साहित्य : पिकलेले आंबे, पातेलं, कणभर मीठ
१. हात स्वच्छ धुवा.
२. बनियन काढा..वातानुकुलित घरात रहात नसाल तर कृती करायच्या मोसमात शर्ट घातला नसेलच..शर्ट असेलच घातलेला तर शर्ट काढून मग बनियन काढा..स्त्री वर्गाने एखादा जुना अॅप्रन चढवावा.
३. प्रत्येक आंबा जरासा पिळून देठाजवळील चिक काढून टाका..आणि मग पिळून रस पातेल्यात जमा करा.
४. काही मंडळी रस मिक्सरमधून काढतात..शप्पथ आहे तुम्हाला असे कराल तर..हातानेच रस एकजीव करा.
५. कणभर मीठ घाला..आंबे निवडताना फसले गेला नसाल तर साखर घालायची गरज नाही..जरा ढवळून घ्या.
६. काही मंडळी कोयी आणि साली दुधात धुवून वगैरे ते रसात घालतात..पण मी म्हणतो कशाला उगाच..रस काढल्याचा मेहनताना म्हणून कोयी आणि साली स्वतःच चोखुन चोखुन पार पांढर्या फट करुन टाका.
ताटात पोळ्यांचा ढीग (कोणी आयत्या गरम गरम करुन वाढणार असेल तर चांगलंच आहे) आणि वाटीत रस घेऊन बसा जेवायला..रसाचं पातेलं जवळंच ठेवा..संपवून उठा आणि झोपायच्या खोलीकडे प्रस्थान करा :D
कृती लेखकाने स्वतः केली आहे यावर विश्वास ठेवावा..पातेलं, आंबे, रस वगैरेचे फोटो सवडीने.
गुडनाईट इंडिया !!
वाचने
20341
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा हा... पा़कृ ची पद्धत
मृणालिनी सारखेच म्हण्तेय
In reply to हा हा हा हा... पा़कृ ची पद्धत by Mrunalini
फारच अवघड पाकृ आहे.
काही किंचित बदल सुचवते
रसयात्रा
+१
In reply to रसयात्रा by रामदास
निळ्याला आंबा आंबट
हीच
In reply to निळ्याला आंबा आंबट by Nile
शिकवलेलं कसं विसरतात ही मुलं..
आंबे पिळण्याचा फोटो टाकला
प्रकाश कशाला? अंधारच ठेवा. :D
In reply to आंबे पिळण्याचा फोटो टाकला by माझीही शॅम्पेन
रेसिपी खूप छान. त्यातलं. ४.
+१
In reply to रेसिपी खूप छान. त्यातलं. ४. by प्राजु
४. काही मंडळी रस मिक्सरमधून
In reply to +१ by गोगोल
एक पातेलं कसं चालेल? एक छोटं
या विकांताला नक्की....
या पेक्षा पुण्याला या,
नाव काढू नका दुर्वांकुरचं...
In reply to या पेक्षा पुण्याला या, by ५० फक्त
असो ... पुन्हा कालच जावुन आलो
In reply to नाव काढू नका दुर्वांकुरचं... by योगप्रभू
मस्तच..!
हि पाकृ आंब्याशिवाय कशी करता
हि पाकृ आंब्याशिवाय कशी करता
In reply to हि पाकृ आंब्याशिवाय कशी करता by परिकथेतील राजकुमार
रस्त्यावर अगदी स्वस्तात मँगो
In reply to हि पाकृ आंब्याशिवाय कशी करता by परिकथेतील राजकुमार
आमरसात मीठ ??
घालतात ना इलायची घातलेला रस
In reply to आमरसात मीठ ?? by सूड
आमरसात मीठ हे तर माझ्यासाठी नवलच आहे.
In reply to घालतात ना इलायची घातलेला रस by मुलूखावेगळी
अहो मालक मीठ म्हणजे भाजीत
In reply to आमरसात मीठ हे तर माझ्यासाठी नवलच आहे. by सूड
पुरणपोळी आणि आमरस...
In reply to अहो मालक मीठ म्हणजे भाजीत by प्यारे१
मालपुवा+बासुंदी? साष्टांग!!!
In reply to पुरणपोळी आणि आमरस... by योगप्रभू
पुरणपोळ्या करायलाच हव्यात
In reply to पुरणपोळी आणि आमरस... by योगप्रभू
भन्नाट बेत
In reply to अहो मालक मीठ म्हणजे भाजीत by प्यारे१
आमरसात मीठ हे कोयी धुताना
In reply to आमरसात मीठ हे तर माझ्यासाठी नवलच आहे. by सूड
मीठ
In reply to आमरसात मीठ हे कोयी धुताना by मुलूखावेगळी
खाल्लं मीठ
In reply to मीठ by सखी
सगळ्यात हाइट मह्न्जे मी
In reply to आमरसात मीठ हे कोयी धुताना by मुलूखावेगळी
इलायची हा शब्द ग्रामिन मराठी
In reply to आमरसात मीठ हे कोयी धुताना by मुलूखावेगळी
>>> रस काढल्याचा मेहनताना
जीवन सत्व
>>> सालींमध्ये बरेच जीवन सत्व
In reply to जीवन सत्व by सन्जयखान्डेकर
वा वा
हा हा हा
आमच्याकडे आमरसाबरोबर
गवसणीच्या पोळ्या म्हणजे काय
In reply to आमच्याकडे आमरसाबरोबर by जयंत कुलकर्णी
"रसाचं पातेलं जवळंच
नामी जोडी!
In reply to "रसाचं पातेलं जवळंच by पाषाणभेद
प्रकाटाआ
In reply to "रसाचं पातेलं जवळंच by पाषाणभेद
काय अट्टल पाक्रु आहे.
असा भरपुर सुगन्धी हापुस आमरस
जेवढ रस तेव्ढेच गावराण
In reply to असा भरपुर सुगन्धी हापुस आमरस by आचारी