतात. एका कुरणात चार जंगली घोडे स्वतःच्या मस्तीत चौखुर दौडतानाचे चित्र हे 'मास्टरपिस' म्हणावे लागेल. 'मरणान्तानि वैराणी' ही हिंदू संस्कृतीची शिकवण आहे. माणूस मेल्यावर त्याला शिव्या देऊन उपयोग नाही. पण हे सांगावे कुणाला? तसं बघायला गेलं तर हुसेन यांचा मला वेगळ्या कारणासाठी राग होता. 'गजगामिनी' म्हणून हा अनवाणी म्हातारा आमच्या आवडत्या माधुरी दिक्षितच्या मागे लागला होता. (अरे मग आम्ही 'तेजाब'पासून इतके दिवस रांगेत उभे राहिलो त्याचे काय? म्हातारबाबा, रांगेत पुढे घुसू नका, असे कितीदा ओरडून सांगितले.) आता तेही मनोरंजन संपले....

In reply to by योगप्रभू

मूळ गाव पंढरपूर. विक्षिप्त वागण्याने बदनाम झाला असला
मग बरोबरै! ;)

In reply to by धमाल मुलगा

पंढरपूर..... पंढरपूर........ धम्याला आज गिर्‍हाईक गावलं धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तडधत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तडधत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तडधत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तडधत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तडधत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तडधत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तडधत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तडधत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तडधत्तड तत्तड धत्तड तत्धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तडधत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तडतड धत्तडधत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड वधत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड धत्तड तत्तड धत्तडतत्तड धत्तड धत्तडधत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तडधत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तडधत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तडधत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तडधत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तडधत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तडधत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड

In reply to by धमाल मुलगा

पंढरपुरांच असं वाईट मागच्या २५-३० वर्षापासून झालं अशी कल्पना होती, आयला इथं तर इतिहास आहे .. विठ्ठलाsssss .. अरे बाबा सुट्टीवर आहेस का ?

In reply to by आनंदयात्री

पण पंढरपूरकर सुट्टीवर दिसताहेत!!! च्यामारी, या जीएमच्या!!!!! उद्याच विकून टाकतो सगळे शेअर्स!!!! :) बाकी डोईवर झुल्पं राखायची फॅशन या पंढरपूरातूनच आली असेल काय? "आमचा आमच्या लाडक्या केसांवर भारीच जीव हो!!" इत्यादि, इत्यादि.... :)

In reply to by पिवळा डांबिस

बाकी डोईवर झुल्पं राखायची फॅशन या पंढरपूरातूनच आली असेल काय? "आमचा आमच्या लाडक्या केसांवर भारीच जीव हो!!" इत्यादि, इत्यादि.... अगदि अगदि. ;) अभिज्ञ

In reply to by धमाल मुलगा

राज ठाकरे यांची प्रतिक्रिया - येथे. बाकी, योगप्रभू, प्रदीप आणि बिका यांच्याशी सहमत.

In reply to by योगप्रभू

मूळ गाव पंढरपूर. विक्षिप्त वागण्याने बदनाम झाला असला हे वाक्य आधी वाचल्यासारखे वाटत आहे. काही साम्यस्थळे आठवली :) असो.

In reply to by योगप्रभू

एकांगी प्रतिक्रियेच्या बाबतीत सहमत. काही महिन्यांपूर्वी (त्यांनी आखाती देशात नागरिकत्व घेतले तेव्हाची) 'अल- जझिरा'वर रियाझ खान ह्यांनी त्यांची घेतलेली मुलाखत पाहिली होती. त्यात त्यांनी त्यांच्या लहानपणीच गेलेल्या आपल्या आईविषयी सांगितले होते, व स्त्री-रूपाची दर्शने घडवणारी त्यांची अनेक चित्रे तिच्या वियोगाच्या संदर्भातून आली आहेत असे म्हटले होते. ही मुलाखत मला अगदी प्रांजळ वाटली, त्यात कसलाही अभिनिवेष नव्हता. सदर मुलाखत इथे पहाता येईल. आता ते अल्लाला प्यारे झाले आहेत. खुदा हाफिज़, श्री. हुसैन.

In reply to by प्रदीप

योगप्रभूंचा ही प्रतिसाद आवडला इन्ना लिल्लाही व इन्ना लिल्लाही राजिऊन ! अल्लाह हाफिज़, हुसैन जी !

