✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिपा संपादकीय...! जाहीर आवाहन..

व
विसोबा खेचर यांनी
Fri, 06/27/2008 - 00:56  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
20351 वाचन

💬 प्रतिसाद (46)

प्रतिक्रिया

ब
बेसनलाडू Fri, 06/27/2008 - 01:31 नवीन

तयारी

बोला, करणार का मला या कामात मदत? स्वत:हून आळीपाळीने घेणार का अग्रलेख लिहिणार्‍या पाहुण्या संपादकाची जबाबदारी? वा तात्या,उपक्रम स्तुत्य आहे.या उपक्रमाला माझा सक्रीय पाठिंबा राहील.संपादकीय लिहिण्यापासून ते (झाल्यास) त्यावर साधकबाधक चर्चा करण्यापर्यंतची जबाबदारी पाहुणा लेखक म्हणून/मिपाकर म्हणून/कोणाच्या विशेष काही अपेक्षा असल्यानसल्या तरी/'पुढे पुढे' करण्यातला प्रकार वाटला तरी पेलण्याची तयारी आहे. धन्यवाद. (जबाबदार)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
म
मयुरयेलपले Fri, 06/27/2008 - 01:41 नवीन

आहोत तयार ....

उपक्रम स्तुत्य आहे... आमचाहि आपल्याला पाठिंबा आहे. आपला मयुर
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Fri, 06/27/2008 - 02:50 नवीन

वाह!

मस्त कल्पना आहे. सध्या आणि पुढचा एक आठवडा मी गैरहजर असेन. परतून आल्यावर सक्रिय सहभाग आवडेल. तोपर्यंत बाकीचे आहेतच, शुभारंभ कराच! दिवाळी अंक बिंक इतक्यातच गरजेचा नाही. तसेही, दुसरे करतात म्हणून आपण करावे असेही नाही - हे माझे वैयक्तिक मत झाले पण ही कल्पना भारीच आहे आणि नावीन्यपूर्णही. माझ्याकडून अनेक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 06/27/2008 - 03:27 नवीन

चांगली

चांगली कल्पना आहे. मला लिहिता येत नाही, पण 'वाचनमात्र' नक्की आहे तुमच्याबरोबर... बिपिन.
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 06/27/2008 - 03:40 नवीन

चांगली कल्पना

चांगली कल्पना (आयडीआ) आहे! नक्की मदत करायला आवडेल...पण नुसतीच लिहीण्यापेक्षा इतरांचे वाचणे अधीक आवडेल.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 06/27/2008 - 03:46 नवीन

प्रतिसाद

चांगले लेख वाचायला नेहमीच उत्सुक आहे ! मला जमेल तसे लिहीन. थोडा वेळ हवा... प्रकल्पाबद्दल अनेक शुभेच्छा ! नंदन , अजानुकर्ण या बहुश्रुत , व्यासंगी सभासदांचा उल्लेखसुद्धा यादीत यायला हवा ! सहज हे आणखी एक नाव . सहज कमी लिहीतात; परंतु अनेक विषयांवरील त्यांची मते , त्याना असलेली माहिती या बाबी महत्त्वाच्या आहेत. ओंकार आणि सर्कीट हे लोक अलिकडे खूप कमी लिहीतात असे दिसते. परंतु त्यांच्या ज्ञानाचा आवाका लक्षात घेता त्यानी या उपक्रमात सामील होणे , शुद्ध मराठीत सांगायचे तर "मस्ट" आहे ! भडकमकर आणि भुस्कुटे यानाही मी व्यक्तिशः विनंती करणार आहे ! :-) या उपक्रमाच्या निमित्ताने पहिल्या आणि मी दिलेल्या यादीतल्या लोकांनी (आणि इतरांनीसुद्धा !) नव्याने काहीतरी उत्तम लिहावे अशी विनंती.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Fri, 06/27/2008 - 03:46 नवीन

कल्पना खूप

कल्पना खूप आवडली! पाहूणा संपादक ही आयडीआ भारी! संपादकीय वाचायला मजा येईल!! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चित्रा Fri, 06/27/2008 - 03:46 नवीन

कल्पना छान

कल्पना छान. लिहायला नक्की आवडेल!
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 06/27/2008 - 04:26 नवीन

जरूर!

