Skip to main content

सुट्टीच्या दिवशी मी पुढील कृती करणे सर्वाधिक पसंद करतो/करते.

लेखक शुचि यांनी मंगळवार, 03/05/2011 00:21 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 2131
प्रतिक्रिया 41

प्रतिक्रिया

"क्वालिटी टाइम" ला मत दिले आहे. क्वालिटी टाइम = आनंदी वेळ ..... कोणतीही एकत्र "अ‍ॅक्टीव्हिटी" हा खूप आनंदाचा वेळ असतो. उदाहरणार्थ - मॅन्युअल कार-वॉश, घराची साफ-सफाई, सूप बनविणे किंवा एकत्र एखादी "अर्थ" सारखी नॅशनल जिओग्राफिक सिरीज पहाणे. असे क्षण खूप आनंददायक असतात

In reply to by शुचि

इथे मल्टीसलेक्ट हवे. एकच गोष्ट सर्वाधिक पसंत आहे असे होते का ? जसे दोन आठवडे क्वालिटी काल व्यतित केला तर एक आठवडा वाचणे जास्त आनंददायी ठरेल.

In reply to by आनंदयात्री

मल्टीसिलेक्ट चे बरेच काँबिनेशन्स होतील. शिवाय सगळेजण सगळं हवं असच म्हणतील :). म्हणून त्यातल्या त्यात पर्याय न देता कल आजमविण्याचा प्रयत्न. _____________________________________________ खूपदा मी परिचीतांना विचारते - कोणता रंग आवडतो? बहुसंख्य लोक उत्तर देतात - सगळेच आवडतात किंवा काहीजण म्हणतात "डिपेंड्स" कोणती वस्तू आहे त्यावर अवलंबून आहे. पण माझा उद्देश असतो तुम्ही त्या विशिष्ठ काळाच्या चौकटीमध्ये , परीस्थितीमध्ये कोणत्या रंगाकडे आकर्षित होता? आणि माझ्या स्वतःच्या नीरीक्षणानुसार " it tells quite a bit." ____________ तद्वतच आता या क्षणी तुम्हाला काय हवहवसं वाटतं आहे - अमेरीकेत "मेमोरीअल डे" लाँग वीकेन्ड येतो आहे. भारतात अक्षय त्रुतियेची सुट्टी येते आहे. तुम्हाला काय करावेसे वाटते आहे? Talk for near future.

In reply to by शुचि

अच्छा, तर मग तुम्ही या विदाचे वैज्ञानिक विष्लेषण करणार आहात काय? की 'दररोज २ औंस साखर खाल्याने मधूमेह होत नाही - अमेरीकन संस्थेचा निष्कर्ष', 'जगात २०% (किंवा कितीतरी टक्के (कोण जातयं मोजायला!) पुरूष घरकाम करून ऑफीसात झोपा घेतात - ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापिठाचे संशोधन)', 'महाराष्ट्रातील एका दोन क्रमांकाच्या शहरात ३.14159265358979323846264338327950288419716939937510 % लोक थापा मारत नाहीत - सिंबॉयसीस कॉलेजच्या सायकॉलॉजी डिपार्टमेंटच्या विद्यार्थांचे संशोधन' आदी प्रकारच्या निष्कर्षासारखे करणार आहात? क्र. १ ला मत दिले आहे.

In reply to by पाषाणभेद

सध्या मला सुट्टी हा प्रकार दर १५ दिवसांनी मिळतो .. त्यामुळे त्या दिवशी काय करायचे हा विचार करण्यातच सुट्टी संपते :)

In reply to by शुचि

रंगाबद्दल मी सांगू शकेन. अगदी कॉलेज संपेपर्यंत मला लाल रंग आवडत असे. नंतर हिरवा आवडायला लागला. ते सगळ्यांना समजलं आणि हिरव्या रंगाचे सत्राशेसाठ कपडे आणि वस्तू आहेरात आले. खरं सांगायचं तर साधारण २० हिरवी पंजाबी मटेरियल्स. १० हिरव्या साड्या. वस्तूंवर जिथे हिरवा रंग शक्य आहे तिथे हिरवा निवडून, त्यासाठी कुठल्या कुठल्या दुकानात फिरून गोळा केलय म्हटल्यावर भेट न स्विकारणं चांगलं दिसत नाही. शिवाय माझी नणंद आवर्जून हिरवे कपडे घेऊन ठेवते आणि पाठवते. सध्या मला काळा आणि हस्तीदंती रंग आवडतोय. हिरव्याच्यावेळची चूक मी यावेळी केली नाही. कोणालाही रंगाच्या आवडीबद्दल सांगितलं नाही तरी भारतातून येताना मैत्रिणींनी तीन काळे ड्रेसेस आणलेत. शिवाय मी तीन काळे पांढरे आणलेत (आधीच). आता माझी कोणत्याही रंगाची आवड (कलर या अर्थी) लवकरच संपेल असं वाटतय.

