Skip to main content

तसा प्रत्येक दिवशी मून येतो

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 02/06/2011 01:34 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा चित्तरंजन यांची अप्रतिम गझल तसा प्रत्येक वर्षी जून येतो तसा प्रत्येक दिवशी मून येतो तझ्या वाचूनही हनिमून येतो फिकटसे चेहरे स्मरतात काही पुन्हा नोस्ताल्जिया गडदून येतो कुणी नाही, कुणी चिटपाखरूही अशा वाटाच मी पाहून येतो कुणी आहे तिथे, बेचैन आहे किती आवाज हा आतून येतो तिच्या मौनातली उद्गारचिन्हे असा का हा बरे थांबून येतो? कसे सांगू तिला मी काय होते इथे कोणी कधी सांगून येतो? हवेला हुंगतो मी आणि म्हणतो अरे हा वास गुत्यातून येतो मला ढोसायचे नसते तरी पण तिथे, जातो पुन्हा ढोसून येतो!! स्वतःचा भार सोसेना स्वतःला किती हा देह ओथंबून येतो अता गिळतो तुपावाचून सारे चहा ही कॅलरीवाचून येतो मला बोलावते मैफल भज्यांची चला मीही भज्या खाऊन येतो कधीपासून आहे बंद पाणी दगड तर दगड पण उरकून येतो
लेखनविषय:

वाचने 1561
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

कधीपासून आहे बंद पाणी दगड तर दगड पण उरकून येतो आरारारा. सुंदर कवितेचा अनपेक्षित शेवट. धक्कातंत्र १०० टक्के यशस्वी.