Skip to main content

कैरीच्या विविध पाकृ... माहिती हवी..

लेखक मनि२७ यांनी बुधवार, 27/04/2011 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर..... :-) आज बरायचं दिवसांनी मिपावर येण झाल.....ते पण एक पाक्रु जाणून घ्यायला.... माझ्या सासू बाईनी मला ५ ते ६ किलो कैर्या पाठवल्या आहेत.. आता एवढय कैर्यांचा काय करू काही सुचत नैये मला.... प्लीज तुम्हाला जर नवनवीन पाककृती माहित असतील तर सांगा... मला कैरीच पन्ह बनवता येत.. .. पण बाकी काही अजून करून पाहिलं नाही... आणि हो..जर कोणाला तिखट छुंदा ची पाकृ माहित असेल तर सांगावी.... :-)

वाचने 5473
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

कैर्‍या गावठी की कलमी? तसेच कोणत्या जातीच्या आंब्याच्या आहेत त्यावर बरंच काही अवलंबून आहे. कैरीचे पन्हे, लोणचे, भेळ, मुरांबा, गूळ टाकून भाजी, कैरीची डाळ असे प्रकार करुन इकडे पाठवून द्यावेत. :)

लोणचे कर, साखरांबा, गुळांबा कर, कैरी किसुन चटणी छान होते, रायते(मेथांबा) ही छानच लागते. अजुन ही खुप प्रकार आहेत..करता येण्यासारखे!!!!!!

संद्याकाळी सांगतो ..चित्रांसकट !! अवांतर : सासुबाईंनी कैर्‍या पाठविल्या ?? ;)

कैर्‍या वाळलेल्या गवताच्या पेंढ्यांमध्ये भरून ठेवून द्या. महिनाभरात चांगले आंबे तयार होतील. मग आमरस करा अथवा कापून खा. यंदा आंबे अंमळ महागलेत.

कैर्‍या वाळलेल्या गवताच्या पेंढ्यांमध्ये भरून ठेवून द्या. महिनाभरात चांगले आंबे तयार होतील. मग आमरस करा अथवा कापून खा. हॅ हॅ हॅ वल्या लय भारी रे..... :d

काहि कैरीचे लोणचे करा अणि मग एक सोप्पि क्रुति बकिच्या कैरीच्या फोडि करुन त्यास मस्त तिखट मिठ लावुन उन्हात छान वाळ्त ठेवा २-३ दिवस. आणि लागेल तसे येता जाता किन्वा जेवतान वा भेळे बरोबर मस्त खात रहा :)

ए़क किलो कैरी किसून घ्या त्यात सव्वा किलो साखर घालुन एक आठवडा उन्हात छान वाळ्त ठेवा नंतर त्यात लाल तिखट तूमच्या चवी नुसार अ‍ॅड करा आणि मस्त खात रहा