मी रांगेत जरा पाठीमागचा नंबर लावतो. मातब्बर लोकांनी वहिवाट घालावी, आम्ही वारीत चालायला तयार. उत्तम कल्पना. (तुमच्या यादीत आणखी कोणकोण जोडायचे हा विचार चालू आहे.)
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Sat, 06/28/2008 - 03:22 नवीन

असेच

म्हणतो... मातब्बर लोकांनी वहिवाट घालावी, आम्ही वारीत चालायला तयार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
स
सुवर्णमयी Fri, 06/27/2008 - 05:23 नवीन

फारच मस्त कल्पना

ही कल्पना फारच आवडली. माझ्या शुभेच्छा. दर वेळी काय नवीन वाचायला मिळेल याची उत्सुकता राहील यात शंका नाही. सोनाली
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 06/27/2008 - 06:19 नवीन

उत्तम कल्पना

तात्या, कल्पना खरंच खूप चांगली आहे. जी काही मदत लागेल, ती करायला मी तयार आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 06/27/2008 - 06:45 नवीन

बेसनलाडू,

बेसनलाडू, आजानुकर्ण, नंदन, सहजराव, मास्तर, भुस्कुटे यांची नावे अनवधानाने घ्यायची राहिली! पाहुणा संपादक म्हणून ही मंडळीदेखील उत्तम अग्रलेख लिहू शकतील असा विश्वास आहे! :) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 06/27/2008 - 06:46 नवीन

मस्त

खुपच चांगली कल्पना आहे [व खरे सांगायचे तर अबाउट टाईम.] नीलकांतचे लेख वाचले होते तेव्हाच अशी अपेक्षा केली होति की त्याने दर महिन्यात एकदा तरी असे लेख लिहावेत. बाकी वर नाव आलेल्या सर्व मंडळींचे चिंतन-मनन अत्यंत वाचनीय असणार यात शंकाच नाही. मिपाची ही वाटचाल बघताना खरच खूप आनंद होत आहे.
  • Log in or register to post comments
व
वैशाली हसमनीस Fri, 06/27/2008 - 07:16 नवीन

प्रतिक्रिया

कल्पना आवडली.आवशक्यता भास ल्यास मदत करण्याची तयारी आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 06/27/2008 - 09:41 नवीन

वा तात्या वा !!!

काय आयडिया आणली राव !!! आम्ही तर नक्की लिहिणार ( खरं तर वाचायलाच अधिक आवडेल ) इथे अनेक मित्र मंडळी चांगले लिहितात. विचारांची आदान प्रदान करतांना पाहिलंय, त्यांचे लेखन हटके आणि विचारांना गती देतात. अनेक नावे डोळ्यासमोर आहेत त्यांचे संपादकीय वाचायला आवडेल. मराठी संकेतस्थळावरील मिसळपाव वाचकांचे संपादकीय हे एक दमदार पाऊल आहे, मिपाच्या भरभराटीकरीता माझ्या शुभेच्छा !!! ( सध्या जरा प्रवेशाची धांदल आहे, नसता पहिला संपादकीय लेखाचा मान आम्हीच पटकावला असता. जरा निवांत झालो की आम्हाला आवडणा-या विषयावर नक्की लिहू . तो पर्यंत पहिल्या वाहिल्या लेखन करणा-या पाहुण्या संपादकास आमच्या शुभेच्छा !!! ) -प्रा.डॊ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ध
ध्रुव Fri, 06/27/2008 - 09:45 नवीन

चांगली कल्पना

आहे. यथयोग्य जमेल तशी मदत कराअयला आवडेल.. -- ध्रुव
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 06/27/2008 - 09:49 नवीन

तात्या,

तात्या, उत्तम कल्पना आणि यूनिक ... ... एकदम आवडली... आणि इथे माझ्यापेक्षा खूप श्रेष्ठ आणि जाणकार मंडळी आहेत, याची जाणीव आहेच...त्यांचे वाचायला आवडेल ( पण सगळ्यांचे झाले की कधीतरी लिहायलाही आवडेल) :) _______________________________ अग्रलेख भारतातील अथवा भारताबाहेरील सामजिक अथव राजकीय विषयावर, ताज्या घडामोडींवर भाष्य करणारा असेल. प्रसंगानुरूप किंवा क्वचित प्रसंगी अर्थ, क्रीडा किंवा अन्य एखाद्या विशेष गाजत असलेल्या विषयावरही असेल. एक शंका... या सदराचे प्रयोजन... मि.पा.चा त्या त्या आठवड्याचा अतिथी संपादक होणे हा सन्मान आहेच, :) परंतु आत्ता लिहिता येत नाही असं कोणतं वेगळं लेखन संपादक तिथे करणार?? या प्रकारचे लेख ज्याला पाहिजे तो आत्ताही लिहू शकतोच की ... की त्याचा पेज ले आउट नियतकालिकासारखा असणार आहे? म्हणजे संपादकाला सुद्धा जरा लै भारी फील येईल. _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Fri, 06/27/2008 - 09:58 नवीन

