साहित्यः
टोमॅटो - ४
कांदा - १
लसुण - ३ पाकळ्या
तेजपान - १
काळी मिरी - ४-५
बेसिलची पाने - ३-४
मैदा - २ चमचे
ब्रेड - २ स्लाईस
ऑलिव्ह ऑइल - २ चमचे
साखर - १ चमचा
क्रिम सजावटीसाठी
कृती:
१. कांदा लांब चिरुन घ्यावा. लसुण बारीक चिरावा.
२. भांड्यामधे ऑलिव्ह ऑइल गरम करावे. त्यात तेजपान, काळी मिरी, चिरलेला कांदा आणि लसुण टाकुन परतुन घ्यावे.
३. त्यात २ चमचे मैदा टाकुन निट मिक्स करावे.
४. त्यात टोमॅटोचे मोठे तुकडे करुन टाकावेत. त्यात बेसिलची पाने व चवीनुसार मिठ टाकुन २ कप गरम पाणी टाकावे. ह्यावर झाकण ठेवुन १०-१५ मिनिटे शिजु द्यावे.
५. टोमॅटो शिजल्यावर ते गाळुन घ्यावे. गाळणी मधे राहिलेल्या टोमॅटो व कांद्याची मिक्सर मधे प्युरी करुन घ्यावी.
६. एका मोठ्या भांड्यामधे मिक्सर मधुन काढलेली प्युरी परत एकदा गाळुन घ्यावी. त्यात आधी गाळलेले पाणी टाकावे.
७. हे सुप १० मिनिटे मंद आचेवर उकळु द्यावे. त्यात चवीनुसार साखर व काळी मिरी पावडर टाकावी.
८. दुसर्या पॅन मधे १/२ चमचा ऑलिव्ह ऑइल टाकुन त्यात ब्रेड्चे तुकडे भाजुन घ्यावेत.
९. Serving bowl मधे हे ब्रेड्चे तुकडे व त्यावर टोमॅटो सुप ओतावे. त्यावर क्रिम व बेसिलच्या पानाने garnish करुन गरम serve करावे.
टिपः
१. सुप serve करताना त्यात वरतुन mozarella cheese टाकावे. खुप मस्त चव लागते.
वाचने
8244
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटू आणि पाकृ दोन्ही
आभारी आहे. सेलरी मला जास्त
In reply to फोटू आणि पाकृ दोन्ही by रेवती
ऑलिव्ह ऑइल
ऑलिव्ह ऑइल नसल्यास त्या जागी
In reply to ऑलिव्ह ऑइल by रामदास
पाकृ व फोटो दोन्ही छान आहेत .
खूप
झकासच दिसतय की. बादवे हे सुप
बादवे हे सुप टोमॅटो शिवाय कसे
In reply to झकासच दिसतय की. बादवे हे सुप by परिकथेतील राजकुमार
छानच गं
मस्तच दिसतय सूप. मला माझ्या
मस्त. :)
छान
हा हा हा हा... मस्त....
In reply to छान by आत्मशून्य
मस्त!!
मस्त मस्त
खुप सुंदर