Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by गणेशा on गुरुवार, 05/19/2011 - 10:01
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव
१. बाबा (आपल्या मनाशीच) तु मी अन ममा, आपला ग्रुप होता.. त्यात आपल्या दोघांचा Secrete groupहोता. आता आपला ग्रुप फुटला आहे, कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस तुझ्या नव्या जगात तु रमली आहे.. तुझ्या रुमच्या दारावर लावलेल पोस्टर It is my Mess and i Love it पलंगावर पुस्तके उघडी, कपडे पडलेले, बाजुला ड्राईंग बोर्ड,त्या वर ड्राईंग शीटसचे भेंडोळे कॉंम्प चालु, अन त्यात तुझा अभ्यास चालु ममान तुला पसाऱ्या बद्दल दटावणे,मग चिडचिड, मी हळुच तुझी बाजु घेणे.."सासरी काय होईल देव जाणें" तिच पुट्पुटणे....आता सार शांत आहे... कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस तुझ्या नव्या जगात तु रमली आहे.. तुझ्या कॉलेजची अन मी कारखान्याला जाण्याची एकच वेळ.. मग, ति सकाळची मरण घाई..माझ्या नकळत अंघोळीला जाणे. १५-२० मिनीटे बाथरुम अडवणे..माझी चिड्चीड..आता फक्त आठवणी कामावरुन दमुन आलो की..Whatzzz up dad..How was the day विचारण... रात्री जेवण झाले कि Long ride ला जाण....... मग त्या कॉलेजच्या गमती सांगण.. पी.जे..ऎकविण..ति बरीस्ता कॉफि पिणे...ह्या साऱ्या आठवणी.. कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस तुझ्या नव्या जगात तु रमली आहे.. तु म्हणजे घरातल आनंदाच कारंज होत..थुइथुइ उडणार.. आता तुझ्या मैत्रीणीचा थवा येत नाहि..चिवचिवाट नाहि.. तुझी रुम शांत आहे..पुस्तके कपाटात.कपडे पण घडी करुन. ड्रॉईंग बोर्ड भिंतिला टेकुन उभा..कोपऱ्यात गणपती बाप्पा ध्यानस्थ टेडी बिअर, आणी स्टफ टॉइज पलंगावर बसलेली, तुझी वाट बघत.. फ्रीज मधल्या दुधाच्या पिशव्या,अन बोर्न व्हिटाचा डबा तसाच.. कारण दुध पिणारी माऊ अमेरिकेला गेली आहे. आम्हाला आठवण येते..पण आम्हि पण खुष आहोत.. कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस तुझ्या नव्या जगात तु रमली आहे.. ---- अविनाश कुलकर्णी २. आई..( आपल्या मनाशीच) मी.. तू अन तुझा पपा आपल छोटस नटलेल जग.. सासरी तू गेल्या पासुन बैचेन झाले आहे अगदी, हे घरट .. तुझी ती रुम, तुझी पुस्तके , तुझा कॉम्प, सारं तसच अगदी शांत ... आता तुझ्या बाबांची लुडबुड नाही की तुझा किलबिलाट तेथे अगदी निरस वाटते आहे ग पोरी आठवतं मला अता ते तुझा पसारा पाहुन माझं ओरडणं जास्त काम पडयचं मला पण ह्यानी तुझी बाजू घेतली तरी रागारागातच सारं आवरणं रोज सकाळची तुमची ती मस्ती आणि ते भांडन .. विसरेल कशी मी हा.. तुमच्या त्या चिडचिडीत विसरायची मी नाष्टा करताना त्यात मीट टाकायचे अन मग तुम्हालाच कारण धरुन ओरडायचे अता रोज नाष्टा करताना काही मिस नाही होत तरी पण बरेच काही मिस वाटते आहे तुझे ते मैत्रीणीं बरोबर घरात ढुडघुस घालणे कार्ट्यांनो SS म्हणत माझ नेहमीच तुम्हाला रागावणे पण नाही ग .. अता मला सार परत हव आहे पण .. पण अता ते शक्य नाहीये कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस ... रात्री जेवताना .. तुमचे लक्ष नसायचे जेवाताना सारखे आपले ते पी. जे. आणि काही नसेल तर माझ्या वरती हळुच प्रेमळ टोमणे अन माझं आपलं मग पुन्हा ओरडणे लाडवून ठेवून बिघडवली आहे लेकीला म्हणत यांनाही बजावणे.. पण अता सार बदलल आहे. . कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस ... कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस ... ---- शब्दमेघ ( "स्त्री..भावनांचा प्रवास" या माझ्या डायरी मधुन ) नोट : कविता पुनःप्रकाशीत, पहिली कविता आमचे परम मित्र अविनाश काकांची आहे.. ही माझी सगळ्यात आवडती कविता आहे.
  • Log in or register to post comments
  • 6939 views

प्रतिक्रिया

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 05/19/2011 - 10:45

Permalink

आवरा तेज्यायला !! गणेशा

आवरा तेज्यायला !! गणेशा तुम्ही तरी मला जरा समंजस वाटला होतात. तुम्हीपण ??
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on गुरुवार, 05/19/2011 - 11:02

Permalink

@ परा ... नोट काढुन धाग्याचे

@ परा ... नोट काढुन धाग्याचे नाव बदलले आहे.. अवांतर : आवरा हीच भावना होती.. फक्त लिहिण्याची पद्धत वेगळी आली होती.. तरीही क्षमस्व.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 05/19/2011 - 11:29

In reply to @ परा ... नोट काढुन धाग्याचे by गणेशा

Permalink

काय शेठ क्षमस्व कशाला ? भापो

काय शेठ क्षमस्व कशाला ? भापो हे महत्वाचे.
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on गुरुवार, 05/19/2011 - 11:23

Permalink

मस्त!

--मनोबा
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on गुरुवार, 05/19/2011 - 11:41

In reply to मस्त! by मन१

Permalink

धन्यवाद...

.
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on गुरुवार, 05/19/2011 - 15:15

Permalink

सध्या मिपावर कऊटूंमबीक वीक चालू आहे काय ?

गणेशा... खरोखर... रडवलस मीत्रा... डाव्या डोळ्यातून धार लागलीय.........
  • Log in or register to post comments

Submitted by नन्दादीप on Fri, 05/20/2011 - 02:21

In reply to सध्या मिपावर कऊटूंमबीक वीक चालू आहे काय ? by आत्मशून्य

Permalink

+१.

+१.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on गुरुवार, 05/19/2011 - 17:48

Permalink

डोळे पाणावले.....

कसदार मुक्तक. डोळे पाणावले.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Fri, 05/20/2011 - 02:11

Permalink

छान लिहिलय रे गणेशा.

छान लिहिलय रे गणेशा.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Fri, 05/20/2011 - 02:11

Permalink

छान लिहिलय रे गणेशा.

छान लिहिलय रे गणेशा.
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Fri, 05/20/2011 - 02:20

Permalink

शेवटच्या तीन

शेवटच्या तीन ओळी.....................तोडलंस मित्रा....डोळ्यात पाणी दुसरे काय ? छान...... .
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Fri, 05/20/2011 - 23:59

Permalink

छान रे. पण आता दुसर्‍या

छान रे. पण आता दुसर्‍या विषयांवर लिहावेस असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Sun, 05/22/2011 - 19:28

In reply to छान रे. पण आता दुसर्‍या by नगरीनिरंजन

Permalink

प्रतिक्रिया खुप बोलकी आहे

प्रतिक्रिया खुप बोलकी आहे ... नक्कीच दूसर्या विषयावर लिहायला सुरुवात करतो .. धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Sat, 05/21/2011 - 02:24

Permalink

मस्त.

मस्त.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com