वीकेंडचा मेनू
वीकेंडचा मेनू
सध्या आमरसाचा सिझन आहे , म्हटल चला ट्रायच करुया म्हणून आमरस ,पुरणपोळी ,भात आणि आमटी अन कांदा भाजी ,बटाटा भजी, याचा घाट घातला होता .(आणि इथे देण्याचा मोह अनावर झाला म्हणुनच देत आहे )
पुरण पोळी :-अर्धा कि. हरबरयाची डाळ पातेल्यात बर्यापैकी शिजवून घेऊन त्यात किसलेला गुळ (जेव्हढ गोड चालत तेव्हढा ),आणि १ वाटी साखर घालणे ,इलायची पूड १ छोटा चमचा ,जायफळ पूड १ छोटा चमचा .चुट़कि भर मीठ घालून पुरण यंत्रात ,मिक्सित /पाट्यावर वाटून घेणे .
कणकेच्या पारया बनवून त्यात हे पुरण भरणे,मोदकासारखे तोंड बंद करून हलकेच गोल लाटी बनवून लाटावी
आणि भरपूर तूप लावून शेकावी ,पुरणपोळी तय्यार !
आमरस : आंबे (तुम्हाला जे आवडतील ) १ किलो ,एक वाटी दुध आनि ४-५केसर काड्या ,इलायची पावडर चुटकी भर
आंब्याची साल काढून त्याचे काप बनवा एका पातेल्यात आंब्याचे काप घेऊन त्यात एक वाटी दुध ,इलायची ,हवी असल्यास थोडी साखर घालून हॅण्ड ग्राइडर ने घुसळून घ्या,नाहि तर मिक्सी मध्ये , ज्यांना हाताने आवडत असेल त्यांनी हाताने स्मश करून घ्या ,रस झाल्यावर फ्रिज मध्ये थंड करा ,गार गार आमरस खायला तय्यार !
भजी : २ वाट्या बेसन ,ओवा छोटा चमचा ,२ कांदे उभे पातळ चिरून ,कोथिंबीर ,५-६ हिरव्या मिरचीचे तुकडे ,खाता सोडा चुटकी भर ,मीठ चवीनुसार ,थोडी हळद, या सर्व साहित्याचे पाणी घालून मध्यम मिश्रण करून घ्या ,भजि गरम तेलात तळुन घ्या .
बटाट्याचे पातळ काप करून मी याच मिश्रणात बटाटा भजी पण तळुन घेतली होती
वाचने
12347
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
पुरणपोळी छान जमलीये. बेत एकदम
मस्तच बेत आहे... पण आमरस
@ निवेदिता ताइ मि स्वत: कधि
जबरदस्त!!
फोटो दिसले.
रोज अंडी घालणार्या
In reply to रोज अंडी घालणार्या by परिकथेतील राजकुमार
(No subject)
In reply to (No subject) by नन्दादीप
(No subject)
+१
In reply to +१ by स्पा
चान चान. त्यानंतर बडीशेप
In reply to चान चान. त्यानंतर बडीशेप by परिकथेतील राजकुमार
त्यानंतर बडीशेप किंवा
In reply to चान चान. त्यानंतर बडीशेप by परिकथेतील राजकुमार
आता महिला मुक्ती मोर्चा येणार
लै भारी..!
मस्त...
मला 'गरम पानी' करन्याची
असे ब्राह्मण जेवूनी तृप्त झाले
खरंच पराशेट म्हणतात तसं आता
In reply to खरंच पराशेट म्हणतात तसं आता by ५० फक्त
@ परा,स्पा,५० फक्त तुमचि
In reply to @ परा,स्पा,५० फक्त तुमचि by पियुशा
पियुषा तुला असं म्हणायचं का?
In reply to पियुषा तुला असं म्हणायचं का? by स्पा
स्पा..
In reply to पियुषा तुला असं म्हणायचं का? by स्पा
पियुषा तुला असं म्हणायचं का?
च्यायला वीकेंड स्पेशल आमच्या
मला तर बेत
In reply to मला तर बेत by गोगोल
+१
फारच छान फोटु...
छान बेत, आवडला. पुरणपोळी आणि
तमाम लो़कानकरिता एक भारी जेवन
तमाम लो़कानकरिता एक भारी जेवन
वीकेंडचा मेनू