वेदातील तेहेतीस देवांवरून कल्पलेली " तेहेतीस कोटी " ही संख्या सोडून दिली तरी देव किती हा एक मजेदार प्रश्न शिल्लक रहातोच. मोजमाप करावयाच्या दृष्टीने त्यांची वर्गवारी करवयाचा प्रयत्न करू.
(१) वैदिक देवता : मरुत, इंद्र, वरुण, अग्नी,उषा, सूर्य,सोम, इत्यादी.( विष्णु ही एक तृतीय श्रेणीतील देवताही होती.) यांपैली कॊणाचीही पूजा आज केली जात नाही.
(२) पौराणिक देवता : पौराणिक काळात वैदिक देवता मागे पडून विष्णु, शंकर,देवी, गणपती, स्कंद या देवता पुढे आल्या.
(३) ग्रामदेवता व कुलदेवता : गावाचे रक्षण करणार्या देवता (बहुतांशी स्त्रीदेवता) उदा. सातेरी, भुमका, पिडारी, मरीआई, तसेच भैरोबा, रवळनाथ, वेताळ, अय्यनार इत्यादी. प्रत्येक कुलाच्या विशिष्ट उपास्य देवता, उदा. खंडोबा, ज्योतिबा, भवानी, योगेश्वरी, शांतादुर्गा, व्याघ्रेश्वर, इत्यादी. खरे म्हणजे या देवताच आदीमदेवता म्हणावयास पाहिजेत. पण उच्चवर्गीयांनी यांतील बर्याच जणांना शंकर, पार्वती, विष्णु यांचे अवतार वा सेवक असे रूप देऊन त्यांचा समावेश (२) मध्ये केला.
(४) क्षुद्र देवता : क्षुद्र व शूद्र यांचा घोळ घालू नका. क्षुद्र म्हणजे दुय्यम. हा शब्दप्रयोग पूर्वीपासून चालू आहे. यात कोणाला हिणवावयाचे असे नसून (२) मधील देवतांपासून वेगळे दाखवयाचे असते. गावाच्या सीमेवर, पडक्या भिंतीवर, एखाद्या शीळेवर शेंदूराने त्रिशूळ काढून त्या देवतेचे स्थान दाखवले असते. सामान्यत : या देवता उग्र-भयंकर असतात व त्या मांस-मद्याच्या नेवैद्याचा आग्रह धरतात.खेडोपाडी यांचा प्रभाव दांडगा असतो व संतांनी प्रयत्न करूनही त्यांचे ग्रामजीवनावरील अधिराज्य आजही लक्षणीय आहे.
आता देव किती या प्रश्नाचे उत्तर शोधावयास एक दंडक असा लावू की ज्यांची मोठ्या प्रमाणात देवळे आहेत व ज्यांची पूजा करणारे भक्त संख्येने जास्त आहेत त्यांचीच गणना करणे उचित ठरेल. तेव्हा (१) मधील देव बाद करू. (३) व (४) मधील देव मोजणे अशक्य आहे; तेही सोडून देऊ. शनी, सूर्य,नरसिंह इत्यादींची ५-१० देवळे सापडतील पण त्यांचाही विचार करण्याची गरज नाही. त्रिमूर्तीतील ब्रह्मदेव ज्येष्ट खरा पण माझ्या माहितीप्रमाणे त्याची देवळे नगण्य आहेत. उरले किती ?
विष्णु व त्याचे राम कृष्ण, विठ्ठल ( हा खरा (३) मधील देव पण त्याला बढती देऊन कृष्णाचा अवतार केला गेला, हा महाराष्ट्र व कर्नाटक या दोन प्रांतांतच लोकप्रिय आहे) इत्यादी अवतार. य़ांच्या भक्तांना म्हणावयाचे " वैष्णव ". सर्व हिंदुस्थानात याची देवळे आहेत व मोठ्या प्रमाणात भक्तही आहेत. यांतील पंथ व उपपंथ लक्षणीय आहेत.
शंकर यांनी अवतार घेण्याचे कष्ट घेतले नाहीत. ऊपासकांना " शैव " म्हणतात. शैवांत अनेक पंथ आहेत. आसेतुहिमाचल देवळे आहेत.( पसंती डोंगर-दर्यांची)र. विष्णूपेक्षा थोडा "कडक " देव. शांभवी चालते.
देवी (पार्वती व तिची रुपे) शक्ती ही एक प्राचिन व लोकमान्य देवता आहे, उपासकांना " शाक्त " म्हणतात. दानवमर्दिनी हे रूप जास्त आवडते असल्याने शंकरापेक्षाही जास्त उग्र रुप आढळून येते. तांत्रिक उपासनेत देवी व शिव यांना प्राधान्य दिले गेले आहे.
