Skip to main content

ओसामा मारला गेला

लेखक माझीही शॅम्पेन यांनी सोमवार, 02/05/2011 08:52 या दिवशी प्रकाशित केले.
ओसामा मारला गेला आत्ताच आलेल्या वृत्तानुसार ओसामा बीन लादेन पाकिस्तान मध्ये इस्लामाबाद मध्ये मारला गेला आहे. मृतदेहाची DNA चाचणी करून अमेरिकेच्या संस्थानी कान्फर्मेशन दिला आहे. साधारणे तो एक आठवद्यापूर्वी मारला गेला असावा. थोड्याच वेळात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा प्रकाश टाकतील माझ्या मते एका दहशतीच्या युगाचा अंत झाला आहे , पाकिस्तानच्या धोंगीपणा सुध्डा उघड झाला आहे. जाणकारांची मते जाणून घ्यावीशी वाटतात. (चु.भु.द्या.घ्या)

वाचने 20550
प्रतिक्रिया 101

प्रतिक्रिया

In reply to by निनाद मुक्काम …

ओसामाच्या हत्येचे जगभर दूरगामी परिणाम होणार आहेत. १. सध्या ओसामाची अल-कायदा वर पकड असो वा नसो , त्याच्या हत्ये नंतर अमेरिका जे कोणी # २ ते ५ आहेत त्याच्यावर लक्ष द्यायला सुरूवात करेल खास करून आयमन अल-झवहिरी , एका वृत्तनुसार ओसामाला घडवण्यात त्याचा महत्वाचा हात होता. http://www.voanews.com/english/news/middle-east/The-Status-of-al-Qaida-… २. सध्या लिबीया मध्ये चालू असलेल्या अमेरिकेच्या भूमिकेवर प्रश्न-चिन्ह लागले आहे , एकीकडे इजिप्त मधील लोकशाही मर्गानी आंदोलन यशस्वी होत असताना लिबीयवर गडाफींवर हल्लासत्र सुरू केल्याने शेजारी राष्ट्र (सौदी अरेबिया) सावध झाले आहेत. ह्या मुळे ही राष्ट्र हळू हळु चीन आणि रशियाकडे वळू लागली आहेत. (व्यापार , तेलाचे करार इत्यादी ) इथे अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे गादाफफी कडे प्रचंड पैसा आहे , जे ओसामाचे झाले ते त्याचे केव्हाही होई शकते तर तो त्याचा पैसा अल-कायदा पुनुर्जिवित करण्यासाठी वापरु शकतो. ३. ओबमाना २०११२ मध्ये होण्यारा निवडणुकीत नक्कीच फायदा होईल. ४. जे अल-कायदा वा ओसामाला पाठिंबा देतात ते बदला घेण्यासाठी सज्ज होऊ शकतात.

चला जोन रेंब्मो चा आता नावीन चीत्रपट ज्यामधे रेम्बो लादेनला पाकीस्तानात जाउन कसा ठार मारतो हे बघायला ऊत्सूक.

लादेन कधी मेला , कसा मेला हे महत्वाचे नाही, पण तो मेला ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. त्यावर एवढी चर्चा होईल असे वाटले नव्हते. विशेषतः दिग्गु, तिस्ता अशा आणि अशासारख्या फडतुस व्यक्तिंना महत्व देण्याची गरजच नाही.

प्रत्येक चॅनेलवर काहीतरी वेगळं सांगत आहेत. कुणाच्या मते ओसामा तिथे पाच वर्षांपासून राहात होता तर दुसरे सांगताहेत की दीड वर्षं. आणि म्हणे गेले वर्षभर अमेरिका त्या ठिकाणी ओसामाच्या मागावर आहे. (अमेरिका इतके दिवस गप्प बसणं शक्य आहे??) ओसामाच्या घराच्या आकाराबद्दल आणि किमतीबद्दल पण असेच चालू आहे. भरीस भर म्हणून एका ठिकाणी एक बायको आणि मुलगा अटक केल्याचं दाखवतायत तर लगेच दुसरीकडे दोन बायका आणि चार मुलं म्हणे!!!! आणि या सगळ्यात त्या जुन्यापुराण्या फोटोशॉप्ड फोटोचं दळण आहेच. नक्की बातमी काय आहे हेच कळेनासं झालंय. बरं, एवढं सगळं होऊनही ओसामा मेल्याचा दृश्य पुरावा (फोटू/व्हिडिओ असलं काहीही) नाही. सद्दामला जगासमोर फाशी देणार्‍यांनी ओसामाला असा कसा काय समुद्रात सोडला? (हे ऐकताना उगीच एमटी आयवा मारू मधल्या जलसमाध्या आठवल्या. पण जहाजावरच्या लोकांसाठी जलसमाधी अभिमानाची बाब असते. पण ओसामाचं काय?)

अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणुक कधी आहे म्हणे? क्यांपेनिंग कधीपासून सुरू होतंय ते?

ओसामा मारला गेला,हे तर चान्गलेच झाले.पन हा १का युगाचा अन्त नाहि,तर हा दहशतवादातल्या चालु प्रवाहातल्या फक्त एका प रिनामाचा अन्त आहे...व्यक्ति गेलेलि आहे,विचार अजुन जायचा आहे...हे आपन ध्यानात थेवलेले बरे.

धन्य ते राष्ट्रपती..व धन्य ती जनता.. ओसामाला पाक अफगाण सीमेवर शूर सैनिकांनी कंठ स्नान घातले व या नरा धामाला व मानवतेच्या शत्रूस यम सदनास पाठवले.. सारी अमेरिकन जनता आनदाने बेहोष होवून रस्तावर नाच ताना दिसली.. राष्ट्र तेज व गौरवासाठी असे करावे लागते..तरच राष्ट्र जिवंत रहाते.. भारतीयाना असा आनंद राज्य कर्ते अनुभवायास देतील का? .... का कासाबास व गुरूस बिर्याणी भोजन आनंद देत रहातील

ओसामा मारला गेला बर मग? अशी मिपा ब्रांड प्रतिक्रीया नसल्याचे पाहून डवॉले पाणावले.

In reply to by चिरोटा

मान्य. "कोण ओसामा? " ही सुद्धा मिपा ब्रांड प्रतिक्रीया आहे.

In reply to by चिंतामणी

पण काही मिपा ब्रॅण्ड प्रतिक्रिया (कसाब-अफजल-बिर्याणी) पाहून मिपाकर अगदीच वाया गेले नाहीत याची खात्री पटली. :)

हॅ हॅ हॅ आमाला हे असं व्हनार याची आधीच खबर व्हती. त्याचमुळं आमी हे (http://www.misalpav.com/node/17849) एक दिवस आधीच लिवेल व्हतं. फकस्त ओबामा म्हनालं व्हतं की 'बाबारे सांभाळून लिही. काही गुप्त भाषेत लिहीले तर बरं'. बाकी काय नाय बाबा. मस्त चाललयं आमचं.

In reply to by पाषाणभेद

आत्ता मी हीच प्रतीक्रीया कवीतेखाली लीहणार होतो की ती कवीता तूम्ही लादेनला डेडीकेट केली आहे काय म्हणून :)

ओ...नवीण ऐकलं का? 'ऊस-आंबा' झाडावरून पडला म्हने ....पडला म्हंजी पाडला....दादा म्हंत्यात, आपल्या शेजारच्यांच्याच झाडावर व्ह्ता त्यो!

काही शंका... १. ओसामा पाक मिलीट्री अकादमी १०० मी वर रहात होता.(म्ह्णजे घटना स्थळ). रात्री १ वा कवायत चालू झाली. झालेले स्फोट ६ किमी वर ऐकु गेले.(संदर्भः सोहेब आथर चा लाईव्ह ब्लोग) २. पण पाक मिलीट्री अकादमी १०० मी वर असून आंधळी न बहीरी?? ३. आलेले हवाई जहाज पाकिस्तानी नाही... हे सामान्यांना माहिती पण पाक लष्कराला नाही..?? परदेशी विमाने आल्याची माहिती देणारी यंत्रणा नाही...?? (हे शक्य आहे का गवि, एन्लाईट्न अस...) ४. ढोबळ पणे सांगता येईल की... ओबामा ने झरदारीचे नाक दाबून ओसामाचा पत्ता साफ केला. पाक चा नकार वगैरे सर्व फालतूपणा आहे.

