कधीतरी कुणासोबततरी कुठल्याश्या हॉटेलात जाणं होतं. पाणी वगैरे पिऊन जरा स्थिरस्थावर झाल्यावर मेनू कार्ड हातात येतं. गप्पा मारता मारता मंडळी काय खावं-प्यावं ठरवत असतात. तेव्हा मी मात्र पूर्ण हरवून गेलेली असते – तुझ्या आवडीचा पदार्थ त्या मेनू कार्डवर शोधण्यात – सहज चाळा म्हणून. मला काय हवंय ह्यापेक्षा, तुझ्या आवडीच्या पदार्थाचं नाव डोळ्यांसमोर यावं म्हणून क्षणात बरीच धडपड होते. लेदरचं मोठं जाडजूड मेनू कार्ड फटाफट चाळला जातो – अधाशीपणे . फक्त त्या एका पदार्थाचा उल्लेख नजरेसमोर यावा म्हणून. एखाददोन मिनिटात त्या पदार्थाचं नाव छापलेलं सापडतं. त्यावरून हलेकेच बोटं फिरतात. बघणार्यांना त्यात काही वेगळं वाटलेलं नसतं. त्यांच्या लेखी पदार्थाचा अंदाज घेतला जात असतो – त्याच्या किमतीचा अंदाज घेतला जात असतो ...
पण खरंतर अंदाज घेतला जात असतो अजिबात पुसट न झालेल्या तुझ्या आठवणींचा. तुला तुफान आवडणारा तो एक पदार्थ . पुन्हा पुन्हा त्याच एका हॉटेलात जाऊन मागवलेला तोच तो पदार्थ .त्यावर नेहमीच तुटून पडणारा तू . त्या पदार्थाचा तू न थकता केलेला कौतुक आणि मग ओशाळून "सॉरी, मी खाण्याच्या गप्पांमधेच गुंतलो अगं !" म्हणणारा निरागस तू . त्यानंतर नि :शब्दपणे सरणारी आपली हळवी भेट ..
मेनू कार्ड वरून बोटं फिरताना हे सगळं क्षणार्धात आठवतं आणि तितक्याच सहजपणे ते पान नजरेआडही टाकलं जातं हल्ली . तुला आवडणारा पदार्थ सोडून भलताच पदार्थ मागवला जातो . हसत खिदळत संपवला जातो. बिल भरून बाहेर निघायची वेळ येते...
बाहेर पडताना आपलं नेहमीचं टेबल आणि त्यावरच्या मेनू कार्डवर एक अलिप्त नजर फिरवली जाते. स्वत:लाही कळेल न कळेल असं अस्फुट हसू ओठावर येतं. आनंदाचं किंवा दु:ख्खाचं हसू नव्हे... भूतकाळाला दिलेलं ओळखीचं हसू फक्त..
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6854
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतिम
मस्त लिहिलेय ग.
सुरेख ग!
छान लिहिलय.......!!!!!
मेनुकार्ड ते वाचिता .. सुर उमटले नवे ..
अर्रर्र...
In reply to मेनुकार्ड ते वाचिता .. सुर उमटले नवे .. by टारझन
कोणता पदार्थ हे लिहिलंच
टोमॅटो ऑम्लेट
In reply to कोणता पदार्थ हे लिहिलंच by अप्पा जोगळेकर
सगळयाच प्रतिक्रियांबद्दल
१. माझा प्रतिसाद माझ्या
In reply to सगळयाच प्रतिक्रियांबद्दल by पल्लवी
-१
In reply to १. माझा प्रतिसाद माझ्या by टारझन
+१
In reply to -१ by आनंदयात्री
असो
In reply to -१ by आनंदयात्री
टार्याशी सहमत (९९%
In reply to असो by टारझन
हे
अगदी हेच म्हणतो!
In reply to हे by सहज
पुनरूक्ती
In reply to हे by सहज
आवडलं
छान
खुपच सुंदर मुक्तक
पल्लवी लेख आवडला ! आयुष्यातून
सहमत आहे ...
In reply to पल्लवी लेख आवडला ! आयुष्यातून by माझीही शॅम्पेन
मुक्तक आवडले. उगाच मुळूमुळू
तरल
झकास!
मुक्तक आवडले. अभिज्ञ.
आवडला मुळ मेन्यु आणि त्यावरची
छोटेखानी पण छान मुक्तक!
आवडलं...
आवडलं.
आवडलं हे... काहीतरी आठवल