कॉशसली ऑप्टीमिस्टीक
लेखनप्रकार
डांबीसानी रसाची वाटी जरा निरीच्छेनीच बाजूला ठेवली.
मास्तराकडे बघत एकदा च्यक असा आवाज काढला.
आंबेवाले विजूभाऊ गॉड हसत म्हणाले "कसे होते आंबे.."
मास्तरानी एक विचीत्र आवाज काढत विजूभाऊंचं संभाषण मूळातच बंद करून टाकलं.
मुक्तसुनीत पेंगत होता.
श्रावण मोडकांनी त्याच्या हातातली जाडजूड कादंबरी हळूच काढून घेतली आणि त्याच्या डोक्याखाली ठेवली.
चतुरंग पाचव्यांदा ए-२ *सी-५ असं म्हणत जागा बदलत राहीला.
बिपीन होमसिक झाल्यासारखा खिडकीजवळ उभा राहून एखादा उंट दिसतो का ते बघत बसला होता.
एकदाच मास्तरांनी आदीतीला मानसकन्या म्हटल्यावर ती आल्यापासून मास्तरांच्या घरात उचकापचक करत होती आणि तूर्तास माळ्यावरची एक छत्री हुडकून त्यावरच्या गंजाच्या डागांचे निरीक्षण करत होती.
त्यामुळे ती गप्प होती म्हणून मास्तर सतत एकटेच बोलत होते .
डांबीसाने दातात अडकलेली एक दसडी काढून फेकली.
मास्तरांनाही हिरडीवर काहीतरी हुळहुळल्यासारखं वाटलं म्हणून आंब्याची दसडी समजून ती काढायचा जोराचा प्रयत्न केला आणि कळवळले .
त्यांनी स्वतःच्याच मिशीचा एक केस उपटल्याचं बघीतल्यावर विजूभाऊ जोरजोरात हसायला लागले.
"म्हातारा येतो असं म्हणाला आहे ना ?" डांबीसानी मास्तरांकडे दहाव्यांदा प्रश्न फेकला .
"आय अॅम कॉशसली ऑप्टीमिस्टीक .. "मास्तर म्हणाले.
"गेल्या अर्ध्या तासात हाच शब्द वापरताय तुम्ही कॉशसली ऑप्टीमिस्टीक .. " एका सणसणीत कोकणी शिवीची जोड देत डांबीस बोलला.
"आता मी तरी काय करू स्साला सक्काळपासून घरी एन्डीटीव्ही प्रॉफीट -टाईम्स नाउ- ब्लूमबर्ग -एन्डीटीव्ही आवाज शिवाय दुसरं चॅनेल कोणी लावत नाही. "
"ती बाई लाडे लाडे विचारते व्हॉट यु थिंक ईज द सिनेरीओ डाऊन नेक्स्ट सिक्स मंथ्स ...."
आणि प्रत्येक जण एकदा घसा खाकरून म्हणतो ... आय अॅम कॉशसली ऑप्टीमिस्टीक .. "
आता हेच तेच ऐकल्यावर तोंडात तेच येणार ना ? "
मास्तर एकदाचे समेवर आले.
"पण म्हणजे नक्की काय ते सांगा ." श्रावण मोडकांनी सायंशाखा प्रमुखाचा आवाज देत विचारलं .
मोडकांच्या आवाजानी मुक्तसुनीतची झोपमोड झाली.त्यानी उशाखालची कादंबरी पुन्हा एकदा हातात घेत विषय समजून घ्यायचा प्रयत्न केला .पण गाडी कॉशसली ऑप्टीमिस्टीक वर येऊन थांबली .
आता मोडक मुक्तसुनीतकडे वळून म्हणाले "तो जोसेफ कॉनराड काही म्हणतो की याबद्दल काही ?"
"मी आत्तातरी सदुसश्टाव्या पानावर आलोय .जर यावर्षी ही कादंबरी मी संपवली तर आय अॅम कॉशसली ऑप्टीमिस्टीक की ह्याचं उत्तर कुठेतरी मिळेल. "
डांबीस चवताळला." ### इकडे चॅनेलवर दुसरं काही नसतं का ?"
"असतं ना .पण चॉईस फारसा नाहीय्ये . एकतर बिझीनेस चॅनेल नाहीतर राखी सावंत ." विजूभाऊंनी डोळे मिटून उत्तर दिलं.
"म्हणजे सगळाच भोंगळपणा " श्रावण मोडकांनी तथ्यांश काढल्यासारखं सांगीतलं .
आता आदीतीला हवं तसं पिच मिळालं होतं . ती शास्त्रज्ञ असल्यामुळे मास्तरांच्या बाजूनी उठून डांबीसाच्या बाजूला जाऊन बसली आणि म्हणाली "आमच्यात असं कॉशसली ऑप्टीमिस्टीक काहीच नसतं .आमच्यात एक तर असतं किंवा नसतं पण हा कॉशसली ऑप्टीमिस्टीकचा घोळ नसतो. "
"पण अजून हा म्हातारा आला कसा नाही. तसा फारसा पीत नाही ना ?"
"नाय नाय" मास्तर कळवळत म्हणाले आणि
"पोराटोरांच्या कट्ट्यावर गेला तर ती बिचारी वयाचा मान ठेवून बिलं भरतात तेव्हा पितो" असं कोकणी खवचटपणाचं जोडवाक्य टाकलं .
"आज थत्ते चाचा आले असते तर नक्की त्यांनी कॉशसली ऑप्टीमिस्टीक बद्दल काहीतरी निर्णय दिला असता " विजूभाऊ म्हणाले. दोघांची अमदावादला भेट झाल्यापासून आपल्यात काहीतरी बदल झाला आहे असं त्यांना उगीचंच वाटत होतं.
"सालं नक्की सांगा बरं आय अॅम कॉशसली ऑप्टीमिस्टीक म्हणजे काय ?" डांबीसाने प्रश्न धसाला लावायचंच ठरवलं होतं.
"मला काय ते कळलं नाही पण मी वाक्यात उपयोग करू शकतो. " विजूभाऊ म्हणाले . "उदाहरणार्थ आय अॅम कॉशसली ऑप्टीमिस्टीक की एप्रील फळे ला पर्यावरणवादी बक्षीस मिळेल. "
"म्हणजे आय अॅम कॉशसली ऑप्टीमिस्टीक की धनंजय बहुजनांना समजेल अशी कविता लिहील."बिपीन अचानक माणसात येऊन म्हणाला.
"म्हणजे आय अॅम कॉशसली ऑप्टीमिस्टीक की तू माती पूर्ण करशील ."आदीती म्हणाली .
"म्हणजे आय अॅम कॉशसली ऑप्टीमिस्टीक की सगळ्यांना बुध्दीबळाचे लेख समजतील "-चतुरंग .
"म्हणजे जसं मर्ढेकर म्हणाले तसं की फुटेल वेडी आशा होती ."कॉनराड बाजूला ठेवत मुक्तसुनीत म्हणाला.
हात जोडत डांबीस म्हणाला " कळलं आता मला हे चॅनेलवाले काय म्हणतात ते .थोडक्यात "कॉशसली ऑप्टीमिस्टीक म्हणजे जे होणार नाही ते मला माहीती आहे पण ते व्हावं असा माझा भाबडा विश्वास आहे "
मोडकांनी चिंतन बैठकीत वाजवतात तशा टाळ्या वाजवल्या.
**************************************************************
अचानक मास्तरांचे डोळे चकाकले .उत्तेजीत होऊन ते म्हणाले "आय नो . ह्या म्हातार्याला कसं शोधायचं ? येतो म्हणून सांगतो आणि जिथे बसला असेल तिथून मिपावर लॉग -इन करतो हा म्हातारा .मग खरड पाठवली की सॉरी म्हणून पळत येतो. "
बिपीननी लगेच त्याचा लॅपटॉप काढून नेट जोडलं .क्षणभर पडदा चमकला आणि चारच वाक्य आली ..
फेटल एरर.../.नोड / १६३२/ ..../ पान सापडले नाही
कपाळाला हात लावत डांबीस म्हणाला "आय अॅम कॉशसली ऑप्टीमिस्टीक की नीलकांत लवकरच ह्या समस्येवर तोडगा काढेल."
वाचने
7458
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
बघा, शेवटी आमच्या
हाण तिच्या मारी!!!
In reply to हाण तिच्या मारी!!! by पिवळा डांबिस
मास्तरांना गप्प करणं मला शक्य नाही.
गमतीदार कट्टा
प्रतिक्रिया
रामदास आता पुन्हा भरघोस लिखाण
सलाम!
लई भारी रामदास काका.
हा हा हा.. छान छान.
+१
In reply to +१ by सहज
+२ "आय अॅम कॉशसली
In reply to +२ "आय अॅम कॉशसली by गणपा
रामदास काकांचा हा न्यु नॉर्मल
कॉशसली ऑप्टीमिस्टीक
In reply to कॉशसली ऑप्टीमिस्टीक by श्रावण मोडक
ही सगळी टाळकी खरंच एकत्र जमली
In reply to ही सगळी टाळकी खरंच एकत्र जमली by पिवळा डांबिस
खरं
ऑप्टि मिस्टेक
ऑप्टि मिस्टेक
यात म्हातारा कोण म्हणायचा ?
रामदासकाका,