✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बायोफायबर हेअर इंप्लांट? कोणी केलंय का? माहीती?

P
pramanik यांनी
Sat, 05/21/2011 - 05:51  ·  लेख
लेख
जय हींद, देहरुपी मंदीराच्या कळसावर केस कमी झलेत्,त्यात मागे डोक्यावर फराच कमी झालेत्,त्यांना मुलामा चढवावा म्हणुन तात्पुरते बायोफायबर हेअर इंप्लांट(म्हणजे जेवढा काळ टीकेल ते टीकेल) करवयाचे आहे,आता ते पहील्यापेक्षा सुरक्षित आहेत(इन्फेक्शन व्ह्यायचा चान्स कमी). पण चमकणारे सोने नसते,पण नसतेच असेही नाही,म्हणुन आपणास ह्या सर्जरीबद्द्ल काहीही माहीती असल्यास,आपणा माहीतीतल्या कोण्या व्यक्तीने ही सर्जरी केली असल्यास त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल्,हाच हा धागा काधायचा उद्देश्/हेतु आहे. ईंटरनेट्वर माहीती आहे पण खरे अनुभव कथन केलेले कोणी नाही,तेव्हा कृपया मदत करावी.आपली खुप मदत होईल. धन्यवाद.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8203 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

तुम्हाला पण 'जयहिंद'.

नाना बेरके
Sat, 05/21/2011 - 06:10 नवीन
तुम्हाला पण 'जयहिंद'. बायोफायबर हेअर इंप्लांट म्हणजे काय असते ? त्याला कुठले मटेरीयल वापरतात? कि ते औषधाने करता येते? ह्याबद्दल माहीती नाही पण उत्सुकता आहे. डोक्याला चाई पडली तर त्याचा उपयोग होतो कां ? हाही एक प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments

वीरु हो आपला शेहवाग त्याने

सन्दीप
Sat, 05/21/2011 - 06:17 नवीन
वीरु हो आपला शेहवाग त्याने केलय म्हणे. त्यालाच विचारा.
  • Log in or register to post comments

सेहवाग, सलमान अथवा हर्षा

परिकथेतील राजकुमार
Sat, 05/21/2011 - 06:18 नवीन
सेहवाग, सलमान अथवा हर्षा भोगलेला भेटा. अवांतर मी आधी चुकुन 'बायकोबरोबर हेअर इंप्लांट? कोणी केलंय का? माहीती?' असे वाचले.
  • Log in or register to post comments

हर्षा भोगले यांच्याशी संपर्क

नितिन थत्ते
Sat, 05/21/2011 - 06:22 नवीन
हर्षा भोगले यांच्याशी संपर्क करा.
  • Log in or register to post comments

सहजच विचारतो, लग्न झालय का

आनंद
Sat, 05/21/2011 - 06:35 नवीन
सहजच विचारतो, लग्न झालय का तुमच? नसेल झाल तर ते काय हेअर इंप्लांट का काय ते करुन घ्या. झाल असेल तर काय फरक पडतोय आहे ते राहु द्या
  • Log in or register to post comments

डानरावाना विचारा

विजुभाऊ
Sat, 05/21/2011 - 06:38 नवीन
डानरावाना विचारा
  • Log in or register to post comments

१) स्वतःला माहिती आहे केस

प्यारे१
Sat, 05/21/2011 - 15:04 नवीन
१) स्वतःला माहिती आहे केस नाहीत, लावणार ते कसेही असले तरी खोटे असणार. २) जवळच्या सगळ्यांना ठाऊक असणार की ह्याचे केस गेले आहेत. नंतर इम्प्लान्ट केल्यावर खोटे असलेले केस समजणार आहेच. ३) जे जवळचे नाहीत त्यांना तुम्ही केसाळ आहात की टकले याच्याशी काहीही घेणे देणे असणार नाहीये. ४) लग्न झालेले नसेल तर होणार्‍या बायकोला तुम्ही फक्त केस असल्यामुळे आवडणार असाल तर तिची मानसिकता किती उथळ आहे हे तुमच्या लक्षात येईल. त्यापेक्षा अशी बायको निवडणे अधिक हितकारक जी तुम्हाला आहात तसे स्विकारेल.( डोक्यावरल्या केसांबाबत मर्यादित) या उप्पर आपली मर्जी.
  • Log in or register to post comments

