एका गावात एक बुवा राहत होते. लोक त्यांना बाबा म्हणत. बाबांवर गावाचं प्रेम होतं. वय तरूणच होतं. पण कुठल्याही गोष्टीचं तार्किक विश्लेषण, न्यायबुद्धी यामुळं गावातच काय पंचक्रोशीत त्यांचं नाव झालेलं होतं. त्यांच्या न्यायप्रियतेमुळे कोर्टाची पायरी चढणंच बंद झालं होतं.
गावाला बुवांचा अभिमान होता. त्यांना रहायला घर बांधून दिलं होतं. शेतजमीन दिली होती. लोक स्वतःहून ती जमीन कसत आणि उत्पन्न बुवांच्या चरणी आणून ठेवत. बुवा नको नको म्हणत असताना त्यांचं बँकेत खातं उघडलं होतं. त्यात पैसे जमा होत होते. अन्नधान्य, दूधदुभतं ..कशाचीच कमी नव्हती. बुवांचं म्हणणं काय करायचंय मला सडाफटिंगला हे ?
गावाचं म्हणणं सडाफटिंग राहू नका. एक दिवस बुवांमुळे शेजारच्या गावातल्या एका कुटुंबाला न्याय मिळाला. त्यांच्यावरचं सावकाराचं अरिष्ट नाहीसं झालं. लग्नासाठी काढलेलं कर्ज आणि मोडलेलं लग्न यात त्यांनी सावकार आणि सासरकडची मंडळी यांना योग्य तो दंड दिल्याने पंचक्रोशीत त्या न्यायाची चर्चा झाली. न्याय तर झाला पण वधूपित्याचं म्हणणं असं पडलं कि आता मुलीशी कोण लग्न करणार ?
मुलगी सुशील, सुंदर होती. बुद्धिमान होती. इतक्या चांगल्या मुलीचं वाटोळं होत होतं. सासरकडच्यांची शिक्षा अंमलात आणल्यास लग्न होतच नव्हतं. आणि लग्न केल्यास चुकीचा संदेशा जाउन न्याय होत नव्हता. गावाने हा प्रतिष्ठेचा प्रश्न केला आणि काहीही केल्या बुवांच्या न्यायाची हेळसांड होऊ नये असा चंग बांधला.
गावाने तोडगा काढला.. मुलगी चांगली आहे. मुलगा तिच्या लायकीचा नव्हताच. बुवा देखील एकटेच आहेत. अशी मुलगी चालून आलीये. बुवांनाच बोहल्यावर चढवलं तर क्या बात है !!
झालं सगळ्यांनीच हा विचार उचलून धरला. बाहेरच्या पाहुण्यांनाही हे आवडलं. बुवांना गळ घातली गेली. बुवांचा नकार आला. पाटील, सरपंच.. सर्वांनी गळ घातली पण बुवा नाहीच म्हणाले. मुलीचा चेहरा कसानुसा झालेला..
अचानक वधुपित्याने येऊन बुवांचे पाय धरले. न्याय तर झाला पण माझी पोरगी देशोधडीला लागली. तिचा स्विकार करावा अशी विनवणी केली. मग बुवांवर मोठा दबाव आला. एक वेळ अशी आली कि बुवांचा नकार क्षीण पडला आणि तोच होकार समजून सर्वांनी जल्लोष केला.
सर्वांनाच आनंद झालेला. पण बुवा खूष दिसत नव्हते.
लग्न झालं
बुवा नाराज
बायको धास्तावलेली..
एक दिवस झाला.
बुवा चिंताग्रस्त होते.
पाच दिवस झाले.
बुवांनी बायकोकडे पाहीलंदेखील नाही.
महिना होऊन गेला
बायको रडत होती. काय चुकलं ?
दाद तरी कुणाकडे मागावी ?
धर्माधिकारी तर स्वतःच बुवा !!
वर्षभर वाट पाहील्यावर बायकोने धीर करून विषय काढला...
बुवांच्या चेह-यावर तीव्र नाराजी..
विषाद
आणि चक्क अपराधीपणाची भावना
कसे बसे शब्द उच्चारत त्यांनी जे काही सांगितलं ते ऐकून बायकोला धरणीकंप झाल्यासारखं झालं. बुवा नपुंसक होते. ते कधीच तिला वैवाहीक सुख देऊ शकणार नव्हते.
त्यांच्या स्वरात अन्याय झाल्याची भावना होती.
फसवणूक झाल्याची बोच होती.
अपराधी ते स्वतःच होते
आणि फिर्यादी कुणीच नव्हतं..
त्यांनी स्वतःच न्याय करायचं ठरवलं.