In reply to by विकाल

अगदी हाच मुद्दा पाकिस्तानी कुटतज्ञ प्रसार माध्यमांत विचारला गेले . मूळ प्रश्न हा आहे .की नक्की विमान कुठून आले ( अफगाण किंवा पाकिस्तान ) हा प्रदेश उडान मुक्त असल्याने ही विमाने तेथे उडालीच कशी ( एक तर्क असा आहे की अमेरिका म्हणते त्या प्रमाणे त्यांची कारवाई पाकिस्तानी सरकारला माहीत नव्हती .पण जेव्हा ही तीन विमान त्या भागात आली तेव्हा त्याबद्दल काहीच हालचाल पाकिस्तान कडून कशी नाही झाली .) ओबामा म्हणतात एकाही अमेरिकन मृत्यू झाला नाही मग ३ पैकी एक विमान खाली पडले त्याचे काय ?( कहर म्हणजे ते म्हणतात की ते दुर्घटना ग्रस्त झाले ) सद्दाम ह्यांचे पकडणे व फाशी हे जगासमोर अमेरिकेने दाखविले प्रभाकरन चा मृत देह दिसला . मग लादेन चा दाखवायला काय समस्या होती . पाकिस्तानमधील कट्टर पंथीय खुद्द शुजा पाशा व किंवा कयानी ह्यांची अजून अधिकृत विधान केले नाही आहे . त्यांना आपण काय पवित्र घ्यायचा ह्याबद्दल साशंक आहे . बाकी देवीस च्या प्रकरणाचा ह्या च्याशी नक्की संबन्ध आहे . माझ्या मते आय एस आय ने स्वतः ला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर होऊ नये ह्या साठी लादेन ला सी आय ए च्या हवाली केला ( आमच्या कडील अरब आज पाकिस्तानी सरकार खोटे बोलत आहेत .त्यांच्या मदतीशिवाय शक्यच नव्हते. असे म्हणत होते .) थोडक्यात शुजा पाशा अमेरिकेत लादेन चा पत्ता देऊन आले ह्या सर्व प्रकरण मला माया डोळस च्या इन कौन्तर सारखे वाटते . डी चा डोक्यावर हात होता तेव्हा माया मुंबईत बिनधास्त फिरत होता .मात्र तोच हात त्यांच्या डोक्यावरून उचलल्या गेला आणी अर्धे पोलीस दल लोखंड वाला कोम्प्लेस मध्ये पोहोचले .

परदेशी विमाने आल्याची माहिती देणारी यंत्रणा नाही...?? (हे शक्य आहे का गवि, एन्लाईट्न अस...) आलेले विमान आपले आहे की नाही हे जाणणारी उपकरणे समजा तिथे नसतील तरी त्या विमानाने नेहमीची आवश्यक रेडिओ फ्रीक्वेन्सी ट्यून केलेली नसेल आणि ते विचारलेल्या प्रश्नांना काहीच उत्तर देत नसतील किंवा समाधानकारक उत्तर देऊ शकत नसतील तर बाय डिफॉल्ट ते घुसखोरच समजले जाते. शिवाय साध्या पॅसेंजर किंवा शिकाऊ विमानालाही फ्लाईट सुरू करण्यापूर्वी देशाच्या डिफेन्स विभागाकडून एक क्लिअरन्स नंबर मिळवावा लागतो. तो नंबर ते रेडिओवर सांगू शकले नाहीत तर ती फ्लाईट अन ऑथराईझ्ड ठरतेच. याउपर तिथल्या लष्करी किंवा हवाईदलाच्या तळाला काहीच माहिती नसेल तर त्यांची धन्य.

In reply to by गवि

हेच आता पाक प्रसार माध्यमांत सांगत आहेत .व एक तर्क असा आहे की ३ पैकी एक विमान पडले ते पाकिस्तानी सैन्याने पाडले .( पण हे अमेरिका व पाकिस्तान ने कबूल केले तर लादेन ला पाकिस्तान संरक्षण देत होते हे सिद्ध होईल व पुढच्या ५ वर्षात अमेरिकन सैन्य माधारी येणार आहे तेव्हा पाकिस्तानी मदत अमेरिकेला दुर्लभ होईल कारण अमेरिकेत पाकिस्तानच्या विरुद्ध असंतोष निर्माण होईन .) आता त्यांना अशी भीती वाटत आहे .की अमेरिका अश्याच पद्धतीने त्यांचा अण्वस्त्र तळ उध्वस्त करेन .

हेच म्ह्णायचं आहे .....!! पाक च्या संमतीनं हे झाल आहे.. अन यात ओसामा नजर्कैदेत असण्याची शक्यता अधिक...!!

