साहित्यः
पालकाची जुडी स्वछ केलेली
१०-१२ पनीरचे तुकडे
१ मध्यम कांदा बारीक चिरलेला
१-२ टोमॅटो गरम पाण्यात उकळून, सालं काढुन, मॅश केलेले
दीड टेस्पून आले+लसुण्+हिरवी मिरची पेस्ट (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
१ टेस्पून तेल+१ टेस्पून साजुक तुप
२ टीस्पून गरम मसाला
१ टीस्पून जीरे
मीठ चवीप्रमाणे
पाकृ:
उकळत्या पाण्यात पालक ५ मिनिटे घालून मिक्सर मधून फिरवून घेणे.
१ टेस्पून तेल किंवा तुपावर पनीर चे तुकडे सोनेरी रंगावर तळून घेणे.
जाड बुडाच्या पातेल्यात १ टेस्पून तेल+१ टेस्पून साजुक तुप घालून गरम करणे. (दोन्ही घातल्याने चव खुप छान येते)
त्यात जीरे घालून ते तडतडु देणे.
त्यात बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी रंग येईपर्यत परतणे.
त्यात आले+लसुण्+हिरवी मिरची पेस्ट घालून परतणे.
कांदा चांगला परतला गेला की त्यात मॅश केलेले टोमॅटो घालावे व सगळे एकत्र करावे.
त्यात आता गरम मसाला आणी मीठ घालून तुप सुटेपर्यत परतावे.
आता त्यात पालकाची पेस्ट घालून ७-८ मिनिटे शिजु द्यावे.
त्यात पनीरचे तळलेले तुकडे घालून ,गॅस बारीक करून २-३ मिनिटे शिजु द्यावे.
गरम-गरम पालक्-पनीर रोटी, चपाती बरोबर सर्व्ह करणे.
वाचने
12351
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा... एकदम सही.... पण नवरा
खल्लास!! लेकाची अतिशय आवडती
फोटु मस्त. पण पनीर जास्त आवडत
मस्त! मला पनीर तळायला नाही
बाकी पाक्रु वैग्रे सोडा ओ,
माझी आवडती भाजी. फोटो छान
मला पनीर तळूनच घातलेले आवडते
In reply to माझी आवडती भाजी. फोटो छान by पक्या
मी पनीर कधिच तळत नाही. तळले
In reply to माझी आवडती भाजी. फोटो छान by पक्या
?
In reply to मी पनीर कधिच तळत नाही. तळले by पर्नल नेने मराठे
सहमत
In reply to मी पनीर कधिच तळत नाही. तळले by पर्नल नेने मराठे
उत्तम पाककृती साठी धन्यु...
ब्लांच करणे
In reply to उत्तम पाककृती साठी धन्यु... by डावखुरा
ओ काका लय भारी पाककृती
In reply to ब्लांच करणे by चिंतामणी
लै भारी..
टारझन, चुचु आणि परा हे
परा????????????????
In reply to टारझन, चुचु आणि परा हे by प्यारे१
mast resepi
मला ही भाजी अतिशय आवडते.
मस्त पाकृ!
पालक पनीर
साजुक तूप पिवळे कसे काय?
आचारी असून असा प्रश्ण पडला???????
In reply to साजुक तूप पिवळे कसे काय? by आचारी
साजुक तूप
In reply to साजुक तूप पिवळे कसे काय? by आचारी