त्यांनी तिला सांगितलं.. जेव्हा तुला आई व्हावंस वाटेल तेव्हा मला सांगून तू कुणाशीही संबंध कर. त्या मुलाला मी माझं नाव देईन.
तिला एका वर्षानंतर मुलगा झाला.
घरात लहान मूल आल्याने वातावरण बदललं.
गावालाच काय सर्वांनाच आनंद झाला.
बुवांच्या मुलाचं खूप कौतुक झालं
सत्य काय ते बुवांना माहीत होतं.
वर्ष उलटून गेल्यावर तिने आणखी एका मुलाची परवानगी मागितली.
एक देखणं कन्यारत्न जन्माला आलं.
नाही म्हटलं तरी बुवांना मुलांची आवड होतीच. वर्षं उलटून जाऊ लागली.
मुलं मोठी झाली
आणि तिला आणखी एका मुलाची इच्छा झाली. एवीतेवी बुवांचा काही उपयोग नव्हताच. मग विचाराचा सोपस्कार पार न पाडताच यावेळी पुन्हा ते सर्व घडलं..
यावेळी मुलगा झाला...
मात्र बुवा चिडले.
त्यांना अपमान झाल्यासारखं वाटू लागलं.
तिस-या मुलाकडं त्यांनी पाहीलंही नाही.
बुवा खचले.
म्हातारे दिसू लागले.
त्यांनी मृत्युपत्र बनवलं. दोन मुलांच्या आणि पत्नीच्या नावे सगळं करून ते निघाले. गाव सोडून, देश सोडून..
गाव दु:खी झालं. सर्वांनाच दु:ख झालं
आणि बायकोने बुवांकडे चावडीवर तक्रारनामा दाखल केला.
खळबळ माजली.
बुवांनी तिस-या मुलाच्या नावावर संपत्ती का केली नाही.
बुवांनी गावासमोर आपली असमर्थता उघड केली. लग्नाला असलेल्या नकारामागच कारण सांगितलं. बायको आणि त्यांच्यात झालेला करार त्यांनी सांगितला.
तो करार तिने मोडला होता.
ते मूल त्यांचं नव्हतं असा बुवांचा दावा होता.
बुवांनी हा न्याय केला होता....
तुम्हाला काय वाटतं ?
बुवांचा हा न्याय बरोबर कि चूक ??
आणि का ?
मूळ आर्टिकल : http://www.maayboli.com/node/25657 ( स्म्बंधित लेखकाच्या परवानगीने कॉपी पेस्ट)
वाचने
6046
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
शी:
छान,, पैसा बुवांचा, मर्जी
तूर्तास +०.७५
In reply to छान,, पैसा बुवांचा, मर्जी by शैलेन्द्र
मला एकदम विक्रम वेताळची गोष्ट
शंका
हि गोष्ट माबोवर वाचली आहे.
मूळ आर्टिकल :
In reply to हि गोष्ट माबोवर वाचली आहे. by मितभाषी
योग्यच की.
राजा, न्यायी सम्राट म्हणून
In reply to योग्यच की. by गवि
अर्र..
In reply to राजा, न्यायी सम्राट म्हणून by प्यारे१
काही मुद्दे
In reply to योग्यच की. by गवि
अधिक स्पष्टता
In reply to काही मुद्दे by पंगा
हम्म्म्म...
In reply to अधिक स्पष्टता by गवि
अमोल पालेकरचा अशा विषयावर
पैसा बुवांचा, मर्जी बुवांची...
शंका
"बुवांची" कुठली संपत्ती?
शंका
In reply to "बुवांची" कुठली संपत्ती? by नितिन थत्ते
बाजूला ठेवलेला प्रश्न
In reply to "बुवांची" कुठली संपत्ती? by नितिन थत्ते
करुणानिधी याचे उत्तर अगदि
इतक लांब कशाला जाता?
In reply to करुणानिधी याचे उत्तर अगदि by ५० फक्त
बुवांची बायको कुठे असते आजकाल
अरा बॉब्बो... (का बुवा?)
In reply to बुवांची बायको कुठे असते आजकाल by परिकथेतील राजकुमार
पाकीटाला परवडतं का?
In reply to बुवांची बायको कुठे असते आजकाल by परिकथेतील राजकुमार
बुवांना नसेल परवडत, म्हणून
In reply to पाकीटाला परवडतं का? by ३_१४ विक्षिप्त अदिती
गावातच असते बुवीण..
In reply to बुवांची बायको कुठे असते आजकाल by परिकथेतील राजकुमार
वळा तिच्यायला चर्हाट....
जोपर्यन्त तिसर्या मुलाला
सहमत
In reply to जोपर्यन्त तिसर्या मुलाला by विजुभाऊ
मोरल काय या गोष्टीच? नपुसंक