पाकिस्तानला अमेरिकेच्या हल्ल्याची माहिती नसावी हे खरं वाटत नाही. झरदारीबाबांनी आज तशी कबूली दिलीय पेपरात तरीही खोटं वाटतं. ओसामाला मारल्याचा सूड म्हणून तालिबान आणि इतर अतिरेकी पाकिस्तानवर निशाणा साधतील म्हणून असावं हे. त्या कंपांउंड मधे काही लोकांना पकडलं गेलय आणि ते पाकिस्तानी सरकारच्या ताब्यात आहेत म्हणे. ओसामा शिवाय मारल्या गेलेल्या लोकांचे मॄतदेहही तिथेच असावेत.

तुर्तास पाकिस्तानची अवस्था "धरल तर चावतय आणि सोडल तर पळतय "अशी झाली आहे.....ओसामावर अमेरिकेद्वारा केल्या गेलेल्या हल्ल्यात पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांचा सहभाग होता हे उघडपणे मान्य केले तर इस्लामी कट्टरतावाद्यांच्या असंतोषाला सामोरे जावे लागेल ... हे टाळण्यासाठी सध्या बिचार्‍यांची तारेवरची कसरत सुरु आहे........पाकिस्तान अवघ्या जगासाठी डोकेदुखी ठरलाय हे आता तरि जागाच्या लक्षात आले असावे....पाकिस्तानला कुठल्याही मार्गाने पुरवली जाणारी आर्थिक रसद पुर्णपणे बंद करणे .. व महत्वाच्या देशानी सगळे संबंध तोडणे हा एकच पर्याय पाकिस्तानला धडा शिकवण्यास उरला आहे....

