मिपा चे समस्त सुजाण वाचक,
सप्रेम नमस्कार.
मी गेले बरेच दिवस "छत्रपती शिवरायांची माणसे" यावर क्रमशः लिहितोय्.यापैकी प्रथम भाग : बाजी पासलकर लिहून तयार आहे.या संबंधात मी अनेक प्रकाशकांशी बोललो आणि काल या सगळ्याचा गोषवारा काढला तो पुढीलप्रमाणे :
१. हे ३२ पानी पुस्तक आहे ज्याची किंमत ३५/- रुपये आहे.
२. १००० प्रती खपवायच्या झाल्यास किमान ३ वितरक नेमावे लागतील , आणि वितरकांची अपेक्षा विक्रीच्या किंमतीच्या किमान ४० % एव्हढी आहे.यासाठी इतर लोक / प्रकाशक करतात (असे मला एका प्रकाशकानेच सांगितले आहे) तसे मूळ पुस्तकाचे किंमत अव्वा च्या सव्वा मला करायची नाहिये (आणि तसे केल्यास ते विकलेही जाणार नाही !) कारण माझा मूळ उद्देश पैसे कमावणे हा नसून लोकांच्या-सुजाण वाचकांच्या मनात घर करण्यासाठी त्यांच्या घरात प्रवेश मिळविणे (पुस्तकाच्या रूपाने) असा आहे.आणि त्यांना ४० % दिले तर माझा छपाईखर्चच निघून येणार नाही.जरी पैसा कमावणे हा उद्देश नसला तरी पुढील पुस्तकाचा पाया तरी उभा रहायला हवा ना? पुढील पुस्तक : कान्होजी जेधे - ९०-९५ % लिहून झाले आहे.
३. दुसर्या एका प्रकाशकाची पध्दत अशी : प्रत्येक पानाला ते २५/- रुपये देतात मानधन म्हणून म्हणजे मला ८००/- देणार आणि आयुष्यभर माझ्या पुस्तकाच्या हव्या तेव्हढ्या प्रती काढून विकणार्.पण ते पुस्तक मात्र छान काढतात आणि म्हणून मी तयार होतो यासाठी पण ते काल म्हणाले की त्यांच्याकडे सध्ध्या एव्हढे लिखाण पडून आहे की मला अजून २-३ वर्षे थांबावे लागेल !
म्हणून माझी मिपा च्या तमाम वाचकांना अशी विनंती आहे की समजा मीच जर का १००० प्रती काढून खपवायच्या म्हटल्या (नुस्ती संख्या नव्हे - मिपा सारख्या वाचकांना विकल्या म्हणजे- ते पुस्तक वाचले जाईल याची खात्री राहील !) तर मिपा मला याबाबत किती सहकार्य करू शकेल? - म्हणजे मिपा चे वरिष्ठ लोक याबाबत काय सहकार्य करू शकतील?(प्रत्येकाने काही प्रती वितरीत केल्या तरी ही खूप मोठ्ठी मदत होईल मला.मागे मी याबाबत मिपा वर विचारले असता बर्याच लोकांनी प्रायोजक म्हणून पैसे देण्याची पण तयारी दाखवली होती !)
आपण मला माझ्या ई-मेल वर पण लिहून तसे कळवू शकता : sudayan2003@yahoo.com
कळावे , आपल्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट पहात आहे.
उदय सप्रेम
भ्रमण ध्वनी : ९९६७५ ४२७०३
वाचने
4419
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
३२ पानांचे
बैलोबा साहेब,
In reply to ३२ पानांचे by धमाल नावाचा बैल
छत्रपती शिवरायांची माणसे
आभार
In reply to छत्रपती शिवरायांची माणसे by काळा_पहाड
हटके
मनस्वी,
In reply to हटके by मनस्वी
माझे पण नाव नोंदवा
स्वागत आहे !
उदयराव, बाज
फुटपाथ वरील प्रकाशन
एक स्पष्टीकरण...
आभारी आहे !
In reply to एक स्पष्टीकरण... by विसोबा खेचर
इतिहास प्रेमी मंडळाला भेटा