चॉकलेट फज् : Chocolate Fudge
रेशमी..जिभेवर वेल्वेटी फील देणारं ...चॉकलेट फज्!
सोप्पं आहे. पण कधी वड्या पडतील याचा परफेक्ट अंदाज यावा लागेल.
साहित्य :
कंडेन्स्ड मिल्क : १ टिन
कूकिंग चॉकोलेट : २०० ग्रॅम्स
साखर १०० ग्रॅम्स
लोणी : ५० ग्रॅम्स
थोडी पिठीसाखर (emergency quick-fix)
कृती :
ट्रे ला तूप / बटर लाऊन घ्या.
सगळं एकत्र करुन नॉन्-स्टिक कढईत घ्या.
सतत हलवत रहा.
कडेनी सुटायला लागल्यावर / गोळा व्हायला लागल्यावर ट्रे मध्ये ओता.
साधारण थंड झाल्यावर फ्रीज मध्ये ठेवा. दोन तीन तासानी स्मूद धार वाल्या सुरीनी तुकडे कापा.
https://lh4.googleusercontent.com/_Rpkesq5CUy4/TdJHAIGhYnI/AAAAAAAAAKI/E7zoNxvPg5c/s512/028.JPG
आता हे नक्की आचेवरुन कधी खाली उतरायचं हे नीट समजावं लागतं...... नाहीतर फज ची " फजिती होते. आणि मग एक तर ते वाटीत घेउन खावं लागतं किंवा.... तोंडात भिजत ठेवून खावं लागतं. वर मानहानी होते ती वेगळीच.
या खुणा लक्षात घ्या :
१) बाऊल मध्ये पाणी घ्या. त्यात उलथन्यावरची थेंब टाका. थेंब पटकन विरघळला नाही पाहिजे. तो तसाच तळाशी न पसरता .. स्वतःच्या अंगाबरोबर उभा रहायला हवा. सैल होउन पसरायला नको.
२) मिश्रण हलवताना त्यात उलथने मधुन फिरवले असता त्यात वाट पडते. असं मस्त चकचकीत्....देखणं दिसायला लागतं.
असं झालं कि आच बन्द करुन मस्त घोटा.
२-३ चमचे पिठी साखर घाला.आणि ओता. २-३ तास फ्रीज मध्ये ठेऊन वड्या कापा.
वाचने
4658
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
मस्त
आईग !!
वाव यम्मी नक्कि ट्राय करनार
वाव यम्मी नक्कि ट्राय करनार
मु वे ला जस्ति आवड्ल बघ एक
In reply to मु वे ला जस्ति आवड्ल बघ एक by पियुशा
धन्स ग माझ्या साठी पार्सल
मस्त आहे हा प्रकार
छानच पाकृ! फोटू तर ग्रेट
मस्तच.
आयला लय भारी...आम्ही कालच