In reply to by रेवती

मला हिरवा रंग त्या पाकड्यांचा म्हणून आवडत नाही :( आधी लाल आवडायचा आता गुलाबी आवडतो. "मेलो"(ईंग्रजी) झालीये आवड.

In reply to by शुचि

रंगाचे म्हणाला तर मला कोणीही कधीही विचारले तरी ब्लॅक रंग आवदतो असेच उत्तर असते माझे ... बाकी वेगवेगळ्या गोश्टींसाठी वेगळा कलर हे आलेच. अगदी ब्रश ला पण मला ब्ल्यु कलरच हवा असतो ... पण हिरवा पाकड्यांचा रंग आहे म्हणुन आवडत नाही . हे वयक्तीक असले तरी आवडले नाही. ब्लॅक नंतर स्त्री सर्वात सुंदर दिसत असेन तर हिरव्या आणि हिरव्या छटा असलेल्या ड्रेस आणि साडीमध्येच.. पावसाळ्यात किंवा गर्द धुक्यात हिरवा, बॉटल ग्रीन. लेमन मिश्रीत हिरवा हे कलर खुपच प्रसन्न वाटतात कपड्यांवर.. भारताच्या झेंड्यावर ही हिरवा रंग असतो .. निसर्ग हाच मुळी हिरव्या रंगावर जीवंत आहे ..

In reply to by धमाल मुलगा

अगदी हेच लिहिणार होते मी. खरंतर प्रतिक्रिया वाचायला सुरूवात केली तेव्हा वाटलं की रेवतीताई रंगाभाऊजींबद्दलच सांगत आहेत की काय ;)

In reply to by धमाल मुलगा

काय रे बाबा! आजकाल काही बोलायची सोय राहिली नाही.;) प्रतिसाद टंकल्यावर माझ्या ते लक्षात आलं पण त्यावेळी मिपा सारखं बंद पडत होतं म्हणून आहे तसा प्रतिसाद पाठवला.

वरील सर्व आलटून पालटून करतो... :)

क्र. २ला मत दिले आहे. एकापेक्षा जास्त पर्याय निवडता यायला हवे होते. घराची स्वच्छता, साठून आलेलं कोणतंही काम हे दर विकांताला नसतं..........शिवाय वेगवेगळ्या वयात जबाबदार्‍याही वेगवेगळ्या असतात. मला आता कितीही पांघरूणात गुरफटून झोप म्हणून सांगितलं तरी ते जमणार नाही. सगळी कामे डोळ्यासमोर फेर धरून नाचायला लागतात.;)

कुटुंबियांबरोबर "क्वालिटी टाइम" घालविणे
मी आनी मिसेस मस्त बाहेर फिरायला जातो. आनि वेळ उरल्यास घरकामात मदत करतो. मित्र वगेरे काय, त्यांना विकडेजला सुद्धा भेटता येतेच की !

काय करणे "पसंद करतो" आणि (प्रत्यक्षात) "काय करतो" या गोष्टी लग्न झाल्यापासून दोन धृवांइतक्या वेगळ्या बनल्या आहेत. शिवाय आमच्याकडे काय पसंद "करतो" आणि काय पसंद "करते" यातही हजारेक किलोमीटरचा फरक आहे. जाऊ दे.

सुट्टीच्या दिवशी सकाळी सकाळी लवकर उठून कुठल्यातरी किल्ल्यावर, कुठल्यातरी लेणीवर वा कुठेतरी निसर्गरम्य परिसरात मस्त भटकायला आवडते. हे एखाद्या वेळी जमले नाहीच तर पुस्तक वाचण्यात वेळ कसा जातो ते कळत नाही.