गणपती हा जरा सौम्यच देव आहे. थोडे दैत्य मारले हे खरे पण देवाने असे काही करावे अशी अपेक्षा असते म्हणून. बाकी कार्यारंभी वंदन करावयाचा मान असल्याने सर्वत्र संचार. उपासकांना "गाणपत्य " म्हणतात.
कार्तिकेय शंकर परिवारातला शेवटचा देव. दक्षिणेत जास्त उपासना केली जाते. सुब्रह्मण्य व मुरुग ही दुसरी नावे.
हनुमान रामाचा दास (दास हनुमान ) म्हणून प्रसिद्ध असला तरी यक्ष पूजेतून आलेल्या या देवाची " वीर हनुमान " ही ओळख ग्रामीण भागात आढळून येते.याची देवळे व भक्तगण मोठ्या संख्येने आढळतात.
जर वर सांगितलेली व्याख्या मानली तर विष्णु, राम कृष्ण, (विठ्ठल), शंकर, देवी, गणपती, कार्तिकेय व हनुमान एवढेच देव उरतात.एखादा राहिला असला तर तो धरूनही बोटांवर मोजता येतील एवढेच " देव " खरे.
शरद
वाचने
12725
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
शरद साहेब
सोमरसाचे काय गुपित आहेसोमरस
In reply to शरद साहेब by रणजित चितळे
थोडा खुलासा
In reply to शरद साहेब by रणजित चितळे
झकास!
In reply to थोडा खुलासा by शरद
वैदिक काळातील उपासना ही जास्त
In reply to झकास! by धमाल मुलगा
साधारणपणे ८००-९००
In reply to झकास! by धमाल मुलगा
+१
विंटरेष्टींग लेख. एक
वैदिक आणि पौराणिक काळातला एक
In reply to विंटरेष्टींग लेख. एक by शिल्पा ब
+१
विष्णु व त्याचे राम कृष्ण,
छान माहिती. धन्यवाद अमोल
वेदातील तेहेतीस देवांवरून
काही निरीक्षणे आणि एक मजेशीर प्रश्न
In reply to वेदातील तेहेतीस देवांवरून by विजुभाऊ
वाहव्वा
In reply to काही निरीक्षणे आणि एक मजेशीर प्रश्न by मूकवाचक
छान माहिती. आजचा हिंदु धर्म
+१
In reply to छान माहिती. आजचा हिंदु धर्म by JAGOMOHANPYARE
मुळात हिंदू धर्म हा जगातील
डावखुरा यांना...
In reply to मुळात हिंदू धर्म हा जगातील by डावखुरा
वाटणे हेच विज्ञान...!!
In reply to डावखुरा यांना... by अत्रुप्त आत्मा
+१
In reply to मुळात हिंदू धर्म हा जगातील by डावखुरा
गोगोल साहेब जरा विचार करा
In reply to +१ by गोगोल
तुम्ही
In reply to गोगोल साहेब जरा विचार करा by अत्रुप्त आत्मा
दावा-हिंदू धर्म हा जगातील एकमेव विज्ञान-निष्ठ धर्म आहे.
In reply to मुळात हिंदू धर्म हा जगातील by डावखुरा
दावा-हिंदू धर्म हा जगातील एकमेव विज्ञान-निष्ठ धर्म आहे.
In reply to मुळात हिंदू धर्म हा जगातील by डावखुरा
३३ कोटी देव नसावेतच, तेव्हां
शिरगणती कशासाठी?
असतो एखाद्याला वेळ!!! रीटायर
In reply to शिरगणती कशासाठी? by पिवळा डांबिस
रिटायरपणा हाच आयुष्याचा
In reply to असतो एखाद्याला वेळ!!! रीटायर by शिल्पा ब
इश्श!! म्हणुन काय चारचौघात
In reply to रिटायरपणा हाच आयुष्याचा by पिवळा डांबिस
लेख आवडला पण केवळ जास्त लोक
मला स्पिलबर्गचा ए आय सिनेमा
लेख ठिक ... विचारांप्रमाणे
हेच म्हणतो.. नंतर मग
In reply to लेख ठिक ... विचारांप्रमाणे by गणेशा
फक्त भारत?
In reply to हेच म्हणतो.. नंतर मग by गवि
वरती मृत्यंजय म्हणतात
In reply to लेख ठिक ... विचारांप्रमाणे by गणेशा
अशी बरीच साम्ये दिसतील
In reply to वरती मृत्यंजय म्हणतात by मृत्युन्जय
:)
In reply to वरती मृत्यंजय म्हणतात by मृत्युन्जय
<<<मग मला प्रश्न पडतो देवांना
In reply to लेख ठिक ... विचारांप्रमाणे by गणेशा
पुराणातील एलिअन..!!
तुम्हाला ब्राह्मण, पुराण, वेद
In reply to पुराणातील एलिअन..!! by अजातशत्रु
चीड??