किल्ली हरविली
हरवली आहे एक किल्ली
मनाच्या कपाटात बंद केलेली गुपिते
ओरखडे न पाडता बाहेर काढणारी
हरवली आहे एक किल्ली
बंद केलेल्या कानांचे कुलूप उघडून
वादविवादात मूकपणे आक्रोशणारे सत्य ऐकणारी
हरवली आहे एक किल्ली
अपचनानंतर देखील उफ़ाळलेली भूक शमवून
दयेची कोठारे उघडणारी
हरवली आहे एक किल्ली
अन्यायाच्या वणव्यात विझलेली वाणी चेतवून
क्रांतीचा वणवा धडधडा बाहेर पाडणारी
हरवली आहे एक किल्ली
प्रौढत्वाच्या बेडयांमधे जखडलेले
शैशवाचे निरागसपण मुक्त करणारी
अशी गुरुकिल्ली हरवुन बसलो
मी digital lock वापरतो,
nice
क्या बात है!! सुंदर!