२८ मे : हिंदूहृदयसम्राट सावरकर यांना अभिवादन
.
.
२८ मे हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्मदिवस. २८ मे १८८३ या दिवशी त्यांचा भगूर, जि. नाशिक येथे जन्म झाला.
सावरकरांनी त्यांच्याजवळ असलेल्या वाणी, लेखणी अशा सर्व गोष्टी देशासाठी खर्ची घातल्या.
त्यांच्या वाणीचा धाक असा की इंग्रज सरकारने त्यांच्या राजकीय भाषणांवर बंदी घातली.
त्यांच्या लेखणीचाही धाक असा की इंग्रज सरकारने त्यांच्या 'जोसेफ मॅझिनी' या पुस्तकाच्या भारतातील प्रकाशनावर बंदी घातली.
तरीही सावरकरभक्तांनी ते पुस्तक जर्मनीमधून प्रसिद्ध केले, त्यातील विचार भारतात पोचल्याशिवाय राहीले नाहीत.
अनेक क्रांतिकारकांनी त्या पुस्तकाची प्रस्तावना मुखोद्गत केली, त्यातून प्रेरणा घेतली.
मदनलाल धिंग्रा, नेताजी सुभाषचंद्र बोस हे देशभक्तही सावरकरांना मानत असत, सावरकरांचा सल्ला त्यांना मोलाचा वाटे
परकी सत्तेविरुद्ध लढताना शस्त्रांचा आधार घेणेही सावरकरांनी वर्ज्य मानले नाही.
इंग्रज सरकारविरुद्ध लढण्यासाठी इतर देशातील शक्तींच्या मदतीने इंग्रजी सता उलथवून टाकण्याची महत्त्वाकांक्षी योजना त्यांनी आखली.
परंतु नेपोलियनच्या फ्रान्समधे त्यांच्या सहकार्यांना थोडा उशीर झाला आणि योजना अयशस्वी झाली. पण इंग्रज सरकार इतके हादरले
की त्यांनी सावरकरांना अंदमानच्या कोठडीत टाकले.
योजना अयशस्वी झाली तर इतक हादरा, यशस्वी झाली असती तर इंग्रज सरकारचे काय झाले असते.
एक आठवण:
चिंतामणराव कोल्हटकर हे मराठीतील एक नाट्यकलावंत आणि नाटक कंपनीचे मालक. सावरकर त्यांच्यासाठी 'संन्यस्त खड्ग' हे नाटक लिहीत होते.
त्यावेळी सावरकर आणि चिंतामणराव यांच्या अनेक भेटी होत असत, चिंतामणराव आपल्या मोटारीने सावरकरांकडे येत असत.
एकदा सावरकरांनी चिंतामणरावांना विनंती केली की "तुमच्या गाडीतून मला
समुद्राच्या कडेने चक्कर मारून आणाल का" ? ही विनंती चिंतामणरावांनी आनंदाने मान्य केली.
चिंतामणराव म्हणतात ज्यानी खरे म्हणजे आज्ञा करायची तो माणूस आम्हाला विनंती करीत होता. जर या माणसाने वकीलीची प्रॅक्टिस केली असती तर
आपल्या दारासमोर मोटारींच्या रांगा लावल्या असत्या.
हिंदूहृदयसम्राट
सावरकारांना हिंदूहृदयसम्राट असे एक बिरुद लोकांनी बहाल केले होते,
आज हिंदूहृदयसम्राट ही पदवी स्वत:ला चिकटवून घेण्याचा प्रकार काही लोक करताना दिसत आहेत
त्यामुळे काही फरकाचे मुद्दे ध्यानात घ्यायला हवेत
सावरकरांनी घरादाराची, संसाराची पर्वा केली नाही पण देशाचा संसार मात्र फुलवला.
सावरकरांनी आपली शक्ती, बुद्धि, संपदा देशासाठी खर्च केली, कुटुम्बाच्या कोटकल्याणासाठी नाही.
आपली बुद्धिमत्ता त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी वापरली, कुटुंबीयांच्या अपराधांवर पांघरूण घालण्यासाठी नव्हे
यामुळे
हिंदूहृदयसम्राट म्हटले की आम्हाला तात्याराव सावरकरच आठवतात दुसरे तिसरे कुणी नाही.
सावरकरांच्या जन्मदिनी आमचा सावरकरांना
मानाचा मुजरा.
प्रतिक्रिया
स्वा. सावरकरांना मानाचा मुजरा.
सर्व
स्वातंत्र्यवीरांना सादर प्रणाम
देशभक्त आणि आधुनिकतावादी
स्वातंत्र्यवीरांना साष्टांग दंडवत
स्वातंत्र्यवीरांना साष्टांग दंडवत
जन्मदिनानिमित्त अभिवादन.
कोटी कोटी प्रणाम...!!!
नम्र प्रणाम
आदर पुर्वक प्रणाम.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना
आद्य स्वातंत्र्यवीराला मानाचा
नमस्कार
सादर वंदन
विज्ञाननिष्ठ निबंध