|
पूर्वी पुणे लोकमान्य टिळकांमुळे ओळखले जात होते. अजूनही जाते. परंतु शरद पवार आणि त्यांचे एकेकाळचे पट्टशिष्य सुरेश कलमाडी यांनी आपल्या कर्तृत्वाने या पुण्यनगरीला नवी अस्मिता देण्याचा जणू विडा उचलला आहे. शंभर वर्षांपूर्वी टिळक राजद्रोहाच्या आरोपाखाली दूर मंडालेच्या कारागृहात बंदिस्त होते. आज सुरेश कलमाडी दिल्लीत न्यायालयीन कोठडीत गजाआड झाले आहेत. त्यांचेवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. असे आरोप टिळकांवर करण्याचे धाडस कोणाला झाले नाही. ब्रिटिशांची चाकरी करायची नाही आणि सर्व वेळ देशसेवा करायची असे व्रत सर्वप्रथम ज्या पिढीने घेतले त्या पिढीचे टिळक आणि आगरकर हे प्रतिनिधी होत. |
| आपली आणि आपल्या कुटुंबियांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय केली की बाकी सगळा वेळ कुठे शाळा कुठे वर्तमानपत्र काढ असे करीत लोकांना जागे आणि ज्ञानी करण्यात टिळकांनी व्यतीत केला. टिळकांच्या तपस्येतून जो देश उभा राहिला तो लुटण्याचे काम कलमाडी करीत आहेत. म्हणून यांना साधी शिक्षा देऊन भागणार नाही. एका पिढीला वाईट वळणावर नेऊन दरीत ढकलून देण्याचे काम या राजकारणी लोकांनी केले आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे गेल्या वर्षी दिल्लीत आयोजन करून काही हजार कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप कलमाडी यांच्यावर आहे. लोकमान्य टिळक सुरुवातीला प्रकृतीने तसे क्षीण होते; पण एकदा देशसेवेला आयुष्य वाहून घ्यायचे ठरविल्यानंतर महाविद्यालयाचे पहिले वर्ष त्यांनी केवळ शरीरबळ संवर्धनासाठी उपयोगात आणले. कुस्ती, मल्लखांब जोरबैठका आणि पोहणे असा विविध प्रकाराचा व्यायाम दिवसभर करीत राहून पुढच्या आयुष्यातील सगळ्या चढउतारांना पुरून उरेल अशी आपली देहयष्टी त्यांनी कणखर केली. मंडालेहून टिळक घरी आले आणि मुलांच्या खोलीत शिरले. तेथे बॅडमिण्टनचा सेट त्यांनी पाहिला. तो त्यांनी फेकून दिला. ‘असले मुलींचे खेळ का खेळता’, असे विचारून ‘पुरुषासारखे जगा’, असे त्यांनी सांगितले. महाविद्यालयाच्या आवारात बोलत असतांना टिळकांच्या हातून एक बंदा रुपया खाली पडला. आगरकरांनी त्यावर पाय ठेवला आणि टिळकांना गमतीने म्हटले की, हिंमत असेल तर तुमचा रुपया परत घेऊन दाखवा. टिळकांनी आगरकरांच्या कमरेला दोन हातांनी पकडून वर उचलले आणि अलगद बाजूला ठेवले. त्यांचे शरीरसामर्थ्य पाहून सगळे वर्गमित्र थक्क झाले. आज कलमाडींना असे कमरेतून उचलून बाजूला फेकण्याची वेळ आली आहे. हे काम जनतेने आपल्या सामर्थ्याचा इंगा दाखवून करायचे आहे; कारण जनतेच्या पैशावर कलमाडी पाय देऊन उभे आहेत आणि ‘हिंमत असेल तर मला हात लावा’, असे आव्हान देत आहेत. लोकांची सेवा अप्रतिहतपणे करता यावी म्हणून टिळकांनी शरीर कमवले. क्रीडासंस्कृती वर्धिष्णू करण्याचे ढोंग रचून कलमाडींनी लोकांचे हजारो कोटी रुपये गिळंकृत करण्याचा अधम डाव केला. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. कलमाडींनी ‘गणेश फेस्टिवल’ उभा केला. ताबुतात नाचणार्या हिंदूंना टिळकांनी सार्वजनिक पूजनासाठी देव दिला आणि संघटित होण्यासाठी व्यासपीठ दिले. ब्रिटिशविरोधी भावना प्रखर करण्यासाठी गणेशोत्सवातील मेळ्यांनी चपखल माध्यम दिले. कलमाडींचा ‘फेस्टिवल’ टिळकांच्या तेल्यातांबोळ्यांसाठी नव्हता. टिळकांनी शिवजयंत्युत्सव सुरू केला आणि धर्मप्रेमाने संघटित झालेल्या सामान्य माणसांचे राजकीय जागरण करण्याच्या दृष्टीने एक खंबीर पाऊल त्यांनी टाकले. सर्व जातींचे लोक टिळकांनी शिवाजी महाराजांसमोर विनीत भावांनी उभे केले. शरद पवार, सुरेश कलमाडी यांनी लाल महालातून दादोजी कोंडदेवांचा पुतळा उखडला आणि दुसरीकडे फेकला. यापुढचे राजकारण जातीजातीतील विद्वेषावर केले जाणार असल्याचा डांगोरा त्यांनी पिटला. ‘टिळकांच्या काळात वेश्यांनाही नीतीमत्ता होती’, असे पु.भा. भावे म्हणत. वेश्या आपले शरीर विकून गिर्हाइकांना सुख देण्याचा प्रयत्न करतात. त्या त्यांना लुटत नाहीत. आजचे राजकारणी नीतीमत्तेत वेश्यांच्याही समोर धड उभे राहू शकणार नाहीत. ज्या लोकांच्या जिवावर ते निवडून येतात त्याच लोकांना लुटण्याचा एकमेव उद्योग ते निवडून आल्यावर करीत असतात. शुद्ध चारित्र्य हा टिळकांचा अनन्य साधारण विशेष आहे. कलमाडींनी चारित्र्य या संकल्पनेची चेष्टा मांडली आहे. माणसाला चारित्र्याची आवश्यकता नसते, उलट चारित्र्य हा व्यक्तीच्या उत्कर्षातील अडथळा असतो, असा या पाताळयंत्री लोकांचा सिद्धांत आहे. ही अधोगती राष्ट्रवादातून झाली. काँग्रेसचा राष्ट्रवाद आईला विकून आपले पोट जाळतो. हिंदूंना आपले राष्ट्र स्थापन करू द्यायचे नाही आणि पाकिस्तानसाठी पायघड्या अंथरायच्या हा मातृद्रोह नाही तर काय आहे ? ‘गांधी हा आपला माणूस नाही’, असे दादासाहेब खापर्डे एकदा पटकन अंतस्फूर्तीने टिळकांना म्हणाले होते. यापुढे आपल्या सार्वजनिक जीवनातले कलमाडींसारखे खडे आपण उचलून बाजूला फेकू तेव्हा गांधींच्या राष्ट्रवादाने निर्माण केलेले स्वार्थी नेते आपण दूर करीत आहोत, हे समाधान मिळाले पाहिजे. पुण्यनगरीला पापनगरी करणार्या अशा अनेक असुरेशांना आपण दूर करू तेव्हाच हिंदुराष्ट्र स्थापनेचा दिवस लवकर उगवेल !!! | |
वाचने
3392
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
?
नवा द्विराष्ट्रवाद
In reply to ? by नितिन थत्ते
>>१. फक्त पुण्यनगरीतल्या
In reply to ? by नितिन थत्ते
तुलना
शांत व्हा..
गांधी
टिळक आणि कलमाडी नव्हे
In reply to गांधी by आळश्यांचा राजा
तेव्हाचे
In reply to टिळक आणि कलमाडी नव्हे by हुप्प्या
कलमाडी कोन्ग्रेस मधील आहेत ही बर्याच पुरोगाम्यांची पोटदुखी आहे.
In reply to तेव्हाचे by नितिन थत्ते
?????
In reply to कलमाडी कोन्ग्रेस मधील आहेत ही बर्याच पुरोगाम्यांची पोटदुखी आहे. by ईश आपटे
अवांतर
In reply to तेव्हाचे by नितिन थत्ते
दादुस.. कना तापत्न तु?.. हिजी
?
लेखाचा पाया
सहमत.
अनुमोदन...
In reply to सहमत. by ज्ञानेश...
प्रकाटाआ.
In reply to सहमत. by ज्ञानेश...
सर्व उत्तरे एकत्रपणे !!!!!