पूर्ण नाव ओसामा बिन मोहम्मद बिन अवाद बिन लादेन. वडिल मुहम्मद बिन लादेन हे ऐश्‍वर्यसंपन्न उद्योगपती आणि सौदी राजघराण्याशी संबध असणारी बडी असामी होते. ओसामाने अर्थशास्त्र आणि व्यापाराचे शिक्षण घेतले.पण त्याची खरी आवड होती ती धर्म आणि तत्त्वज्ञ. प्रारंभी कुराण आणि मुख्यत: जिहाद या संकल्पनेचे विश्‍लेषण करण्यावर ओसामाने आपले लक्ष केंद्रित केले. तो प्रतिगामी असल्यामुळे जगात शरिया या इस्लामी कायद्याचे पुनरुज्जीवन आणि लोकशाही, कम्म्युनिझम, सोशॅलिझम किंवा इतर कुठल्याही गोष्टि मानत न्हवता अशा विचारप्रणालीला विरोध करणे हेच ओसामाच्या जिवनातील प्रमुख सूत्र होते. जगात अफगाणिस्तान हे एकमेव मुस्लीम राज्य असल्याचे ओसामाचे म्हणणे होते. इस्त्राइलच्या निर्मितीला विरोध आणि इस्त्राइलला पाठिंबा देणाऱ्या अमेरिकाशी युद्‌ध हेच त्याच्या जीवनाचे मुख्य ध्येय बनले होते. आत्यंतिक धार्मिकतेकडे झुकणाऱ्या त्याच्या या विचारसरणीने ओसामा तालिबानींचे स्फुर्तीस्थान बनला होता,रशियन कम्म्युनिझमला विरोध करण्यासाठी जन्माला आलेल्या विविध संघटना अल-कायदामध्ये विसर्जित करून ओसामा जगभरातील दहशतवाद्यांचे स्फुर्तीस्थान बनला होता. त्या नंतर त्याने ९/११ घडवुन आणले.. ओसामा बद्दल विस्त्रुत माहिती साठी खाली लिंक उपलब्ध आहे. http://lekhsangrah.wordpress.com/2011/05/03/%E0%A4%93%E0%A4%B8%E0%A4%BE… असाच एक क्रुर धर्मवेडा एडॉल्फ हिटलर, जर्मनी देशाचा हुकूमशहा.नाझी पक्षाच्या या नेत्याचे नाव त्याच्या क्रूरपणा व ज्यूंच्या बेसुमार कत्तली यामुळे इतीहासात नोंद झालेले आहे आता यात लादेनची भर पडली आहे. अमेरीकेने अटक करून फाशीची शिक्षा देण्यात आलेला इराकचे माजी राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांच्या थडग्याला त्यांच्या अनुयायांनी पवित्र क्षेत्रा सारखे महत्त्व दिलेले आहे. तसा प्रकार पुन्हा होऊ नये यामुळे लादेन सारख्या अतिरेक्याचे अनुयायी/ समर्थक त्याचं 'पवित्र स्मारक' उभारतील आणि त्याला जिहादच्या नावावर अल्ला साठी शहीद बनवितील ते ठिकाण 'पवित्र जागा' किंवा 'तीर्थक्षेत्र' बनू नये या भीतीपोटी ओसामा बिन लादेनच्या मृतदेहाचे दफन सोमवारी सकाळी इस्लामी परंपरेनुसार? समुद्राच्या तळाशी केले / का मृतदेह समुद्रात वहावला, ते अजुन कळले नाहि या अंत्यविधीचा तपशीलवार वृत्तांत उपलब्ध होऊ शकलेला नाही.अमेरिकन सरकारने लादेनचे दफन समुदाजवळ केले, एवढीच माहिती मिळतेय. लादेनचा मृतदेह स्वीकारण्यासाठी कोणत्याही देशाचे सरकार पुढे येणे कठीण असल्यामुळेही असे करण्यात आले असावे, पण त्याला दफन करायला २-गज जमीन हि मिळू शकली नाहि हि शोकांतिका मात्र नक्कीच,का ती तशीमिळू द्यायची न्हवती? असंही असेल. यातुन आपला देश काहि शिकनारे कि नाहि??? साला आपले सर्वच राज्यकर्ते हे भेकड राज्यकर्ते, तिकडे पाकिस्तानात गिलानी/जरदारीला हे कसले पुरावे पाठवतात?? का नुसतीच लवलेटर्स पाठवतात हे त्यांनाच माहित, नाही कारण तिकडुन नेहमी नकारच येतो हो =) आणी नुसत्या मुळमुळीत चर्चा..साला अमेरीकेने तर त्याला त्यांच्याच घरात घुसून मारलं... आणी यांनी.. त्या अफजलगुरु/ कसाबला घर जावईच करुन घेतलयं.. कसाब ला बिर्याणी,उर्दू पेपर,टीवी.अशा सुविधा मग तो शिक्षा तरी कसली भोगतोय? अमेरिकेने ओसामा ला शोधण्यासाठी १० वर्षे जंग जंग पच्छाडलेय लाखो डॉलर्स खर्च केले पण शेवटी देशाच्या शत्रुला कंठस्नान घातलेच आणि आमच्या देशात शत्रू हातात असूनही त्याला घरजावई करुन त्याचे लाड पुरविले जात आहेत. ११ फाशीच्या केसेस पेंडिंग आहेत (किती वर्षे माहीत नाही ) आणी सगळे सोपस्कर झाले राष्ट्रपतिंची स्वाक्षरी हवी आहे ते करायला त्यांच्याकडे वेळ नाही. हो पण त्या ससाबाच्या मयताला जायला (फोटो काढुन घ्यायला) वेळ आहे.ते देश-हिताच काम. बाकीचे राज्यकर्ते ( देश हिताचे ) घोटाळे करण्यातच खुप बिझी आहेत. . आणी आपले राज्यकर्ते प्रत्येक हल्ला / बॉम्बस्फोटांची पुण्यतिथी/ आणी शहिदांना श्रध्दांजली साजरी करण्यातच धन्यता मानत आहोत... आता अजुन एका पुण्यतिथीची भर पडली म्हणायची .......!!

http://navbharattimes.indiatimes.com/articleshow/8157596.cms सदरच्या दुव्यावरील बातमी वाचली आणि अंमळ जीव सुखावला पण क्षणभरच,लगेच भानावर आले कारण हे असले काही करावयाचे असते हे आमच्या भ्रष्टाचार करण्यात व हुजुरेगीरी करण्यात धन्यता मानणार्‍या नेत्यांच्या ध्यानी मनी स्वप्नी देखिल येणार नाही....