असेच म्हणते -

आणि इथे माझ्यापेक्षा खूप श्रेष्ठ आणि जाणकार मंडळी आहेत, याची जाणीव आहेच...त्यांचे वाचायला आवडेल ( पण सगळ्यांचे झाले की कधीतरी लिहायलाही आवडेल) :) असेच म्हणते!
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 06/27/2008 - 10:13 नवीन

+१

वाढत्या वयाबरोबर आपलं मिपा अधिक समृध्द होतं आहे ह्याची ही केवळ नांदी आहे. उपनिर्देशित लेखकांच्या मांदियाळीने नि:संशय हा उपक्रम दर्जेदार होईल. ॐकार आणि सर्किट ह्यांचेही लेख वाचायला आवडतील. भडकमकर मास्तरांनीदेखील पाहुण्या संपादकांमध्ये सहभागी व्हावं अशी माझी त्यांना विनंती आहे. आम्ही ह्या पाक्षिक/साप्ताहिकाची नक्की वाट पाहू, पाहत राहू.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 06/27/2008 - 13:10 नवीन

आपलं मिपा अधिक समृध्द

हेच म्हणतो आम्ही! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
आ
आनंदयात्री Fri, 06/27/2008 - 22:11 नवीन

असेच

म्हणतो, सुंदर उपक्रम. टुगेदर वी क्यान मेक अ डिफ्रन्स ! (हौशी संपादक) अग्रलेखयात्री ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
क
काळा_पहाड Fri, 06/27/2008 - 11:40 नवीन

संपादकीय

तात्या, उत्तम कल्पना आणि यूनिक ... ... एकदम आवडली... आणि इथे माझ्यापेक्षा खूप श्रेष्ठ आणि जाणकार मंडळी आहेत, याची जाणीव आहेच...त्यांचे वाचायला आवडेल ( पण सगळ्यांचे झाले की कधीतरी लिहायलाही आवडेल) असेच म्हणतो. काळा पहाड
  • Log in or register to post comments
ध
धमाल नावाचा बैल Fri, 06/27/2008 - 11:46 नवीन

तात्या लै

तात्या लै भारी कल्पना! आम्ही साक्शात बैल असल्यान फक्त वाचकाच्याच भुमिकेतच राहू. वाट पहात आहे..... आपला, बैलोबा
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Fri, 06/27/2008 - 12:13 नवीन

वा!!

तात्याशेठ, एकदम स्तुत्य उपक्रम..आता आम्हाला गद्यातल लिखाण जमत नाही म्हणून सक्रिय नाही पण नुसताच पाठींबा देतो... तुम्ही लोक लिव्हा आम्ही वाचतो.. सर्व संपादकांना शुभेच्छा!! (शुभेच्छुक मिपाकर) केशवसुमार
  • Log in or register to post comments
अ
अन्जलि Fri, 06/27/2008 - 12:47 नवीन

लिखाण

वाचाय्ला नक्किच आवडेल. लिहिता येत नाहि नाहितर बरेच काहि लिहिता आले अस्ते. जसे कालच्या  अक्कलदाधे विशयि तुम्हा सर्वाच्या हे लक्शात आले आहे का कि दोन सम व्यव्सायिक एक्मेकाना मोथेपना देवुन माहिति देत होते. हे मला वाट्ते फक्त मिपाव र च होत असेल म्हनुन रोज मिपा वर चक्कर मार् ल्या शिवाय मजा येत नाहि.
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Fri, 06/27/2008 - 15:02 नवीन

पूर्ण सहमत

तात्यांना संपादकीय हा उपक्रम चालू केल्यासाठी अभिनंदन. माझाही खारीचा वाटा उचलायला आवडेल. पण त्या आधी खूप प्रतिभावान मिपाकर तयार आहेत, तेव्हा सध्या वाचनाचा आनंद घेणार.
  • Log in or register to post comments
स
साती Fri, 06/27/2008 - 16:59 नवीन

छान कल्पना.