मला गाजर हलवा फार आवडतो .. सुट्टीच्या दिवशी मी आवर्जुन करतो . आजवर पाकृ टाकली नाही इतकंच .. आपलं गुपचुप काम असतं :) - ( गुपचुप पाकृ करणारा) शेफु टारझन

हे सगळेच पर्याय आवडते आहेत आनि वर दिलेल्या क्रमानीच आवडत्तात. :) पन ऑफीसचे काम हा पर्याय सोडुन

सर्वात जास्त आनंद मला पर्याय १ मध्ये दिलेल्या गोष्टीमधुन मिळतो --- पांघरूणात गुरगुटून झोपणे आणि मस्त उशीरा उठणे आणि यामुळे आईचे खुप बोलणे ऐकतो मी कायम [:)] मित्र-मैत्रीण आणि छंद हे नंतर च्या क्रमाने आवडते. घरी वेळ देणे हे त्या नंतर अआणि ऑफिस चे काम अजुन पर्यंत मी कधीच सुट्टीला करत नाही ... [:)]

व्यवसाय क्षेत्र पत्करल्याचा एक फायदा असा झालाय, की मला वरील सर्व पर्यायातील काही ना काही तरी रोज करायला मिळतेच. पण याचा अर्थ मला रोजच सुटी असते, असा नाही. कारण व्यवसाय म्हणजे २४ तासांची नोकरी.

'पांघरूणात गुरगुटून झोपणे आणि मस्त उशीरा उठणे ' ला मत दिलं आहे...हे करायला प्रचंड आवडेल पण गेले वर्षभर तरी जमलेलं नाहीये, उलट सुट्टीच्या दिवशीचं टाइमटेबल खतरनाक असतं..

क्वालिटी टाईमला मत दिले आहे. कारण आता गिरीभ्रमण संपले आहे, नाहीतर त्यालाच पहिले मत दिले असते.

मत छंदाला दिले आहे. पण अर्थातच छंद जोपासणे वगैरे सगळं पांघरुणात गुरफटून उशीरापर्यंत झोपण्याचा वगैरे 'क्वालिटी टाईम' पुर्ण झाल्यानंतर. :D संध्याकाळची लवकरची वेळ बायको अन पोरासाठी (बायको'ज शॉपिंग मुर्दाबाद! पोराचं बागेत हुंदडणं झिंदाबाद!) तर उशीराची संध्याकाळ ते कट्टा पांगेपर्यंत रात्री कधीहीपर्यंत ही टोळभैरवांसोबत शुध्द उनाडक्या करण्यासाठी राखीव असते. आता राहिलं काय? हापिसचं काम तर बोंबलायला कामाच्या दिवशीही करत नाही, तर सुट्टीदिवशी काय डोंबल करणार आम्ही? आणि घरकामात मदत, स्वयंपाक वगैरे भानगडीत गेलो तर बायको, "तुझी मदत नको रे....मला तिप्पट काम वाढतं. त्यापेक्षा बस तिकडं पुस्तकात डोस्कं खुपसून!" असं पथ्यावरच पडणारं करवदत असल्यानं आयुक्ष निवांत काढतो. :D और कोई शक या सवाल?

In reply to by धमाल मुलगा

लय भारी रे धम्या. मे सुट्टीच्या दिवशी लायब्ररीत जातो .एक झकास ५०० पानांचे पुस्तक घेवून येतो. मस्त पैकी रूम आवरून ठेवतो. आणि पुस्तक वाचत समाधे लावतो. मुम्बईत घरी असलो तर बायको नामक घरधनीण नातेवाईकाना फोन करु /भेटायला जावू असे प्रस्ताव व्हेटो वापरत मांडते. प्रस्तावावर त्वरीत कार्यप्रवण व्हावे लागते.त्यानन्तर पुस्तक वाचत पदीक रहातो. संध्याकाळी पृथ्वी मधे एखादे नाटक असेल तर पहातो. सातार्‍यात असलो तर मस्तपैकी मित्रांना त्यांच्या मुलाबाळांसहीत त्यांच्या गाडीत घालून कुठेतरी जवळपासच्या जंगलात जावून येतो. माझ्या स्वप्नात असलेली माझी सुट्टीची दिनचर्या: सकाळी सहावाजता शहनाईच्या आवाजाने जाग येते. कोकीळा सकाळी सकाळी येवून भूप भटीयार किंवा ललत समोर बसून गात बसते. थोड्यावेळाने भरपूर कांदा घातलेले कांदे पोहे आणि भजी समोर येतात. नाष्ता झाल्यावर सकाळचा लेखनीक येतो. त्याला मी माझ्या वर्क इफीशियन्सी आणि स्ट्रेस मॅनेजमेन्ट वरील पुस्तकाचे डीक्टेश देतो. अकरा वाजता येणारा लेखनीक नाटकाचे डिक्टेशन घेतो. साधारणतः दोन वाजता आमरस ,पापड, कुरडया , अळूवड्या , मसाले भात, मठ्ठा , फणसाची भाजी , कांदा टोमॅटोची कोशींबीर ,पोळ्या , तिखटाच्या पुरणपोळ्या आमटी भात असे हलकेसे जेवण घेतो. दुपारची झोप वगैरे आवडत नाही पण मेंदूला शांतता मिळावी म्हणून साडेतीन पर्यन्त वामकुक्षी. चार वाजेपर्यन्त चहापन झाल्यावर दुपारचा लेखनीक येतो. त्याला सीरीयलच्या पुधील एपीसोडचे डायलॉग्ज डिक्टेक्ट करतो. साडेपाचला मणीरत्नम बरोबर नव्या सीनेमाच्या थीमबद्दल डिस्कशन करतो. सात वाजता क्लब मध्ये टेनीस पहायला जातो. साडेसातला मित्रांसोबत पेटी तबला घेवून गाण्याचा रीयाज करतो. सादेआठला संध्याकाळच्या लेखनीकाला नव्या गझलांचे डीक्टेशन देतो. सव्वा नऊ वाजता स्टीव्हन स्पीलबर्गशी कॉनकॉलवर सध्या फ्लोअरवर शूट होत असलेल्या प्रोजेक्टवर तसेच पुढच्या महीन्यात कॅरेबीयन आयलंड्स वर सुरु होणार्‍या प्रोजेक्ट्सच्या प्लॅनिंग वर टीप्स देतो. दहा वाजता बीबीसी वर प्रेसीडेन्ट ने जगातील पाण्याच्या समस्यांवर काय केले पाहिजे याबद्दल एक मार्गदर्शनपर मुलाखत देतो. अकरा वाजता बँक मॅनेजरला माझ्या खात्यातील फन्ड्स उद्या सकाळी स्वीस शाखेतून काढून बर्लीन मार्केट मध्ये डायव्हर्ट करण्याच्या सूचना देतो. किंवा डॉलर्स युरो मध्ये कन्व्हर्ट करण्याच्या सूचना देतो. सव्वाअकरा वाजता खास बर्गंडी हून तेथील रादूताने भेट पाठवलेली Chateau neuf du pape किंवा Vin Jaune नाहीतर Vin de Paill ची चव चाखत वेगनरचे किंवा बाख ऐकत मनःशांती अनुभवतो. रात्री पावणेबराच्या पुढे कुटुंबासमवेत क्वालीटी टाईम घालवत दिवस पूर्ण करतो.

In reply to by विजुभाऊ

कोकीळा सकाळी सकाळी येवून भूप भटीयार किंवा ललत समोर बसून गात बसते. भटियार, ललत ठीक आहे हो, पण सकाळी भूप?

In reply to by धमाल मुलगा

पोराचं बागेत हुंदडणं झिंदाबाद! हम्म. समजलं हो समजलं धमालराव. नाव पोराचं....

"मित्र-मैत्रिणींबरोबर उनाडक्या करणे" याला मत दिले आहे. मित्रमैत्रिणी गोळा करुन गाव कोळपत फिरणे हाच सगळ्यात आवडता छंद आहे. त्या आनंदापुढे झोप, भूक वगैरे गोष्टी विलक्षण तुच्छ वाटायला लागतात!! --असुर

छंद जोपासण्याला मत दिलं आहे. त्यात मित्रमंडळ भेटलं तर पक्षीनिरिक्षण वैगरे सुरु असतं. घरी असलो तर एखादा पदार्थ करुन बघणे किंवा जो बनवता येतो तो बनवून निवांत खाणे आणि प्रसंगी खायला घालणे. अगदीच सवड असेल तर मग एखादं ग्लास पेंटिंग वैगरे. अर्थात त्यातलं फार काही येतं मला असं नाही, पण आपलं रेघोट्या मारत बसायचं !! अवांतरः गेल्या विकांताच्या मेनूत ओल्या काजूंची उसळ होती. ;)

ही मिपावर माझी दुसरि प्रतिक्रिया. मी पण सगळ आल्टुन पाल्टुन करते. अन मिपावर सगळ वाचत बसते. टारझन अन स्पावडुच्या प्रतिक्रिया वाचायला आवड्ते. :-)