In reply to by प्रदीप

योगप्रभू आणि प्रदीप यांच्याशी सहमत आहे. तशीच प्रतिक्रिया द्यायला आलो होतो. त्यांनी काम वाचवले. मला चित्रकलेतले काही कळत नाही त्यामुळे हुसेन मोठे का? का मोठे? नक्की किती मोठे? याची उत्तरे माझ्यापाशी नाहीत. मी जाणकारांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवतो. त्यांनी देवतांची रेखाटनं करताना खूप काळजी बाळगायला हवी होती असेही वाटते. पण म्हणून त्यांना जसे वागवले गेले तेही काही योग्य नव्हतेच. निषेध जरूर करावा पण असा नव्हे. शिवाय, त्यांच्या निधनाबद्दल आनंद व्यक्त करणेही मला गैर आणि निषेधार्हच वाटते. बाकी 'मरणान्तानि वैराणि..' वगैरे आहेच. असो.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

>>>>निधनाबद्दल आनंद व्यक्त करणेही मला गैर आणि निषेधार्हच वाटते. सहमत.....! बाकी, चालू द्या...! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत आहे. सत्यसाईबाबा गेल्यावरच्या धाग्यातही काही विविक्षित विचारसरणीच्या लोकांनी आनंद वर्तवला आहे. त्यांचे इथले प्रतिसाद खरेच रोचक आहेत. तिथले आणी इथले माणुसकीचे निकष सारखे असावेत का ?

In reply to by आनंदयात्री

बास बास आंद्या मी ही हेच लिहीणार होतो. मनातलं लिहीलं आहेस.

In reply to by प्रदीप

योगप्रभू आणि प्रदीप यांच्याशी सहमत. हुसैन हे आत्ताच्या काळातले एक मोठे कलाकार होते ह्याबाबत कोणालाही शंका असायचे कारण नाही. मरणांन्तानी वैराणी म्हणण्याइतके मी त्यांना कधी देशाचे अथवा हिंदूंचे वैरी मानलेच नव्हते. जो काही आक्षेप त्यांनी काढलेल्या हिंदू देवदेवतांच्या चित्रांबद्दल होता, तो माझ्या लेखी (मी आधी इतरत्र देखील म्हणले आहे) हुसैन यांच्यावर नसून स्वतःला हवी तेंव्हा कशावरही बंदी आणणार्‍या आणि स्वतःला हवे तेंव्हा दुर्लक्ष करणार्‍या सरकारी/राजकारणी वृत्तीवर आहे. माधुरीची चित्रे त्यांनी कशी काढली वगैरे हा त्यांच्यातला आणि माधुरीमधला मुद्दा! तीला हरकत नसेल तर आपण कोण मधे पडणारे? असो. हुसैन यांना श्रद्धांजली...

In reply to by योगप्रभू

तुम्ही छान माहिती दिलीत बाकीचे सगळे सकाळची कामे इथे करत बसतात

'गजगामिनी' म्हणून हा अनवाणी म्हातारा आमच्या आवडत्या माधुरी दिक्षितच्या मागे लागला होता. (अरे मग आम्ही 'तेजाब'पासून इतके दिवस रांगेत उभे राहिलो त्याचे काय? म्हातारबाबा, रांगेत पुढे घुसू नका, असे कितीदा ओरडून सांगितले.) हा! हा ! हा ! खरे तर मला त्यांची चित्रे कधीच समजली नाहीत . तशी ही कधी समजत नाही म्हणा ! एकदा मी आमच्या बॉस बरोबर जहांगीर आर्ट गैलरीला चित्रप्रदर्शासाठी गेले होते. आमच्या मैडमना चित्रांचा फार नाद होता. कित्ती पैसा ओतला असेल त्यांनी महागडी चित्रे खरेदि करण्यात देव जाणे .. तर त्या प्रदर्शनात एक चित्र होते फक्त एक आडवी रेष अन खाली "जय श्री कृष्ण ! " सगळे त्या चित्राला निहाळून पहात होते अगदी आमच्या मैडम पण.. मला काहीही कळले नाही म्हणून मी पुढे दुसर्‍या चित्रासमोर गेले नंतर पुढे काऊंटर वर मैडमनी तेच चित्र १५,५००/- ला खरेदी केले होते .. मी त्यांचे मन न दुखावता विचारले "त्यात श्री कृष्ण कुठे आहे हो, का एवढे पैसे टाकलेत" तर मैडम नी उत्तर दिले "अग वाहीदा, कृष्णाची बासुरी नाही दिसली तुला ? "मी अचाट ती आडवी रेष बासुरी होती तर ? बाब्बो ! मी अगदी व्वा व्वा छान खरेदी म्हणून प्रशंसा केली पण मला त्यात खरे तर कृष्णाची बासुरीही दिसली नाही कारण त्या रेषेवर मोरपिसे ही नव्हती ..