१) अगदी खरे दीसतात्,तुम्ही

pramanik
Sat, 05/21/2011 - 20:56 नवीन
१) अगदी खरे दीसतात्,तुम्ही सांगितले की हेअर ट्रान्सप्लांट केलय तरी खोटे वाटणार नाही,हे केस खोटे असले तरी 'विग' पेक्षा १०० टक्के चांगले,विग हे वरती ठेवले जाती,हे केस मुळात पेरले जातात.फक्त हेअर ट्रान्सप्लांट सारखे वाढत नाहीत. २)समजेल पण आपल्या डोक्यावर केस तर दीसतील ना,त्यात खरे सुख! ३)साफ चुक तुम्हाला प्रत्येक ठीकाणी ह्याची जाणीव करुन दीली जाते,म्हणुन तुमची लुक खुप महत्वाची. ४)हे एकदम मनातले बोललात्,लग्न झाले नाहीये पण होईल छान सर्व्,मी दुस-यासारखे हे स्विकारनार नाही,बदलेन्,हेअर ट्रान्सप्लाट इतक्यात नाही करायचे म्हणुन ह्या बद्दल विचारत होतो.मी अपेक्षा कशी ठेवणार की एखाद्या मुलीने मला स्विकारावे? जर मला सर्व केस असते(जे आहेतही पण नाहीयेत असे समजा) तर मीही सुंदर मुलगीच पहीली असती ना? रंग ही माझ्यासारखा असावा असे म्हणालो असतो ना? अवो मर्जी नाही काय्,मजबुरी,पण आपण हे बदलणार हे नक्की :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

+१

स्पा
Sat, 05/21/2011 - 15:12 नवीन
हॅ हॅ हॅ
  • Log in or register to post comments

सेहवाग - डायरेक्ट हेअर

pramanik
Sat, 05/21/2011 - 15:24 नवीन
सेहवाग - डायरेक्ट हेअर ईंप्लांट भोगले - हेअर ट्रान्सप्लान्ट पहील्यात आपलेच केस डोक्या मागची स्कीन न कापता लावतात्,ह्याने टाके यत नाहीत. दुस-यात मागे टाके येतात. पण दोन्ही मधे केस हे आपलेच असतात्,एका जगीचे दुस-या जागेत लावलेले.दोन्ही परमानन्ट उपाय आहेत. पण बायोफायबर हे आपले केस नसतात दुसरे मटेरीयल असते म्हणुन इन्फेक्शन व्ह्यायचा चान्स असतो . काही माहीती आहे का ख-या एखाद्या पेशन्टबद्द्ल?
  • Log in or register to post comments

माझ्यामते टक्कलही पर्सनॅलीटीत

अलख निरंजन
Sat, 05/21/2011 - 21:03 नवीन
माझ्यामते टक्कलही पर्सनॅलीटीत भर घालू शकते. अब्दुल कलांमासारखी ओंगळवाणी केशरचना असण्यापेक्षा अनुपम खेर सारखे स्मार्ट टक्कल काय वाइट?
  • Log in or register to post comments

+1

रमताराम
Sat, 05/21/2011 - 23:05 नवीन
शिवाय शँपूचा/तेलाचा/कंडिशनरचा खर्च किती वाचतो याचा विचार करा. (काटकसरी)रमताराम फक्त शेविंग क्रीमचा खर्च वाढणार नाही याची काळजी घ्या म्हंजे झालं. (सावध) रमताराम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अलख निरंजन

का? हे काय वाईट्ट आहे?

Nile
Sun, 05/22/2011 - 01:42 नवीन
का? हे काय वाईट्ट आहे? ;-) Image removed. उलट असा फायदाही करुन घेता येईल. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

अहो डोकं शेव करण्याचं म्हणत

अलख निरंजन
Sun, 05/22/2011 - 03:05 नवीन
अहो डोकं शेव करण्याचं म्हणत आहेत ते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

अहो

रमताराम
Mon, 05/23/2011 - 15:14 नवीन
हा नायल्या बरेच दिवस गायब होतो, मग येतो तेव्हा ट्यूबलाईट अंमळ उशीरा पेटते त्याची. (पण एकदा पेट्ली की मग स्पार्किंग चालू होते हा मुद्दा अलाहिदा.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अलख निरंजन

थोडे पुढे

Nile
Tue, 05/24/2011 - 12:18 नवीन
आम्ही तुमच्या थोडं पुढे जाउन तुळतुळीतपणाच्या ऑब्सेशनवर कमेंट केली हो! आम्हाला पुढे रहायची सवयच आहे काय करणार! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

छगन भुजबळना विचरा

नर्मदेतला गोटा
Sat, 05/21/2011 - 23:13 नवीन
छगन भुजबळना विचरा
  • Log in or register to post comments

हेच म्हणायचे होते . - (

टारझन
Sun, 05/22/2011 - 19:23 नवीन
हेच म्हणायचे होते . - ( सकाळी सकाळी नर्मदेत जाणारा ) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नर्मदेतला गोटा

.