तात्या , कल्पना आवडली. साती
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 06/27/2008 - 18:15 नवीन

अगदी ग्रेट कल्पना.

तात्या मस्त कल्पना आहे अजुन छान वाचायला मेजवाणी मिळनार.
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 06/27/2008 - 18:41 नवीन

अरे वा

खूप सुंदर उपक्रम्....अभ्यासपूर्ण लेख वाचायला खरच खूप मजा येते....माझ्या खूप खूप शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 06/27/2008 - 19:26 नवीन

तात्या, काल संध्याकाळीच हा नवीन प्रस्ताव बघितला

पण उत्तर देऊ शकलो नव्हतो. छान प्रस्ताव आहे. मिपा प्रगल्भ होत असल्याची ही खूण आहे. आमचे नाव प्रस्तावित पाहुण्या संपादकांमधे टाकून आपण जबाबदारी वाढविली आहे (आमची आणि आपलीसुद्धा! ;) ) काही सूचना -
  1. भडकमकर मास्तर म्हणतात त्याप्रमाणे पेज लेआउट काही वेगळा करण्याचा विचार करता येईल का?
  2. 'संपादकीय' असा एक वेगळा विषय विभाग पानाच्या मथळ्यातच टाकता येईल का? म्हणजे ताज्या आणि मागील संपादकीयासाठी शोधाशोध टळेल.
आता चांगल्या विषयाचा शोध घेणे आणि लिहिणे क्रमप्राप्तच. (स्वगत - पाहुण्या संपादकाने त्या पदावर असताना विडंबन केले तर चालते का? :? ) चतुरंग
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sun, 06/29/2008 - 04:42 नवीन

सहमत!!

छान प्रस्ताव आहे. मिपा प्रगल्भ होत असल्याची ही खूण आहे. आमी शेहमत हावोत!! आमचे नाव प्रस्तावित पाहुण्या संपादकांमधे टाकून आपण जबाबदारी वाढविली आहे (आमची आणि आपलीसुद्धा! ) नायतर काय! आरं बाबा चतुरंगा, आता तुझी बुदबळं आणि आमचे टुकार इनोद हिथं न्हाई चालायचे रे बाबा! हिथं म्हंजी कसं ताज्या फडफडीत इशयावर विदवत्त्तापरचूर लिवायला लागंल आशी दटावनी मिळालीय!! तुजं ठीक हाय, काढशिला पोतडीतून काहीतरी पटदिशी!! पन आमी आडान्यांनी काय करांवं रं बाबा!!! बधू, आई आंबाबाईच्या मनात काय आसंल तसं हुयील!!! कडाडले स्वामी विसोबा खेचर, आलिया भोगासी असावे सादर||:)) तरी येक बरं हाय, मालकांच्या यादीत बग आमचा लंबर शेवटचा हाय.:) तवा तुमी मंडळी कसंकसं काय लिवता ते बघून आपन आपलं....खी, खी, खी!!!!!:)) (स्वगत - पाहुण्या संपादकाने त्या पदावर असताना विडंबन केले तर चालते का? ) कारं बाबा, इक्तीपन कळ काडवना होय रं तुला!! जरा जपून, मालक तडाकलं तर गाडीवर टिंब देउन फटका हाणतील हां!!:)) तुजा, पिवळा डांबिस (वि.सू. = आम्ही तुर्तास आमच्या डांबिस व खट्याळ मोड मध्ये पूर्णपणे गेलेलो आहोत. त्यातून बाहेर कधी पडू ते सांगता येत नाही. तरी पुढील सूचना मिळेपर्यंत सर्वांनी आमचे सर्व लिखाण हलकेच घ्यावे ही नम्र विनंती!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
स
सुचेल तसं Fri, 06/27/2008 - 19:34 नवीन

शुभेच्छा

तात्या, आपल्या या नविन उपक्रमाला माझ्याकडुन शुभेच्छा!!! -ह्रषिकेश http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
प
प्रगती Fri, 06/27/2008 - 19:43 नवीन

फारच छान कल्पना....