In reply to by वाहीदा

>>खरे तर मला त्यांची चित्रे कधीच समजली नाहीत . तशी ही कधी समजत नाही म्हणा ! काही चित्रांबाबत सहमत. मला तर वेलकमधील अनिल कपूर ने काढलेल्या चित्राची आठवण झाली. बाकी धाग्यावरील काही प्रतिसाद वाचुन कीव आली... असो चेतन

In reply to by चेतन

काही चित्रांबाबत सहमत. मला तर वेलकमधील अनिल कपूर ने काढलेल्या चित्राची आठवण झाली. बास बास.. हेच म्हणायचं होतं मलाही.

लेट्स मेक पार्टी टु नाइट.......................................................... ए धिंगचाक धिचाक धिंगचाक धिचाक धिंगचाक धिचाक धिंगचाक धिचाक धंदाडाम तंदाडाम धंदाडाम तंदाडाम धंदाडाम तंदाडाम धंदाडाम तंदाडाम धंदाडाम तंदाडाम धिंगचाक धिचाक धंदाडाम तंदाडाम धिंगचाक धिचाक धंदाडाम तंदाडाम धिंगचाक धिचाक धंदाडाम तंदाडाम धिंगचाक धिचाक धंदाडाम तंदाडाम धिंगचाक धिचाक धंदाडाम तंदाडाम धिंगचाक धिचाक धंदाडाम तंदाडाम धिंगचाक धिचाक धंदाडाम तंदाडाम धिंगचाक धिचाक धंदाडाम तंदाडाम धिंगचाक धिचाक धंदाडाम तंदाडाम धिंगचाक धिचाक धंदाडाम तंदाडाम धिंगचाक धिचाक धंदाडाम तंदाडाम धिंगचाक धिचाक धंदाडाम तंदाडाम धिंगचाक धिचाक धंदाडाम तंदाडाम धिंगचाक धिचाक धंदाडाम तंदाडाम धिंगचाक धिचाक धंदाडाम तंदाडाम धिंगचाक धिचाक धंदाडाम तंदाडाम धिंगचाक धिचाक धंदाडाम तंदाडाम धिंगचाक धिचाक धंदाडाम तंदाडाम धिंगचाक धिचाक धंदाडाम तंदाडाम धिंगचाक धिचाक धंदाडाम तंदाडाम धिंगचाक धिचाक धंदाडाम तंदाडाम धिंगचाक धिचाक धंदाडाम तंदाडाम धिंगचाक धिचाक धंदाडाम तंदाडाम धिंगचाक धिचाक धंदाडाम तंदाडाम धिंगचाक धिचाक धंदाडाम तंदाडाम धिंगचाक धिचाक धंदाडाम तंदाडाम धिंगचाक धिचाक

चुलीत गेला एम. एफ... गोवर्‍या गेल्या ना स्मशानात त्याच्या.. मग इथे धागा काढून कशाला प्रसिद्धी करताय.. - (पक्का थेरडाविरोधी) पिंगू

मेलेल्या डुकरा विषयी देखील पुणेकर वाईट शब्द काढत नाही .. म्हणुन पुणेकरांनी "सद्ध्या गप्प बसायचे ठरवले आहे." बाकी हुसेन च्या स्किल्स चा नेहमीच आदर वाटत आला होता :) एक चित्रकार गेल्याचे दु:ख , आणि एक थर्की म्हतारं मेल्याचे सु:ख , अशी संमिश्र प्रतिक्रीया पुणेकरांमध्ये पहायला मिळाली. - वार्ताहार

In reply to by टारझन

अश्या वार्तांकनाबद्दल डुक्कर जमातीने निषेध व्यक्त केला आहे अशी बातमी नुकतीच हाती आली आहे चपला हार

योगप्रभू , विकास , प्रदीप आणि इतर काही लोकांच्या भावनांशी सहमत आहे. बाकी सगळं रोचक आहे.

In reply to by धनंजय

या कारणाने का होईना हुसेन यांच्या चित्रकलेबद्दल काही वाचायला मिळेल अशी आशा आहे.