नर्मदेतला गोटा
Mon, 05/23/2011 - 00:07 नवीन
डोक्याचा झालेला गोटा नर्मदेतला
  • Log in or register to post comments

तुम्ही कुरूप दिसता असं

शिल्पा ब
Mon, 05/23/2011 - 00:26 नवीन
तुम्ही कुरूप दिसता असं तुम्हाला वाटतंय का? नाही अगदी धागाच काढला म्हणून विचारलं... टक्कल असलं तरी उठावदार व्यक्तिमत्व असलेले लोकं पहिले आहेत. आता तो प्रिन्स विल्यम नाही का टकला? सेहवाग अगदीच भयानक दिसत होता म्हणून त्याने सर्जरी केली असेल असं वाटतंय... बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments

तुम्ही महा-गुरून सारखा विग का

माझीही शॅम्पेन
Mon, 05/23/2011 - 08:29 नवीन
तुम्ही महा-गुरून सारखा विग का लावत नाही ! शपथ सांगतो सचिन जाम डोक्यात जातो , त्यानी फॅंडा द्यायला सुरूवात केली की अस वाटत जिथे कुठेही लाईईव शूटिंग चालू असेल प्रेक्षक म्हणून जाव आणि कॅमेरा समोर त्याचा विग उडवून द्यावा !!!
  • Log in or register to post comments

हा प्रतिसाद सुपरलाईक करण्यात

सविता
Tue, 05/24/2011 - 13:40 नवीन
हा प्रतिसाद सुपरलाईक करण्यात येत आहे. मला वाटायचे फक्त माझ्याच डोक्यात जातो तो सचिन, पण आहेत.... बरेच रांगेत.... नच बलिये जिंकलं आणि ह्याला वाटायला लागलं..आपण लय भारी.... शामक दावर च्या ग्रुप मधलं कोणीही किंवा गेला बाजार... डान्स इंडिया डान्स मधले कोणीही परिक्षक किंवा स्पर्धक या छपरी सचिन पेक्षा १०० पट चांगले नाचतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

अहो धन्यवाद ! लाईन बरीच मोठी

माझीही शॅम्पेन
Wed, 05/25/2011 - 20:46 नवीन
अहो धन्यवाद ! लाईन बरीच मोठी आहे :) इथे विषयंतर होत असल्याने कदाचित जास्त लोक प्रतिक्रिया करणार नाहीत !! अवांतर - संसदीय भाषेत शिव्या घालण्यासाठी आम्ही हल्ली "महा-गुरू" शब्द वापरतो .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता

केश योग वापरा... त्याने

अविनाशकुलकर्णी
Mon, 05/23/2011 - 21:09 नवीन
केश योग वापरा... त्याने टकलावर केस उगवतात....असा त्यान्चा दावा व वादा आहे. त्या बरोबर श्री ल्क्ष्मी यंत्र पण फुकट मिळते.. ट्राय करायला हरकत नाहि..नाहितर केश रोपण आहेच.. रात्री १२ नंतर ह्या जाहिराति..सुरु होतात...
  • Log in or register to post comments

.

इंटरनेटस्नेही
Mon, 05/23/2011 - 23:45 नवीन
.
  • Log in or register to post comments

कोनाला कशाचं तर pramanik

नरेशकुमार
Wed, 05/25/2011 - 08:07 नवीन
कोनाला कशाचं तर pramanik रावांना केसांच ! मागे माझा एक मित्र डोक्यावर केस येन्यासाठी एक तेल लावत असे. काही फायदा झाला कि नाही ते विचारुन सांगेन. बादवे आमचं उलट आहे, केसांची वाढ खुप आहे. त्यामुळे असले काही काम करन्याची वेळ आली नाही.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा