मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बटर चिकन

Mrunalini · · पाककृती
साहित्यः चिकन (Boneless) - २ Chicken breasts कांदा - १ बारीक चिरुन टोमॅटो - ४ बारिक चिरुन काजु १ तास पाण्यात भिजवुन - १०-१२ दही - ४ चमचे आले-लसुण पेस्ट - ३ चमचे तिखट -४ चमचे हळद - २ चमचे गरम मसाला - २ चमचे चिकन तंदुरी मसाला - १ चमचा काळी मिरी पावडर - २ चमचे मोठी काळी वेलची - १ हिरवी वेलची - १ दालचिनी - १ छोटा तुकडा तेजपान - २ काळी मिरी - ४-५ लवंग - ४-५ जिरे - १ चमचा कसुरी मेथी - १ चमचा Fresh cream - ४ चमचे मध - २ चमचे बटर - ३ चमचे तेल - २ चमचे मिठ चवीनुसार कृती: १. चिकन धुवुन त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करावेत. २. चिकनला दही, १ चमचा आले-लसुण पेस्ट, तिखट २ चमचे, १ चमचा गरम मसाला, १ चमचा हळद, १ चमचा काळी मिरी पावडर, तंदुरी चिकन मसाला व चवीप्रमाणे मिठ घालुन १-२ तास marinate करावे. ३. चिकन १-२ तास मुरल्यावर ते Oven मधे भाजुन घ्यावेत. ४. दुसर्‍या कढई मधे तेल व बटर गरम करावे. त्यात सर्व आख्खा गरम मसाला टाकावा. ५. मसाला परतल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा टाकावा. ६. ते परतल्यावर त्या मधे आले-लसुण पेस्ट टा़कुन परतावे. ७. हे झाल्यावर त्या मधे हळद, तिखट, गरम मसाला, काळी मिरी पावडर टाकुन निट मिक्स करावे. ८. मसाल्याचे तेल सुटु लागल्यावर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो व भिजवलेले काजु टाकुन मिक्स करावे. ९. त्यात चवीप्रमाणे मिठ व कसुरी मेथीची पुड करुन टाकावी व गॅस बंद करावा. १०. आता ह्या तयार केलेल्या मसाल्याची मिक्सर मधे एकदम fine puree करुन घ्यावी. ११. ही puree गाळणी मधुन गाळावी. १२. कढई मधे बटर गरम करावे. त्यात गाळलेली puree टाकावी. १३. त्याला थोडी उकळी आल्यावर त्यामधे चिकनचे तयार केलेले तुकडे टाकावेत व झाकन ठेवुन १-२ मिनिट उकळी येउ द्यावी. १४. सर्वात शेवटी त्यात क्रिम व मध टाकावे. १५. तयार झालेले बटर चिकन प्लेट मधे काढुन, वरतुन क्रिम टाकुन गरम serve करावे. टिपः १. आवडत असल्यास चिकनचे तुकडे with bone घेउ शकता. २. मसाला मिक्सर मधे बारीक करण्या आधी त्यातुन काळी वेलची काढुन टाकावी. ३. ह्या डिशला मधामुळे एक वेगळीच चव येते. ४. आवडत असल्यास तुम्ही ह्यात लाल रंग वापरु शकता. ५. शाकाहारी लोक चिकन एवजी पनीर वापरु शकतात. butter chicken Butter 2

वाचने 8711 वाचनखूण प्रतिक्रिया 20

In reply to by नरेशकुमार

Mrunalini Wed, 05/11/2011 - 12:43
नाहि हो, मला नाही वाटत ही पाकृ भोपळा घालुन चांगली लागेल. आणि पाकिस्तानचे विचाराल तर, ते पण मला महित नाही. तुम्ही तिथे राहता का???

In reply to by Mrunalini

प्यारे१ गुरुवार, 05/12/2011 - 16:49
>>>>आम्ही फक्त बटर चिकन मधेच स्वर्ग गाठतो.. बटर चिकन खाऊन 'गाठाव्या लागणार्‍या जागेला' स्वर्ग म्हणतात काय??????? नवीन माहिती मिळाली. धन्यवाद. ;)

ajay wankhede गुरुवार, 05/12/2011 - 07:35
क्यालोरिज किती सांगाल काय? कारण आम्हि पण खाण्यासाठिच जगतो.

In reply to by शोनू

Mrunalini Fri, 05/13/2011 - 20:53
Oven पहिले २५० degree celcius ला १० मिनिटे preheat करावा. त्यानंतर त्याच temp. ला चिकन १५-२० मिनिटे भाजुन घ्यावे. ते भाजताना त्याला दर ५ मिनिटांनी बटर लावत रहावे. त्यामुळे चिकन dry होत नाही.