✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

२५ जुन- १९८३

अ
अमोल केळकर यांनी
Wed, 06/25/2008 - 11:48  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5981 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

कोणा कडे

II राजे II (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 06/25/2008 - 12:03 नवीन
कोणा कडे ह्या मॅच ची पुर्ण रेकॉर्डीग आहे का ???? राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!
  • Log in or register to post comments

पूर्ण रेकॉर्डिंग नाही पण..

एडिसन
Wed, 06/25/2008 - 12:46 नवीन
क्षणचित्रे आहेत माझ्याकडे.. Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II राजे II

मराठीत

सुनील
Wed, 06/25/2008 - 12:12 नवीन
सुनील गावस्कर यांनी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सत्कार समारंभात अगदी आवर्जून मराठीत भाषण केले होते, असे आठवते. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

आठवणी

ध्रुव
Wed, 06/25/2008 - 12:24 नवीन
अशा आठवणी कायमच आपल्या बरोबर राहातील... जर मला बरोबर आठवत असेल तर आजच पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराला ४० वर्षे पुर्ण झाली आहेत. -- ध्रुव
  • Log in or register to post comments

हो..

स्वाती दिनेश
Wed, 06/25/2008 - 12:29 नवीन
आणि कपिल "मला मराठी येत नाही." हे वाक्य मराठीतून बोलला होता ते ही आठवले. खूप दंगा मस्ती करत विश्वकप पाहिला होता..तेव्हा कलर्ड टीव्ही इतके सर्वत्र झालेले नव्हते.आमच्याकडेही कृष्णधवल टीव्हीच होता. जाहिरातींचा सुकाळू नसल्याने ड्रींक ब्रेक मध्ये मैदानावर खेळाडू आणि पंचाचे पेयपान इ. दाखवत असत. ते खेळाच्या मैदानाबाहेर काय बोलतात त्याची फार उत्सुकता होती. त्यावेळी अर्थातच स्टंपजवळ मायक्रोफोन वगैरे प्रकार नव्हतेच.पण खूप मजा आली होती त्यावेळी.. स्वाती
  • Log in or register to post comments

कपिल देव निखंज!!

सहज
Wed, 06/25/2008 - 12:37 नवीन
ती १७५ धावांची खेळी व हा अविस्मरणीय झेल.
  • Log in or register to post comments

सोनेरी क्षण

मनस्वी
Wed, 06/25/2008 - 13:21 नवीन
मला हे चित्रण सापडले.... कपिलच्या नजरेतून आनंद आणि समाधान ओसंडून वहातेय! Image removed. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
  • Log in or register to post comments

मी

झकासराव
Wed, 06/25/2008 - 14:21 नवीन
मी त्यावेळी वय वर्षे तीन असल्याने त्यावेळचे काहीच आठवत नाही. पण नंतर एका क्लिपिंग मध्ये कपिलचा तो झेल पाहिला. जबराच झेल होता. राजे बहुतेक स्टार क्रिकेट वर दाखवणार आहेत मॅच परत. त्याविषयी जास्त माहिती मिळाली तर मी सांगेनच जर अजुन दुसर्‍या कोणाला माहीत असेल तर त्यानी सांगा. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

मी तिसरीत

भडकमकर मास्तर
Wed, 06/25/2008 - 14:53 नवीन
मी तिसरीत होतो... सगळ्या मोठ्यांबरोबर शक्य तेवढ्या उशीरापर्यंत पाहत होतो मॅच ते आठवतंय... भारताची बॅटिंग पाहिली मी, आणि मग लवकर झोपलो ..... आणि दुसर्‍या दिवशी रविवार होता बहुतेक... सकाळी उठून मला आनंदाची बातमी कळाली... त्या दिवशी पुण्यात हत्तीवरून साखर वाटली होती, असा फोटो पेपरला होता दुसर्‍या दिवशी.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

हम्म!

विसोबा खेचर
Wed, 06/25/2008 - 15:10 नवीन
हम्म! आम्ही मंडळी २५ वर्ष झाली तरी अजून त्याच नशेत आहोत! चांगलं आहे, चालू द्या... :) आपला, (आस्ट्रेलिया संघाचा प्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

+१

विकास
Wed, 06/25/2008 - 17:30 नवीन
आम्ही मंडळी २५ वर्ष झाली तरी अजून त्याच नशेत आहोत! अगदी खरे आहे. ती रात्र चांगली लक्षात आहे (भारतात रात्री दिसली होती). त्याच बरोबर लक्षात आहे पाश्चात्य खेळाडू आणि माध्यमांचा माजरटपणा... पण त्यानंतर दृष्टीकोन बदलत गेला. (इतरांचा आणि आपलाच आपल्याबद्दल) त्या दृष्टीनेपण या दिवसाचे महत्व आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

क्वचितच अशी संधी येते.

प्रमोद देव
Wed, 06/25/2008 - 20:48 नवीन
भारतीयांना कोणत्याही खेळातले अत्युच्चपद क्वचितच मिळते त्यामुळे असे प्रसंग ते सहजासहजी विसरत नाहीत. आपण नेहमीच हरत असतो त्यामुळे कितीही वाईट पद्धतीने हरलो तरी ते कशाला लक्षात ठेवायचे. ;) खरे तर आपण भारतीय अतिशय दिलदार आहोत म्हणूनच प्रत्येक वेळी आपण प्रतिस्पर्ध्यांना जिंकवत असतो. पण आपल्यातलेच काही अखिलाडू वृत्तीचे लोक कधीकधी स्वत:च जिंकून आपल्या ह्या लौकिकाला बट्टा लावतात आणि वर त्याची रजत जयंती देखिल थाटामाटात साजरी करतात. :D मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

ती रात्र..

संदीप चित्रे
गुरुवार, 06/26/2008 - 02:42 नवीन
कधीच विसरणार नाही (भारतात रात्री मॅच संपली) मी १३ वर्षांचा होतो त्यामुळे जवळपास संपूर्ण सामना लक्षात आहे. माझा सहा वर्षांनी लहान धाकटा भाऊही पूर्ण मॅच संपेपर्यंत जागला होता :) विशेष लक्षात राहिलेले क्षण -- -- गावसकर लवकर आउट झाला आणि आम्ही एकदम निराश झालो -- श्रीकांतने उजव्या गुढघ्यावर बसत मारलेला लाजबाब कव्हर ड्राईव्ह -- बलविंदरसिंग संधूच्या ड्रीम बॉलवर, ग्रिनीजने बॅट उंचावून 'वेल लेफ्ट' केले आणि झपकन तो बॉल आत शिरून ऑफ स्टंफ उडवून गेला -- रिचर्ड्सची बेदरकार चाल आणि झपाट्याची खेळी -- कपिलने घेतलेला रिचर्डसचा केवळ अशक्यप्राय झेल -- विंडीजचा स्कोअर १२०+ झाल्यावरची घालमेल -- मोहिंदरने घेतलेली शेवटची विकेट -- सगळी कॉलनी रात्री उशीरापर्यंत रस्त्यावर :)
  • Log in or register to post comments

तो दिवस!

चंबा मुतनाळ
गुरुवार, 06/26/2008 - 08:41 नवीन
त्या वेळेस मी मँचेस्टर, इंग्लंड मध्ये शिकत होतो. तेंव्हा मॅचेस दिवसाच्या होत, त्यामुळे मी कॉले़जमधे होतो. लॉर्डवर जाऊन मॅच बघायची काही ऐपत नव्हती तेंव्हा, त्यामुळे खोलीवर येऊन संध्याकाळी हायलाईट्स बघीतल्या. मात्र तेंव्हा जेष्ठ पत्रकार चंद्रशेखर संत व त्या वेळचे स्पोर्ट्स स्टार चे पत्रकार विश्वनाथ माझ्या फ्ल्याट वर राहीले होते हे आठवते!! मात्र त्याआधीची भारत-इंग्लंड्ची ओल्ड ट्रॅफोर्डची कसोटी मात्र मी बघायला गेलो होतो, आणी तेंव्हा गावस्कर, पाटील, परकार वगैरेंना भेटलो होतो!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा