Skip to main content

बदाम बर्फी / कतली

लेखक सानिकास्वप्निल यांनी गुरुवार, 12/05/2011 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्यः १ वाटी बदाम ३/४ ते १ वाटी साखर (आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्तं करणे) २ टेस्पून तुप १ टीस्पून वेलची पुड १/४ वाटी दुध (लागेल तसे घालावे) चांदीचा वर्ख (ऐच्छिक) . पाकृ: १ वाटी बदाम १ तास गरम पाण्यात भिजवून, सालं काढून घेणे. मिक्सरमध्ये बदाम, साखर, लागेल तसे दुध घालावे.(फार पातळ मिश्रण होता कामा नये, जरा घट्टसरच हवे) नॉन -स्टीक पॅनमध्ये २ टेस्पून तुप गरम करावे व वाटलेले बदामाचे मिश्रण घालून ढवळावे. . मध्यम गॅसवर सतत मिश्रण ढवळत रहावे. मिश्रण खदखदू लागले, गोळा होऊ लागले की त्यात वेलचीपुड घालून गॅस बंद करावा. . तुपाचा हात फिरवलेल्या ताटात मिश्रण ओतून नीट पसरवून घ्या. . थोडे गार झाले की चांदीचा वर्ख लावून वड्या कापा. . कसली वाट बघताय, खाऊन तर बघा कशी झालीये :) घरी केलेल्या मिठाईची बातचं न्यारी :) .

वाचने 9427
प्रतिक्रिया 33

प्रतिक्रिया

काय बोलु? पाकृ व फोटो दोन्ही भारीच, हे खुपदा सांगुन झालयं :) बदामाचे मिश्रण खूप वेळ परतावे लागते, असे ऐकले होते, हे खरे का या पाककृतीत? एक सुचना - फोटोवर तुमचा स्वतःचा एखादा बुकमार्क टाकत जा.

मस्त! एवढेच लिहिते, पोस्टही व्ह्यायला हवे ना!

देखणी झालीये बर्फी! तू ग्रेट आहेस. चांदीचा वर्ख कुठे मिळतो? तो खरच चांदीचा असतो का? कारण असं ऐकलं होतं की चांदीऐवजी अ‍ॅल्युमिनियमचा वर्ख विकतात.:( असो, मी बीनवर्खाची बर्फी करीन. मिश्रण आटवायला साधारण किती वेळ लागला ते सांग ना, म्हणजे हाताशी भरपूर वेळ असतानाच हा पदार्थ करीन.

In reply to by रेवती

चांदीचा वर्ख मी भारतातून आणला होता माहित नाही गं तो अ‍ॅल्युमिनियमचा वर्ख आहे का ते....दुकानदाराने चांदीचा म्हणून दिला :) बर्फी वर लावला तर नेहेमीसारखा लागला खरं मिश्रणात दुध जास्त घालू नये नाहीतर आटवायला खुप वेळ लागतो, जरासे दुध घातल्यामुळे ८-१० मिनिटात मिश्रण आटतं.

In reply to by रेवती

चांदीचा वर्ख कुठे मिळतो? तो खरच चांदीचा असतो का? मलाही याची उत्तरे हवी आहेत.. बदाम बर्फी / कतली ....एकदम झकास

..गणपाने किंवा सनिकास्वप्निल ने!! आमचं काय, नेहेमीसारखंच म्हणा. बघायचं नी जड अंतःकरणाने आपल्या कामाला लागायचं !!

फोटु एवढा देखणा आलाय की कॅलरी फॅलरीचा विचार न करता लगेच एक तुकडा उचलुन तोंडात टाकावासा वाटतोय. :)

छे छे. फाल्तु पाककृती. फोटो तर अगदीच सुमार. बदाम तर मला अजिबात आवडत नाहीत. स्वगत.: कितीही खोटे खोटे लिहिले तरी जळजळ कमी होत नाहिये च्यायला. तुमच्यामुळे गोड पदार्थांची पण जळजळ व्हायला लागली बघा :)

मस्त, सुरेख, बघता क्षणी तोंडात महापुर.. एवढे बस की अजुन काही :)

बदाम कतली सुरेख दिसते आहे.. स्वाती

पाकृ व फोटो दोन्ही झकासच :) बदामाची कतली कधी खाल्ली नाही. करून पाहीन :)

पाकृ व फोटो दोन्ही झकासच :) बदामाची कतली कधी खाल्ली नाही. करून पाहीन :)

पाकृ व फोटो दोन्ही झकासच :) बदामाची कतली कधी खाल्ली नाही. करून पाहीन :)

पाकृ व फोटो दोन्ही झकासच :) बदामाची कतली कधी खाल्ली नाही. करून पाहीन :)

मला फारच आवडलेल दिसते आहे :) काय झाले समजले नाही.. हम्म....

..!!!

..!!!

काही बोलवतच नाहीये. आत्ताच्या आत्ता करणार. मस्तच दिसते आहे वडी कत्ल कर डाला!!!

काही बोलवतच नाहीये. आत्ताच्या आत्ता करणार. मस्तच दिसते आहे वडी कत्ल कर डाला!!!