ओसामाचा आदराने ओसामाजी असा उल्लेख करणारे तसे कमीच असतील (संख्येने आणि डोक्यानेही!). नाही म्हणायला सुधीरजी काळेजीही न चुकता ह्या नराधमाचा अनेकवचनी उल्लेख करून त्याला नको इतक्या उंच पातळीवर नेत आहेत. ह्या सैतानाची खरी पातळी पाताळात आहे आणि सध्या तो तिथेच पडिक आहे. असो. काँग्रेसच्या मुस्लिम लांगूलचालनाच्या लांबलचक परंपरेला जागून दिग्विजयसिंगाने ओसामाचा ओसामाजी असा उल्लेख केला. त्याला मुस्लिम धर्माच्या रितीनुसार दफन न केल्याबद्दल माफक अश्रूपात केला. आता बोंबाबोंब झाल्यावर मी असे म्हटलोच नव्हतो. माध्यमांनी विपर्यास केला. हे त्यांचे वैयक्तिक मत आहे वगैरे नेहमीचे यशस्वी वाक्यप्रयोग होतीलच. पण ओसामाची बाजू घेतल्यामुळे मुस्लिम व्होट बँक खूष होते असे वाटणे आणि असे असेल तर तसे असणे दोन्ही अत्यंत घातक आहे. खुद्द ओसामा दिग्विजयसिंग आणि अगदी माता सोनियाच्या धर्माबाबत फार सहिष्णू नव्हता. निदान हे तरी लक्षात यायला हवे. ओसामाच्या साग्रसंगीत अंत्यसंस्काराबाबत जागरुक असणारे ९/११ जळून खाक झालेल्या लोकांबद्दल इतकीच कणव दाखवतील का? बातमी http://72.78.249.107/esakal/20110506/4857755358367623478.htm सामनाचा संताप http://www.saamana.com/2011/May/06/agralekh.htm

In reply to by हुप्प्या

अतिशय चांगला मुद्दा मांडलात दिग्विजय सिंगान्सारखे बिनडोक नेत्याने लादेनच्याच बरोबर जल-समाधी दिली पाहिजे ! मला पूर्ण खात्री आहे की हाय-कमांडच पाठिंबा असल्याशिवाय हा माणूस वारंवार अशी विधान करणार नाही अवांतर : - बाकी मी सध्या भारतात नसल्याने कोणी काय तारे तोडताय ते जाणून घ्यायला आवडेल :)

In reply to by माझीही शॅम्पेन

हामरिक्केत असाल तर ९:३० पीएम ईएसटी ते १०:३० पीएम ईएसटी ला डीडी न्युज बघत जा, बातम्या सगळ्या असतात आणि सगळ्या मुख्य वर्तमानपत्रांचा आढावा असतो. (त्यानंतर उर्दु आणि संस्कृतमध्येही बातम्या असतात दहा दहा मिनिटे.)

In reply to by आनंदयात्री

सध्या मुक्काम काही दिवसांचाच आहे , हे असे "तारे" डिडी वर बघण्यापेक्षा बरेच रोचक :) कार्यक्रम पाहतोय !!!

पाकिस्तान चे आजुन विभाजन होत आहे.. वजिरिस्तान आधी पासुनच तालिबान च्या हाताशी आहे तसेच अख्ख्या पाकिस्तानात शिया आणी सुन्नी वरुन होणार्या चकमकी ज्याला आता नजिकच्या काळात तरी अंत दिसत नाही. तसेच पाकिस्तानच्या मिल्ट्रीची द्विधा मनस्थिती... त्यामूळे पाकिस्तान चे आजुन विभाजन शक्य आहे असे दिसते.. नुकताच चीन ने अमेरिकाला दम भरला अशी बातमी होती.. पण पाकिस्तान चे विभाजन करुन आणी त्यांच्यात न मीटनारी भांडने लावुनच अमेरिका तिथुन काढता पाय घेईल.. (ब्रिटीश लोकांनी तसेच केले ना.. आणी त्यांना साथ द्यायला आपल्या देशातील ऊगाच महात्मा झालेले गांधी आणी नेहरु आहेतच :( ) बादवे १९९७ साली ब्रिटेन ची राणी भारतात बिना व्हिसा आली होती कारण तिचे म्हणने होते की ती आपल्याच प्रांतात येत आहे :( आणी अर्थातच आपल्या षंढ सरकारने ह्याबद्दल काहीच केले नाही ..

In reply to by किशोरअहिरे

ब्रिटीश लोकांनी तसेच केले ना.. मला ब्रीटीशांनी नक्की काय केले असं तूम्हाला म्हणायचय हे जाणून घ्यायचे आहे.