एक माणूस व एक कलावंत यात गल्लत होऊ नये. हुसेन हा कलावंत म्हणून फार थोर होता. त्याच्या रेषेत जो फोर्स होता तो चित्रकला जाणणार्‍यालाच कळेल. आणि माणूस म्हणून कसा होता ते माहीत नाही. तरीही गेलेल्या व्यक्तिबद्दल अनुदगार काढण्याची आपली संस्कृती नाही व नसावी अशा मताचा मी आहे. तो कसाही असला तरी त्याच्या मृतात्म्यास शांति लाभो!

In reply to by सुहास..

आणि राजजींची प्रतिक्रीया? इथले पेढे वाटणारे लोक मला राजजींचेही फ्यान आहेत असे वाटायचे.

In reply to by अलख निरंजन

राजला त्याच्या प्रतिक्रियेसाठी माफ केले असे म्हणूया. मध्यंतरी (म्हणजे जेव्हा झेंडा रीलीज झाला होता तेव्हा) राजने मनसे कार्यकरत्यांनी चित्रपटगृहांवर हल्ले करू नका, ज्याना बघायचे आहे ते पिक्चर बघतील ज्यांना त्याच्यावर विश्वास ठेवायचा ते ठेवतील अशा पद्धतीचे विधान केले होते. त्यामुळे त्याने ते विचार मांडले असतील तर कदाचित तो त्याच्या तत्वांशी (जरी ती मला पटली नाहीत तरी) प्रामाणिक असावा असे वाटते. म्हणून माफी. आमचा राजला पाठींबा फक्त मराठीच्या बाबतच्या विचारांबद्दल आहे. अन्यत्र आगाऊपण करायला जाईल तर त्याची साथ सोडायला मला तरी काही वाईट वाटणार नाही.

हम्म..! आमच्या देवदैवतांची विकृत चित्रे काढणारा इसम गेला. त्याच्या आत्म्यास शांती लाभो.. आज शबाना आझमी नामक एका ढालगज भवानीला हुसेनच्या नावाने गळे काढताना पाहिले.. हुसेनने हिंदु देवदैवतांची विटंबना केल्यामुळे शबानाला तो निश्चितच प्रिय असावा. असो.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आज शबाना आझमी नामक एका ढालगज भवानीला हुसेनच्या नावाने गळे काढताना पाहिले.. शबाना आझमीस भवानी संबोधून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल निषेध! ;)

In reply to by विकास

>>आज शबाना आझमी नामक एका ढालगज भवानीला हुसेनच्या नावाने गळे काढताना पाहिले.. शबाना आझमीस भवानी संबोधून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल निषेध! सहमत आहे.... शबाना मध्ये भवानी पहाणार्‍या तात्यात आज मला एम्.एफ. हुसेन दिसला ;)

कांहीं चांगले लिहिता येत नसेल तर गप्प बसावे या न्यायाने माझी 'आळीमिळी'

'मरणान्तानि वैराणी' ईंदिरा गांधीचे आणीबाणीच्या काळात देवीच्या स्वरुपात चित्र काढली होती..

हुसेन यांना माझी श्रद्धांजली. त्यांची काही चित्रे नक्की स्मरणात राहतील. ९५ वर्षाच्या आयुष्यातून केवळ एक लोकांच्या धार्मिक भावना दुखावणारा इसम मृत्यू पावला असे सार काढणे मला कळलेले नाही. हुसेन यांची काही चित्रे इथे पहा.. http://www.mfhussain.com/paintings

चित्रकलेला हायर व्हिजुअल मॅथेमॅटिक्स म्हणणारा प्रतिभावंत म्हातारा गेला. काल त्याचे एक ऑथेल्लो नावाचे चित्र बघितले. तीन रंग आणि तीन आकृत्यांमध्ये त्याने ऑथेल्लो , डेस्डिमोना आणि इयागो ला जिवंत केले होते.ज्यात ऑथेल्लो ही मध्यवर्ती आकृती होती आणि बाकी दोन्ही मुखवट्याचे भास होते. कोलटकर गेल्यावर दिलीप चित्रे म्हणाले होते की असा कवी लाभावा , सांभाळावा अशी या समकालीन मराठी समाजाची लायकीच नव्हती. यातला बराचसा उद्वेग जरा बाजूला ठेवला तरी तळाला थोडं सत्य उरतंच.

In reply to by ऋषिकेश

आयुष्य आणि मृत्यू ही 'सेलिब्रेशन्स' आहे असे म्हणणारा एक हिरवा जीव 'दुसरे' सेलिब्रेशन करायला गेला. यात रंगाचा शब्दप्रयोगाचा संदर्भ समजत आहे तरी देखील जीवाला जोडल्यामुळे अनावधानाने तो पॉलीटीकली इन्करेक्ट वाटला. ;)