माझ्या मुलीला धुळ्याहून नवी मुंबईत इयत्ता तिसरीत दाखल कारायचे आहे. मराठी माध्यमाच्या शाळेत. आम्ही गेले १० दिवस चांगली शाळा शोधतोय. मात्र, अतिशय निराश करणारा अनुभव हाती येतोय. एकतर भाराभार इंग्रजी शाळा आहेत. पालकांनाच इंग्रजी माध्यमात मुलांना घालायचेय मग आम्ही मराठी शाळा काढून काय माशा मारु, हा संस्थाचालकांचा प्रश्न उचित आहे. लहान शहरात चान्गल्या शाळेचा प्रश्न फारसा सतावत नाही. धुळ्यात जयहिंद शाळेत ती होती. आता नवी मुंबईत पनवेल्पासून ऐरोलीपर्यंत किंवा थेट ठाण्यातही आम्हाला चालेल. प्रवेश कसा मिळवावा हा नंतरचा भाग आहे, पण चांगली शाळा कोणती, हा गहन प्रश्न आहे. आम्ही साधारणतः काही शाळात तपास केला पण एकेका वर्गात तब्बल ७०-८० विद्यार्थी काही ठिकाणी तर १००सुद्धा! म्हणजे समस्या काय आहे की, आता बरेचसे पालक मराठी शाळेत मुलांना दाखल करु पाहतात. पण गेल्या ४ वर्षात इथे एकही नवी मराठी शाळा आलेली नाही. प्रवेशाला गर्दी वाढतेच आहे. महापालिका शाळांचा प्रश्नच नाही; तो भाग आपोआप गळतो. मग उरल्या सर्व शिक्षणसम्राटांच्या शाळा बरयाचशा विना अनुदानित. त्यात शिक्षकांना सेवक म्हणून २-३ हजारावर राबवणार. मग काय ते कप्पाळ शिकविणार? बरे मूळ शिकवणेच नाहीतर उपक्रमशीलता तर दूरचा भाग. विलासराव देशमुख, पतंगराव कदम, दत्ता मेघे, वळसे पाटील, डी वाय पाटील.. अशा दिग्गजांच्या शाळा आहेत. एक स्थानिक नेते रामशेठ ठाकूर यांची सीकेटी म्हणजे चांगा काना ठाकूर ही चांगली शाळा आहे पनवेलात जनार्दन भगत शिक्षण संस्थेची. महात्मा स्कूलही चांगले आहे. ऐरोलीत श्रीराम विद्यालय, मांजरा सुशीलादेवी विद्यालय, वाशीतील रयत संस्थेचे मॉडर्न स्कूल आणि फादर आग्नेल मराठी शाळा हे आवार, परिसर, स्वच्छता यावरुन आमचे हे ढोबळ मत आहे. मात्र आता खरोखरच चांगली शाळा म्हणजे जेथील मुलांना ट्यूशनची गरज नाही, मास्तर तशी सक्ती करीत नाहीत , ते स्वतः शिकवण्या घेत नाहीत, त्याना पूर्ण पगार दिला जातो... फळ्यावर लिहून मुलांना फक्त उतरवून घ्या असे सांगितले जात नाही तर मनन-चिंतन-लेखन, पाठांतर असे सारे केले जाते, शाळेला मोठे मैदान आहे, सिक्युरिटी आहे, टापटीप आहे, मैदानी खेळ खेळले जातात, अवांतर उपक्रम राबविले जातात वैगेरे वैगेरे.... लोकसत्ताने यासंदर्भात अनेक आर्टिकल्स दिलेत...
वाचने
4095
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
जवळच्या शाळेत घालावे असे माझे
माझ्या मुलीला धुळ्याहून नवी
>>बाब्बो, इतकि मोठ्ठी रिस्क.
In reply to माझ्या मुलीला धुळ्याहून नवी by नरेशकुमार
धाग्याचे प्रयोजन काय?
त्या शाळा त्यांना बाहेरून
In reply to धाग्याचे प्रयोजन काय? by पिवळा डांबिस
मग कठीण आहे!
In reply to त्या शाळा त्यांना बाहेरून by स्वानन्द
शक्य असल्यास
चांगला लेख.
मराठी शाळा
बेलापूरला ( कोकण भवन ) भारती