आम्हाला पण नवीन नवीन माहीती कळेल धन्यवाद! आमच्याकडून या उपक्रमाला शुभेच्छा ! "मिसळ पाव" हे संकेतस्थळ उत्तरोत्तर अशीच प्रगती करीत राहो !
  • Log in or register to post comments
अ
अविनाश ओगले Fri, 06/27/2008 - 20:05 नवीन

उत्तम कल्पना...

मनापासून शुभेच्छा...
  • Log in or register to post comments
स
संजीव नाईक Sat, 06/28/2008 - 08:38 नवीन

सुंदर उपक्रम .......

श्रुतीश्री तात्या यास.... आपण सुर तज्ञ ! पण सुरा बद्दल का लिहत नाही? सुरुवात श्रुती पासुन झाली पाहिजे. अशी मना पासुन इच्छा. ( मिपा संपादकीय...व....मिपाप्रेमी ) तील श्रुती संजीव
  • Log in or register to post comments
भ
भोचक Sat, 06/28/2008 - 14:25 नवीन

कल्पना आवडली

कल्पना आवडली. शुभेच्छा
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sat, 06/28/2008 - 14:32 नवीन

छान प्रस्ताव

छान प्रस्ताव. आमच्या शुभेच्छा. :)
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Sat, 06/28/2008 - 16:53 नवीन

अरे वा!

खुपच छान कल्पना आहे ही. आम्ही काय वाचक असल्याने मिळेल ती मेजवानी झोडायला तयारच :) (रथी महारथी लोकांचे संपादकीय वाचण्यास उत्सुक) झकास ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
फ
फटू Sun, 06/29/2008 - 02:26 नवीन

मस्त कल्पना आहे तात्या...

आजवर मस्त टीपी करुन हसत खेळत ठेवणारे मिपाकर चक्क संपादकीय लिहिणार... एकदम थरारक अनुभव असेल तो... उपक्रम सुरु होण्याची वाट पाहतोय... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Sun, 06/29/2008 - 08:13 नवीन

उत्तम

उत्तम कल्पना. हार्दिक शुभेच्छा. धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 06/29/2008 - 08:37 नवीन

धन्यवाद, बोला कोण लिहिणार पहिला अग्रलेख..?

आमची कल्पना उचलून धरल्याबद्दल सर्व मंडळींना धन्यवाद...आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच मिपा इथपर्यंत आले आणि आपल्याच सहकार्याने ते पुढचीही वाटचाल करेल असा विश्वास आहे... :) आज रविवार आहे. आजपासून बरोब्बर आठवड्यापर्यंतचा, म्हणजे पुढल्या रविवारपर्यंतचा कालावधी गृहीत धरून, त्या कालावधीतील भारतातील, भारताबाहेरील, सामाजिक, राजकीय घडामोडींवर मननचिंतनात्मक भाष्य करणारा मिपाचा पहिलावहिला संपादकीय अग्रलेख कोण लिहीणार आहे? बोला...! पहिलाच अग्रलेख असल्यामुळे सामाजिक,राजकीय, सांस्कृतीक, क्रीडा आदी घडामोडींवर भाष्य न करता शुभारंभाचा अग्रलेख लिहिला तरी चालेल. अर्थात, हा केवळ पहिलाच अग्रलेख असणार आहे म्हणून! पण काय लिहायचं, कोणत्या विषयावर लिहायचं, कोणत्या विषयाचा परामर्श घ्यायचा, इत्यादी सर्व आम्ही पाहुण्या संपादकावरच सोपवतो.. बोला, कोण घेतंय पुढाकार? कुणीतरी पुढाकार घ्या आणि शुभारंभाचा अग्रलेख लिहा अशी विनंती! काही मंडळींनी (उदा मास्तरांनी) वेगळ्या 'संपादकीय'चे प्रयोजन काय असे विचारले आहे. विशेष प्रयोजन एवढेच की एखाद्याचा नुसता एखादा लेख छापून येणे आणि पाहुणा संपादक म्हणून अग्रलेख छापून येणे यात जरा फरक आहे. अग्रलेखाला एक वेगळं महत्व आहे, एक वेगळं परिमाण आहे. नुसत्या एखाद्या लेखापेक्षा 'अग्रलेख' या सदराखाली तो लेख आल्यास त्याला नक्कीच एक वेगळं वजन असेल आणि तो अधिक उत्सुकतेने, अधिक चोखंदळपणे वाचला जाईल असे वाटते. काही काळापूर्वी सुविचारांची कल्पना राबवून पाहिली पण ती विशेष चालली नाही. लोक सुविचार पाठवायला कंटाळा करू लागले किंवा अगदीच घिसेपिटे सुविचार पाठवू लागले. पण त्यामुळेच पुढे चांगल्या लेखकांची, कवींची, मिपातील संग्रहातील काही वाक्ये मुखपृष्ठावर टाकायची कल्पना मला सुचली आणि ती आज अनेकांना आवडते आहे! आजची खादाडी या सदरात मिपाकरांनी पाठवलेले मेनू, किंवा आंतरजालावर मिळणार्‍या मेनूंची प्रकाशचित्रे टाकण्याची कल्पनादेखील बर्‍याच जणांना आवडली.आवडते आहे. तसेच हीदेखील एक पाहुण्या संपादकाच्या अग्रलेखाची कल्पना आहे आणि ती राबवून पाहीन म्हणतो! चालली तर ठीक, नायतर बंद करून टाकू! काय सांगावं, त्यातूनच दुसरी एखादी चांगली कल्पना जन्म घेईल! मास्तर, शेवटी हे सगळे प्रयोग आहेत. ते ट्राय ऍन्ड एरर बेसिसवर सतत करून पाहिले पाहिजेत. अपयशाला तिच्यायला आपण कधीच घाबरलो नाय! :) काय? पटतंय का माझं म्हणणं? :) कुणीतरी अग्रलेखाच्या पानाला काही विशेष ले-आऊट असणार का असे विचारले आहे. निश्चितच चांगली कल्पना आहे. पण त्याचे उत्तर मी आत्ताच देऊ शकत नाही. नीलकांतशी बोललं पाहिजे! असो, पुन्हा तोच प्रश्न! बोला, कोण घेतंय पुढाकार? :) तात्या. -- Not failure, but the low aim is a crime!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 06/29/2008 - 11:40 नवीन

