अल्बनी ट्युलीप फेस्टिवल - २०११
ह्या वर्षी अल्बनी ट्युलिप फेस्टिवलचे ६३ वे वर्ष होते. गेल्यावर्षी पाऊस पडत असल्याने जाता आले नव्हते. ह्या वर्षी मात्र दोन्ही दिवस जाऊन मनसोक्त ट्युलिप्स पाहून घेतले.
थोडा इतिहास. जुलै १, १९४८ साली तत्कालीन मेयर Erastus Corning दुसरा ह्याने city ordinance द्वारे ट्युलिप हे अल्बनीचे अधिकृत फूल म्हणून घोषित केले. इतकेच नव्हे तर नेदरलँडची तत्कालीन राणी Wilhelmina of the Netherlands हिला विनंती केली की एखाद्या ट्युलिपला अल्बनीचे नाव द्यावे. तिनेही ह्या विनंतीला मान देत "Orange Wonder" ह्या ट्युलिपला अल्बनी ट्युलिप असे नाव दिले. ह्या प्रकारची ट्युलिप १८ इंच उंच वाढतात. ही इतरांच्या तुलनेत हळू वाढतात व काहीसे दुर्मिळ असतात.
पहिला ट्युलिप फेस्टिवल मे १४, १९४९ साली झाला होता. आजही परंपरा जपण्यासाठी तशाच प्रकारचे कपडे घालून आदल्या दिवशी रस्ते सफाई केली जाते व दुसऱ्या दिवशी Tulip queen घोषित केली जाते. मी ह्या दोन्ही गोष्टी पाहू शकलो नाही.
काही निवडक फोटो इथे डकवत आहे.
संपूर्ण अल्बम येथे पाहता येईल.
इतिहास विकीवरून घेतलेला आहे.
वर्गीकरण
जबरदस्त फोटोज! इथून जवळच
झकास रे....तुझं फेस्टिव्हलला
लई लई भारी फोटो लंबुटांग, मजा
जबरदस्त फोटूज
खुप सुंदर फोटो आहेत शेअर
२००९ मध्ये आम्ही गेलो होतो
सुंदर.
काय सुन्दर फोटो आहेत ... व्वा !!!
खूपच छान आलेत...
सुरेख आलेत फोटो.
अशक्य फोटो आहेत. खुपच सुंदर.
सगळेच फोटो एक नंबर आले आहेत.
In reply to सगळेच फोटो एक नंबर आले आहेत. by अनामिक
Kodak Z812 IS. DSLR नाही आहे
झकास
झकास फोटो !!
" इतना हसिन नजारा दिखाने के