"आपण मराठी माणसं वैचारिक, आणि बुद्धीवादी वगैरे चर्चा करण्यात एकदम पटाईत असतो. " :)
अती झालं आणि हसू आलं. माझ्या वैयक्तिक अनुभवात आणि एकंदर देशातील घडामोडींत विलक्षण साम्य दिसल्याने गंमत वाटली आणि बोलावंसं वाटलं. या चर्चेत वैचारीक आणि बुद्धीवादी असं काही नाही.
प्रसंग १ -
मी साधारण जानेवारी २०१० मध्ये माझे जुने वाहन विकले आणि दुसरे घेतले. (दोन चाकी/चार चाकी ते सांगत नाही. नाहीतर लगेच तुम्ही निष्कर्ष काढाल की मी माझ्याकडे अमकी गाडी आहे हे सांगायला हा धागा काढलाय. ;))
तर सांगायची गोष्ट अशी की मार्च २०१० मध्ये आरटीए वेबसाईटवर जुन्या वाहनाच्या परवान्याचे नवीन मालकाच्या नावे झालेले नूतनीकरण पाहून संतोष पावलो.
पण दुर्दैव! फेब्रुवारी २०११ म्हणजे तब्बल एक वर्षानंतर त्या जुन्या वाहनात बसून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल १००० रु. दंड केल्याचे पत्र मला माझ्या पत्त्यावर आले.
वस्तुस्थिती अशी होती की ते वाहन शहराच्या दूरच्या अन्य विभागात असल्याने त्यात बसणेच काय पण त्याचे दर्शनही मला वर्षभरात झाले नव्हते. ते पत्र (शहराच्या वहातुक नियंत्रक -ट्रॅफिक) पोलीस खात्याकडून आल्याने घरचे (आणि मीही) क्षुब्ध झाले. (पोलीस = ओलीस!!!)
(टू कट अ लाँग स्टोरी शॉर्ट-) मध्यंतरी झालेल्या आरटीएच्या डेटाबेसमधील तांत्रिक बिघाडामुळे ते वाहन पुन्हा माझ्याच नावावर नमूद झाले. नव्या मालकाने केलेल्या गुन्ह्याबद्दल मला दंडाचे पत्र आले. त्यावर मी ट्रॅफिक पोलीस अॅडिशनल कमिशनरला भेटलो तर मलाच गुरकावत तो म्हणाला की तुम्हीच ट्रान्स्फर केले नसेल, ती तुमचीच जबाबदारी आहे, जे काही असेल ते असेल पण आधी दंड भरा मग बोला... इ.इ. माझी बोलतीच बंद!
मग मीच एक रविवार फुकट घालवून शहराच्या अनोळखी भागात फिरून माझे जुने वाहन आणि नवा मालक यांचा शोध लावला, त्याच्या नावावरच्या नव्या आरसीए कार्डचे झेरॉक्स/ फोटो इ. सर्व घेतले आणि पुन्हा अॅ.कमि. ट्रॅ. पो. यांच्याकडे गेलो. ते पुरावे पाहिल्यावर मग कुठे साहेब जमिनीवर आले. त्यांनी दंड माफ केल्याचे लिहून दिले. परंतु-
ट्रॅफिक पोलिस आणि आरटीए यांच्यात काहीच समन्वय नाही. स्थानिक आरटीएशी याबाबत संपर्क साधला असता त्या वाहन परवान्याचे जेथे (शहरातील दुसर्या आरटीए ऑफिसखाली) नूतनीकरण झाले आहे तेथे मीच स्वतः जाऊन सर्व पुरावे सादर करावेत आणि त्या ठिकाणच्या अधिकार्यांकडून तसे पत्र मीच घेऊन स्थानिक आरटीएला सादर करावे, मगच योग्य ती कार्यवाही होईल असे उत्तर मिळाले. (थोडक्यात काय? तर दोन्ही ठिकाणांच्या दलालांना प्रत्येकी २००० रु. द्यावेत आणि दोन - तीन दिवस हेलपाटे मारावेत!)
सध्याची परिस्थिती अशी आहे की ते जुने वाहन स्थानिक आरटीएच्या डेटाबेसमध्ये अद्याप माझ्याच नावावर आहे.(ते वाहन चोरीला गेले आहे अशी तक्रार पोलीस ठाण्यात करावी असे बरेचदा मनात येते. :))
प्रसंग २-
सध्या भारतीय तुरुंगात असलेले / कोर्टासमोर हजर रहाणारे आरोपी अजूनही पाकिस्तानातच आहेत आणि ते भारतात 'मोस्ट वाँटेड टेररिस्ट' आहेत असे आपल्या भारत सरकारने पाकिस्तानला दिलेल्या यादीत लिहून दिले आहे.
मला वाटते पाकीस्तानने जर हे आरोपी भारतातच आहेत असे लेखी उत्तर दिले तर भारत सरकारने त्यांना तसे सिद्ध करण्याची मागणी करावी. आयएसायने आपले गुप्तहेर भारतात पाठवून त्यांना पकडावे, अधिकृतपणे भारताच्या सुपूर्त करावे आणि मगच आम्ही त्यांची नावे यादीतून काढू असे जाहीर करावे.
म्हणूनच हा चर्चाप्रस्ताव 'भारतात अराजक माजले आहे का?' असा मांडण्याऐवजी 'भारतात अराजक माजले आहे. का?' असा मांडणे योग्य वाटते. भारत हा देश अजून केवळ योगायोगाने सुरू आहे. किंवा खराच सुरू आहे का?(किंतु नको म्हणून हे स्पष्ट करतो की मी कायद्याने लागू असलेले सर्व कर भरतो. त्यामुळे देश तुम्हाला काय देतो यापेक्षा तुम्ही देशाला काय देता याचा विचार मी करतो असे वाटते...)
आपल्यालाही असा 'सर्कारी' अनुभव आला आहे का? आपले मत जाणून घेण्यास उत्सुक आहे.
वाचने
4202
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
अनेक सरकारी अनुभव जमा आहेत
अनुभव वाचण्यास उत्सुक
In reply to अनेक सरकारी अनुभव जमा आहेत by रामदास
भारत
गाल्ब्रेथ
In reply to भारत by चिरोटा
अनुभवान्ची चर्चा कशाला?
धन्यवाद..
अराजक माजल आहे का? ह्यावर
गुण
खाजगी व सरकारी
In reply to गुण by नितिन थत्ते
>>खाजगी क्षेत्रात एकाचीच
In reply to खाजगी व सरकारी by हुप्प्या
अराजक आहे. कारण, १. पराकोटीचा
विसुनाना...
अराजक ह्या शब्दाची व्याप्ती
भारतात अराजक माजले आहे का? हे
कालंच मित्राकडून ऐकलेला रंजक
भोंगळ
बरोबर
चर्चेत भाग घेणार्यांना धन्यवाद
कुणाला कशाचिच भिति वाटत नाहि
बरे झाले
बहुतेकांना वाटतंय अराजक आहे.
हॅ हॅ हॅ . तुम्हीच सांगा !
In reply to बहुतेकांना वाटतंय अराजक आहे. by नगरीनिरंजन
काही
हे असे ब्यांकेकडूनदेखील होऊ
>>खात्यातील आकडेवारीमुळे रोज
In reply to हे असे ब्यांकेकडूनदेखील होऊ by विजुभाऊ
हा
In reply to हे असे ब्यांकेकडूनदेखील होऊ by विजुभाऊ