प्रयत्न चालू आहेत !!!

अग्रलेख लिहायचं काम अवघडच आहे, पण काहीतरी लिहिण्याचे प्रयत्न चालु आहेत. सायंकाळपर्यंत आपल्याला टपालाने पाठवतो. च्यायला एक वेळेस प्रतिसादात बाता मारणं सोप्पं काम आहे, पण कोणताच पुर्वाअनुभव नसतांना डायरेक्ट लिहायचे म्हणजे हातापायाला गोळेच येत आहेत. आम्हाला वाटले आणि पटले तर पाठवू .नाय तर 'न' पाठवण्याचा हक्क अबाधित आहे. :) पण तात्या, खरं सांगू....! काम जरा अवघड वाटत असले तरीही, प्रयत्न केले तर आत्मविश्वास वाढेल आणि दर्जेदार लेखन होऊ शकेल असेही वाटते. :) तसेच हीदेखील एक पाहुण्या संपादकाच्या अग्रलेखाची कल्पना आहे आणि ती राबवून पाहीन म्हणतो! चालली तर ठीक, नायतर बंद करून टाकू! काय सांगावं, त्यातूनच दुसरी एखादी चांगली कल्पना जन्म घेईल! हे बाकी खरं आहे. म्हणुनच प्रयत्न करुन पाहतोय !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ह
हर्षद बर्वे Sun, 06/29/2008 - 16:54 नवीन

वा वा छान कल्पना.........

तात्या आतिशय छान कल्पना आहे.....माझा तुम्हाला पाठींबा आहे. वाचन तर करीनच...अग्रलेख वगैरे लिहिन की नाही ते सांगू नाही शकत पण त्यावरील मते मांडण्याचा प्रयत्न अवश्य करेन.... हर्षद बर्वे(एच.बी.)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 06/29/2008 - 18:44 नवीन

वा!!

वा!! अतिशय स्तुत्य आणि नाविन्यपूर्ण कल्पना.. या निमित्ताने होणारे लेखन वाचायला अतिशय उत्सुक आहे. तात्या, अश्या नाविन्यपूर्ण कल्पनेबद्दल अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा! -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
क
केशवराव Wed, 07/02/2008 - 06:08 नवीन

स्तुत्य उपक्रम.

तात्या, उपक्रम स्तुत्य आहेच. अभिनंदन!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा