Skip to main content

अनोळखी...(गझल)

लेखक स्वानंद मारुलकर यांनी शनिवार, 14/05/2011 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
देऊ नको मला तू नावे अनोळखी का रोज मी स्वतःला व्हावे अनोळखी? मी त्यागिले सुखाने सन्मित्र सोयरे मागून सावली का धावे अनोळखी? गर्दीत ओळखीचे कित्येक चेहरे त्यातून नेमका का भावे 'अनोळखी'? या रोजच्याच वाटा मी चालतो तरी वाटेत लागणारी गावे अनोळखी वैशाख तापलेला वणवा उरी जळे ओठात गीत ओले यावे अनोळखी - स्वानंद http://amrutsanchay.blogspot.com
लेखनविषय:

वाचने 1806
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

छान लिहिलेस! :) राघव

>>>गर्दीत ओळखीचे कित्येक चेहरे त्यातून नेमका का भावे 'अनोळखी'? या रोजच्याच वाटा मी चालतो तरी वाटेत लागणारी गावे अनोळखी>>>सुंदर शेर!